Friday 17 February 2017

शिक्षणाधिकाऱ्यांची भेटः मुख्याध्यापक आढळले दारूच्या नशेत?



  • खामतलाव शाळेतील विद्यार्थी हलविणार टेकाबेदरला
  • सोशलमिडीयावर फोटो वायरल


देवरी- गोंदिया जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनी देवरी पंचायत समितीच्या शाळांना काल गुरुवारी (ता.16) अकस्मात भेट दिली. या भेटीत खामतलाव येथील प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक दारूच्या नशेत असल्याची फोटो स्वतः शिक्षणाधिकाऱ्यांनी व्हॉटसेपवर वायरल केल्याने शिक्षणक्षेत्रात खळबळ उडाली आहे.
काल गुरुवारी गोंदिया जिल्हा परिषदेतील प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनी देवरी पंचायत समितीतील काही शाळांना आपल्या चमूसह भेटी दिल्या. खामतलाव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला दिलेल्या भेटीत शाळेचे मुख्याध्यापक जी आर मरस्कोल्हे हे शाळेत अनुपस्थित होते. शाळेत अधिकारी आल्याची वार्ता कानावर पडताच मुख्याध्यापक मरस्कोल्हे यांनी तातडीने शाळा गाठली. दरम्यान, घाईगडबडीत मरस्कोल्हे यांनी शिक्षणाधिकाऱ्यांच्याच वाहनाला दुचाकीने धडक दिल्याचे बोलले जाते. सोशिअल मिडीयावर वायरल झालेल्या माहिती व फोटोप्रमाणे मरस्कोल्हे हे शाळेत दारू पिऊन असल्याचा संदेश फिरत आहे. खामतलाव येथील वस्तीशाळेचे नियमित शाळेत रूपांतर करून तेथे ६ विद्यार्थ्यांसाठी २ शिक्षकांची नेमणूक करण्यात आल्याची माहिती आहे. परंतु, ही शाळा अतिदुर्गम भागात असल्याने आणि वरिष्ठांचे दुर्लक्ष असल्याने येथे शिक्षणाचे तेरा वाजले आहेत. दरम्यान, शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलेल्या भेटीत पटले नावाचे दुसरे शिक्षक सुद्धा अनुपस्थित असल्याचे सांगितले जाते. शिक्षणविभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खामतलाव शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे दोन किलोमीटरवरील टेकाबेदर शाळेत स्थानांतरण करण्यात येणार असून त्या विद्यार्थ्यांची जिल्हा परिषदेमार्फत येण्याजाण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. उल्लेखनीय म्हणजे शिक्षणाधिकाऱ्यांनी अद्यापही त्या शिक्षकावर कार्यवाही केली नसल्याची माहिती असून सदर शिक्षकाला वाचविण्यासाठी फिल्डींग तर लावली जाणार नाही ना? अशी शंका पालकांनी व्यक्त केली आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...