Saturday 4 February 2017

विदर्भ अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अधिवेशन आजपासून

नागपूर- राष्ट्रसंत तुकडोडी महाराज नागपूर विद्यापीठ आणि गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली क्षेत्रातील विदर्भ अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे दोन दिवसीय अधिवेशन आजपासून (ता.4) भारसिंगी येथे आयोजित करण्यात आले आहे.
अरविंदबाबू देशमुख महाविद्यालय, भारसिंगी, ता. नरखेड, जि. नागपूर येथे आयोजित या अधिवेशनाचे  उद्घाटन मा. रणजितबाबू देशमुख यांचे अध्यक्षतेत नागपूरचे पालकमंत्री तथा राज्याचे उर्जामंत्री ना. चंद्रशेखर बावणकुळे यांचे हस्ते करण्यात येणार आहे. या अधिवेशानेच स्वागताध्यक्षपदी  डॉ. आशिष देशमुख हे राहणार आहेत. प्रमुख पाहूणे म्हणून आमगार ज्ञानराज चौगुले, नागपूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, पुण्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने, सहसंचालक डॉ. अंजली रहाटगावकर, व्ही एसपीएमचे डॉ. भाऊसाहेब भोगे, महासंघाचे अध्यक्ष प्रकाश म्हसे, महासचिव रावसाहेब त्रिभूवन आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनाला कर्मचारी बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...