Saturday 4 February 2017

देवरीत राष्ट्रीय लोकअदालत येत्या शनिवारी

देवरी- न्यायालयात प्रलंबित खटल्यांच्या निवाडा आपसी समझोत्याद्वारे करण्यासाठी येत्या शनिवारी (ता.11) देवरी येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
 न्यायालयात दाखल झालेली न्यायप्रविष्ठ प्रकरणे आणि दाखलपूर्व दिवाणी व तडजोडीस पात्र असलेली फौजदारी प्रकरणे राष्ट्रीय अदालतीच्या माध्यमातून सोडविण्यासाठी या लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दिवाणी व तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, भू-संपादन प्रकरणे, बॅंक व वित्तीय संस्थांचे नुकसान भरपाई प्रकरणे, वैवाहिक संबंधातील वाद,मोटरवाहन कायद्याखालील प्रकरणे,  निगोशियबल इंस्ट्रूमेंट अॅक्ट कायद्यातील कलम 138 मधील प्रकरणे, महसूल कायद्याखालील प्रकरणे,  कामगार वाद आणि वनकायद्याखालील प्रकरणांर्गत मोडणाऱ्या खटल्यांचा समावेश आहे.
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणातर्फे आयोजित या लोकअदालतीमध्ये आपसी सामंजस्याने आपल्या प्रकरणात निपटारा करून आपला अमूल्य वेळ व पैसा वाचवून मानसिक शांती मिळविण्यासाठी चालून आलेल्या या संधीचा लाभ जास्तीत जास्त पक्षकारांनी उचलावा, असे अावाहन देवरीचे न्यायाधीश तथा अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती आणि तालुका बार असोशियसनच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...