Sunday 5 February 2017

मुल्ला येथे मग्रारोहयोच्या कामावर मजुराचा मृत्यू

गोंदिया,berartimes.comदि.०५-गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातर्गंत येणाऱ्या मुल्ला येथील महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामावर असलेल्या मनिराम वाघाडे(वय ५५) या मजुराचा आज रविवारला कामावर असताना सकाळी १० वाजेच्या सुमारास मृत्यू झाल्याची घटना घडली.
देवरी तालुक्यातील मुल्ला ग्रामपंचायती अंतर्गत मुल्ला हेटीटोला घासलीटोला रस्त्याचे खडीकरण मग्रारोहयो अंतर्गत सुरू करण्यात आले. या कामावर मुल्ला येथील मनिराम सितकू वाघाडे या इसमाची प्रकृती अचानक खालावल्याने त्याचा मृ्त्यू झाला.  मुल्ला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान, देवरी पोलिसांनी मर्ग दाखल करून पुढील चौकशी सुरी केली आहे. शवविच्छेदनानंतर मृतावर अत्यंसंस्कार करण्यात आले. मुल्लाचे ग्रामसेवक के एस वैष्णव यांनी मृताच्या कुटुंबीयांना पाच हजार रुपयांची तत्काळ मदत केल्याचे बेरारटाईम्सला सांगितले. नायब तहसीलदार बारसे यांनी 50 हजार रुपयांची मदत पिडीत कुटुंबाला शासनाच्या वतीने करण्यात येणार असल्याची माहिती दिली. मृत जर दारिद्र्य रेषेखालील असेल तर आणखी शासकीय मदत करता येईल, असेही बारसे यांनी सांगितले. दरम्यान, देवरी तालुक्यात मग्रारोहयोच्या कामात काही कंत्राटदारांचा हस्तक्षेप वाढल्याची कुणकुण आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...