Wednesday 22 February 2017

...अखेर मकरधोकडा आश्रमशाळेचा ‘तो‘ पहारेकरी बडतर्फ

देवरी- देवरी तालुक्यातील मकरधोकडा आश्रमशाळेत घडलेल्या बालिका अत्याचार प्रकरणातील संबंधित कर्मचाऱ्याला आज स्थानिक कृष्णा सहयोगी तंत्रशिक्षण संस्थेने बडतर्फ केल्याचे संस्थेचे सचिव अनिल येरणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
सविस्तर असे की, देवरी तालुक्यातील मकरधोकडा येथे स्थानिक कृष्णा सहयोगी तंत्रशिक्षण संस्थेच्या वतीने स्वामी रामकृष्ण आदिवासी आश्रमशाळा चालविली जाते. या आश्रम शाळेतील पहारेकरी देवकरण हिरदेलाल उईके यांच्यावर त्याच शाळेत शिकणाऱ्या एका अल्पवयीन आदिवासी मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. सदर प्रकरणी देवरी पोलिस तपास करीत असून संस्थेने आज (ता२२) रोजी त्या कर्मचाऱ्याची सेवा तत्काळ संपुष्टात आणत असल्याची माहिती संस्थेचे सचिव अनिल येरणे यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. सदर प्रकरण हे शाळेच्या आवाराबाहेरील असल्याने त्या प्रकरणाची संस्था वा आश्रमशाळेशी कसलाही संबंध नसल्याचा खुलासा श्री येरणे यांनी उपस्थित पत्रकारांपुढे करीत काही संघटना आमच्या संस्थेला नाहक बदनाम करीत असल्याचा आरोप केला. मागास भागात शिक्षणाचे सेवाभावी कार्य करीत असून सुद्धा काही लोकांमुळे आमची नाहक बदनामी होत असल्याची खंतसुद्धा येरणे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. 

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...