
अतिदुर्गम भागात असलेल्या जेठभावडा ग्रामपंचायतीने आपल्या विशेष कामाने संपूर्ण देशभरात गौरव मिळविला आहे. या ग्रामपंचायतीची यशोगाथा लक्षात घेऊन या तिन्ही वैज्ञानिकांनी भेट दिल्याचे मत व्यक्त केले. वैज्ञानिकांनी प्रथम मधमाशी पालन व सहद विक्री केंद्राला भेट देऊन पाहणी केली. दरम्यान जेठभावडा ग्रामपंचायतअंतर्गत येणार्या जेठभावडा सिंदीबिरी व मसूरभावडा या तिन्ही गावातील लोकांचे भविष्य आता उज्ज्वल होणार असून गाव विकासाबरोबरच गट शेतीच्या माध्यमातून व्यवसाय सुरू करावे. यातून रोजगार निर्मिती होईल, असेही वैज्ञानिक म्हणाले. गटशेतीसाठी नागरिकांनी पुढाकार घेतला असून सिंदीबिरी गावात महिला उत्पादक संघ कार्यरत आहेत. यात ९ हजार महिलांचा समावेश आहे. गावातील प्रत्येक हाताला काम व रोजगार मिळवून देण्यास येथील सरपंच डॉ.जे.टी.रहांगडाले व सचिव सुमेद बन्सोड यांच्यासह संपूर्ण ग्रा.पं.चे सदस्य व गावकर्यांनी सुरू केलेल्या या कार्याला देशात वेगळे स्थान निर्माण करून देण्यासाठी आपण सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही यावेळी या तिन्ही वैज्ञानिकांनी दिली.
भेटी दरम्यान गावचे सरपंच डॉ.जे.टी.रहांगडाले, उपसरपंच भोजराज गावळकर, सचिव सुमेद बन्सोड, तलाठी राजू उपरीकर, नगरसेवक यादोराव पंचमवार, शेषराव किरसान, यादोराव कुंजाम, संजय साखरे, सर्व ग्रा.पं.सदस्यांसह गावातील बहुसंख्य नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार पोलीस पाटील राजू गावळकर यांनी मानले.
No comments:
Post a Comment