Tuesday 14 February 2017

येत्या गुरूवारी जिल्हातील सलून मालकांचा बंद

देवरी-  भविष्यात कोणीही सलून व्यवसाय करणाऱ्या कोणत्याही नाभिकास जिवानिशी मारण्याचा प्रयत्न करू नये आणि  गोंदियाचे लांजेवार प्रकरणातील आरोपीस तत्काळ अटक व्हावी, या उद्देशाने येत्या गुरूवारी (ता. 16) घटनेचा निषेध म्हणून बंद पाळत पोलिस अधीक्षकांना निवेदन देण्यात येणार आहे.
सविस्तर असे की,  गोंदिया येथील राधेशाम नत्थूलाल लांजेवार (40) हे गेल्या 6 फेब्रुवारीला सायंकाळी चारच्या सुमारास सलून मध्ये काम करीत असताना आरोपी अतुल कैलास कागदे हा दारूच्या नशेत आला. त्याआधी तेथे 4-6 ग्राहक बसून होते. अतुलने राधेशाम यांच्याशी माझी कटिंग आधी का करून देत नाही, म्हणून वाद घातला आणि वस्तऱ्याने राधेशामला जखमी केले. या प्रकरणातील आरोपीस तत्काळ ्अटक व्हावी, म्हणून येत्या गुरूवारी जिल्हा पोलिस अधीक्षकांना नाभिक संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात येणार आहे. सर्व समाज बांधवांनी आपला व्यवसाय बंद ठेवून गोंदियातील सेनाजी महाराज  तथा संतोषी मंदिरात एकत्र येण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष राजकुमार प्रतापगडे, उपाध्यक्ष सोहन क्षिरसागर, राजेश जांगडे. सुरेश चन्ने,  वासू भाकरे,, दुलिचंद भाकरे आदींनी केले आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...