
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या अभिभाषणाला उत्तर देताना नरेंद्र मोदी यांनी मनमोहनसिंग यांच्यावर टीका केली. बाथरूममध्ये रेनकोट घालून कसे जायचे, हे मनमोहनसिंग यांनी चांगलेच ठाऊक आहे,' अशी टिप्पणी पंतप्रधान मोदी यांनी केली. यावर कॉंग्रेसच्या सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत गदारोळ घातला. यामुळे काही वेळ पंतप्रधान मोदी यांचे भाषण थांबले. मोदी यांच्या वक्तव्याचा निषेध करत कॉंग्रेसने सभात्याग केला.
सभागृहातून बाहेर पडल्यानंतर कपिल सिब्बल म्हणाले, की पंतप्रधानांचा उद्धटपणा पाहा. सभागृहामध्ये सर्वांचे बोलून झाल्यानंतर त्यांनी बोलण्याचा निर्णय घेतला. यानंतर आता ते बिनबुडाचे आरोप करत आहेत. तर, अहमद पटेल म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग्ग यांच्याबद्दल केलेल्या विधानाचा निषेध करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत.
No comments:
Post a Comment