Thursday 9 February 2017

पोलिस स्टेशनमध्ये हत्या प्रकरणातील आरोपींचे बर्थडे सेलिब्रेशन

भंडारा,berartimes.com दि. ८ ; भंडारा जिल्ह्यातील तुमसरमधील हेमंत उके हत्या प्रकरणातील आरोपींनी आपला वाढदिवस पोलीस स्टेशनमध्ये साजरा केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. तुमसर पोलिस स्टेशनमध्ये हे बर्थ डे सेलिब्रेशन झाल्याचे वृत्त आहे, मात्र पोलिसांनी हे आरोप फेटाळले आहेत.तुमसर पोलीस स्टेशनमध्ये हत्येच्या आरोपींनी आपला वाढदिवस साजरा केला. धक्कादायक बाब म्हणजे पोलिस स्टेशनचे अधिकारी आणि पोलिस शिपायांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा केल्याने खळबळ उडाली आहे.
या घटनेचं व्हिडीओ चित्रीकरणही करण्यात आले आहे. या प्रकरणाची माहिती भंडारातील ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना समजल्यावर त्यांनी तुमसर पोलिस स्टेशनला भेट दिली. या गंभीर प्रकरणाची तपासणी करुन कारवाई केली, परंतु तुमसर पोलीस स्टेशनला विचारणा केली असता या प्रकरणाची नोंद नसल्याचं सांगण्यात आले.तुमसर येथे 30 जानेवारीला भरदिवसा हेमंत उके या तरुणाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. पोलिसांनी हत्येचा तपास केला असता प्रशांत गभणे, आशिष गजभिये, संतोष डाहाट आणि सतीश डाहाट यांना संशयावरुन गुन्हा दाखल करत अटक झाली. न्यायालयाने या आरोपींना 7 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे त्यांची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली.
या आरोपींपैकी प्रशांत गभणे याचा वाढदिवस होता. तो तुमसरचाच रहिवासी असल्यामुळे सेलिब्रेशनसाठी लागणारा केक, मिठाई आणि अन्य गोष्टी पोलीस स्टेशन मध्ये त्याच्या समर्थकांनी पोलिसांच्या सहकार्याने पोहोचत्या केल्याचा आरोप आहे.प्रशांत गभने हा तुमसर पोलिस स्टेशनच्या पोलीस कोठडीत आहे. त्यामुळे ही पोलिस कोठडी सजवण्यात आली, केक ठेवण्यासाठी स्टूल देण्यात आले, सर्व तयारी झाल्यानंतर हत्येचा आरोपी प्रशांत गभने याने केक कापला. यावेळी त्याचे सहआरोपी, पोलीस अधिकारी, ड्युटीवर तैनात पोलीस शिपाई उपस्थित होते.त्या सर्वांना आरोपी प्रशांत गभने याने केक भरवला. उपस्थितांनी टाळया वाजवून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मोबाईलमध्ये फोटो काढून सोशल साईटवर शेअर करण्यात आले.तुमसर बाजारपेठेत असलेल्या व्यायामशाळेतून हेमंत उके दुचाकीने घरी परत निघाले होते. त्यावेळी मागून आलेल्या एका आरोपीने त्यांच्या डोक्यावर देशी कट्ट्याने दोन गोळ्या झाडून हत्या केली. गेल्या वर्षी हेमंत यांचे भाऊ प्रशांत उके यांच्यावर देखील तुमसरमधील एका आरोपीने गोळ्या झाडल्या होत्या. त्यानंतर उपचारादरम्यान प्रशांत उके यांचा नागपुरात मृत्यू झाला होता.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...