Thursday 16 February 2017

देवरी येथे शिवजयंती येत्या रविवारी


मान्यवरांचा होणार सत्कार

देवरी- स्थानिक शिवाजी शिक्षण संकुल येथे दरवर्षी प्रमाणे येत्या रविवारी (ता.१९) शिवजयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी नऊ वाजता शहरातून शोभायात्रा काढण्यात येणार आहे.
शिवजयंतीनिमित्त आयोजित मुख्य समारंभाचे उद्घाटन आमदार संजय पुराम यांचे अध्यक्षतेत भाजपचे विदर्भ संघटनमंत्री डॉ.उपेंद्र कोठेकर यांचे हस्ते होणार आहे. स्वागताध्यक्षपदी संस्थेचे अध्यक्ष झामसिंग येरणे हे राहतील. शिवचरित्रावर मार्गदर्शन करण्यासाठी प्रा. सुमंत टेकाडे हे उपस्थित राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून गोंदियाचे जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, पोलिस अधीक्षक दिलीप भुजबळ, पोलिस उपअधीक्षक संदीप पखाले, देवरीचे तहसीलदार संजय नागतिळक, सभापती देवकी मरई आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यावेळी देवरी तालुक्यातील १० वी व १२ वीच्या परीक्षेत सर्वोत्कृष्ट ठरलेले रोशनी अग्रवाल, टोपेश्वर पारधी, उमा डोंगरवार (१०वी), शिल्पा राऊत सौरप्रित भाटिया, मुस्कान अग्रवाल (१२वी विज्ञान) आणि सचिन जनबंधू, मनेश अरकरा आणि ज्योत्स्ना चर्जे (१२ वी कला) विद्याथ्र्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. याशिवाय सालेकसाचे तहसीलदार प्रशांत सांगाडे, सामाजिक वनीकरणचे चंद्रकुमार लांडगे आणि पोलिस कर्मचारी गोपाल मडावी यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
शिवाजी संकुलात आयोजित पत्रकार परिषदेत संस्था सचिव अनिल येरणे यांनी ही माहिती पत्रकारांना दिली. यावेळी प्रा. जयश्री भुरे, प्रा. मनोज भुरे, मुख्याध्यापिका डी. के. भाटिया आणि ए.एम. खरतवार आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...