Saturday 18 February 2017

गर्दी नसल्यानेच मुख्यमंत्र्यांना मात्र पुण्यातील सभा रद्द करण्याची नामुष्की

पुणे, दि. 18 – महापालिका निवडणुका तोंडावर आल्याने प्रचारसभांचा सपाटा लागला असताना मुख्यमंत्र्यांना मात्र पुण्यातील सभा रद्द करण्याची नामुष्की ओढावली. सदाशिव पेठेतील टिळक रोडवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचारसभेचं आयोजन करण्यात आले होतं. मात्र पुणेकरांनी सभेकडे पाठ फिरवल्याने संपुर्ण मैदान मोकळं पडले होतं, त्यामुळे मुख्यमंत्र्यांना सभा रद्द करावी लागली.मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवरुन सभा रद्द झाल्याचं सांगताना समन्वयाचं कारण दिले. मात्र गर्दी नसल्यानेच सभा रद्द झाल्याचं बोलले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभेसाठी पोहोचले तेव्हा संपुर्ण मैदान मोकळं पडले होतं. दुपारच्या वेळी ठेवण्यात आलेल्या या सभेला पुणेकर आलेच नाहीत.
मुख्यमंत्री येऊन 15 मिनिटे झाली, तरीही सभा सुरु करण्यात आली नव्हती. तोपर्यंत मुख्यमंत्री स्टेजच्या बाजूलाच खाली थांबले होते. मंचावर पालकमंत्री गिरीष बापट आणि भाजप शहर अध्यक्ष योगेश गोगावले होते. मात्र मुख्यमंत्री खालीच होते. अखेर मुख्यमंत्र्यांनी सभा रद्द करत पिंपरी चिंचवडच्या दिशेने आपला मोर्चा वळवला.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...