Tuesday 14 February 2017

गडचिरोलीच्या कामगार अधिकारी श्रीमती पेंदोर एसीबीच्या जाळ्यात

गडचिरोली, दि.१४: न्यायालयात प्रकरण दाखल न करण्यासाठी तक्रारकर्त्याकडून ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी येथील सरकारी कामगार अधिकारी(वर्ग-२) श्रीमती संध्या देवराव पेंदोर(३५) यांना रंगेहाथ पकडून अटक केली.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारकर्त्याविरुद्ध किमान वेतन अधिनियम १९४८, किमान घरभाडे अधिनियम १९८३ व वेतन प्रदान अधिनियम १९६३ केलेली केस न्यायालयात दाखल न करण्यासाठी तक्रारकर्त्यास ५० हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती श्रीमती पेंदोर ४० हजार रुपये स्वीकारण्यास तयार झाल्या. परंतु लाच देण्याची तक्रारकर्त्याची मुळीच इच्छा नसल्याने त्याने गडचिरोलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार या विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज दुपारी १२ वाजताच्या सुमारास सापळा रचला असता सरकारी कामगार अधिकारी श्रीमती पेंदोर यांना तक्रारकर्त्याकडून ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पकडण्यात आले. त्यामुळे एसीबीने त्यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ अन्वये गुन्हा दाखल करुन अटक केली.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक संजय दराडे, अपर पोलिस अधीक्षक राकेश शर्मा, पोलिस उपअधीक्षक ज्ञानेश्वर घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक एम.एस.टेकाम, हवालदार विठोबा साखरे, सत्यम लोहंबरे, रवींद्र कत्रोजवार, सतीश कत्तीवार, सुधाकर दंडिकवार, मिलिंद गेडाम, महेश कुकुडकर, सोनल आत्राम यांनी ही कारवाई केली.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...