Thursday 16 February 2017

मोदींनी केली स्वतःची कृष्णाबरोबर तुलना

हरदोई (वृत्तसंस्था)- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःची भगवान कृष्णाबरोबर तुलना करताना, 'कृष्णाचा उत्तर प्रदेशात जन्म होऊन त्यांची गुजरात ही कर्मभूमी होती. तसेच माझा जन्म गुजरातमध्ये झाला असूनही उत्तर प्रदेशने मला दत्तक घेतले,' असे म्हटले आहे.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हरदोई येथे जाहीर सभेत ते बोलत होते. 
उत्तर प्रदेशने मला दत्तक घेतले असून, उत्तर प्रदेशच माझे मायबाप आहे. दत्तक घेतले असले तरी मी माझ्या मायबापाला सोडणार नाही, असे मोदी यांनी हरदोई येथील सभेत आज (गुरूवार) सांगितले. 
मोदी म्हणाले, 'कृष्णाचा जन्म उत्तर प्रदेशात झाला. त्याने गुजरातला कर्मभूमी बनविले. माझा जन्म गुजरातचा. मात्र, उत्तर प्रदेशने मला दत्तक घेतले आहे. हा माझा सन्मान आहे. उत्तर प्रदेश माझे माय-बाप आहेत. माय-बापाला दगा देणारा मी मुलगा नाही. मी उत्तर प्रदेशची कायमच काळजी वाहेन.'
समाजवादी पक्षावर हल्लोबोल करताना मोदी म्हणाले, 'राज्यातील प्रत्येक पोलीस ठाणे समाजवादी पक्षाचे कार्यालय बनले आहे. ठाणे अंमलदाराला केस दाखल करण्यापूर्वी समाजवादी पक्षाच्या नेत्याची परवानगी घ्यावी लागते. अशा वातावरणातून मुक्तता मिळण्यासाठी सरकार बदलणे जरुरीचे आहे.'

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...