Friday 10 February 2017

हत्तीरोग दुरीकरण मोहीम आजपासून


गोंदिया : जिल्ह्यात राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत समाजातील हत्तीरोग जंतूभारकमी करण्यासह हत्तीरोगाचा प्रसार थांबविणे, हायड्रोसील व हत्तीपाय रुग्णांना विकृतीपासून दूर ठेवण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील जनतेला डीईसी व सोबत जंतनाशक औषधाच्या गोळ्या प्रत्यक्ष खाऊ घालण्याचा कार्यक्रम 10 ते 14 फेब्रुवारी दरम्यान जिल्ह्यातील ग्रामीण भागात तीन दिवस आणि शहरी भागात पाच दिवस राबविण्यात येणार आहे.

आज (ता.10) ते येत्या मंगळवार (ता 14) दरम्यान एक दिवशीय सामुदायिक उपचार मोहिमेत गरोदर माता व दोन वर्षाखालील बालके व गंभीर आजारी रुग्ण वगळून ग्रामीण भागातील 11 लाख 1 हजार 365 तर शहरीभागातील 1 लाख 85 हजार 316 अशा एकूण 12 लाख 86 हजार 681 लाभार्थ्यांना प्रत्यक्ष गोळ्या खाऊघालण्याचे उद्दिष्ट असून या मोहिमेसाठी आवश्यक औषधीसाठा 34 लाख 51 हजार 776 डीईसी व 12 लाख 96हजार अलबेंडाझोल गोळ्या प्राप्त झाल्या असून 40 प्राथमिक आरोग्य केंद्रांना तसेच शहरी भागात याचा पुरवठाकरण्यात आला आहे. गृहभेटीतून गोळ्या खाऊ घातल्यानंतर घरावर खडूने मार्कींग करण्यात येणार आहे.
2 ते 6 वयोगटातील बालकांसाठी डिईसीची 100 मि.ग्रॅ.ची एक गोळी आणि अलबेंडाझोलची 400मि.ग्रॅ.ची एक गोळी. 6 ते 14 वयोगटातील बालकांसाठी डिईसीची 200 मि.ग्रॅ.ची दोन गोळ्या आणि अलबेंडाझोलची 400 मि.ग्रॅ.ची एक गोळी. 15 पेक्षा वयोगटातील व्यक्तींसाठी डिईसीच्या तीन गोळ्या व अलबेंडाझोलची एक गोळी अशी मात्रा राहणार आहे.

एक दिवशीस उपचार मोहिम उपचार यशस्वी करण्याच्या दृष्टीने व समाजात नविन रोगी होवू नये,यासाठी नागरिकांनी या गोळ्यांची एक मात्रा सेवन करावी. गोळ्या उपाशा पोटी खाऊ नये. शौचालयाच्या व्हेंटपाईपला जाळ्या बसवाव्यात. घराभोवती साचलेल्या दुषित पाण्यात वाहनाचे जळलेले तेल टाकावे. घराच्यापरिसरात नाल्या वाहत्या कराव्या. असे आवाहन राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत समाजातीलहत्तीरोग जंतूभार कमी करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी यांनी
केले आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...