Monday 20 February 2017

देवरी येथे उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा सत्कार


विमुक्त भटक्या जाती-जमाती परिषदेचे आयोजन

देवरी- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून विमुक्त भटक्या जाती जमाती परिषदेचे गेल्या रविवारी देवरी येथे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शासकीय सेवेतील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
स्थानिक आफताब मंगल कार्यालयात आयोजित सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी देवरीच्या साहित्यिक डॉ. वर्षा गंगणे ह्या होत्या. प्रमुख मार्गदर्शक म्हणून नागपूरच्या संघर्ष वाहिनीचे मुख्य संयोजक मुकुंद अड्डेवार हे उपस्थित होते. या सोहळ्यात देवरीचे ठाणेदार राजेश तटकरे, देवरी येथील वनपरिक्षेत्राधिकारी बी बी मारबते, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे नियोजन अधिकारी एन टी भोई. डॉ. वर्षा गंगणे, मुकुंद अड्डेवार आदी मान्यवरांचा शाल-श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी सत्कारमूर्ती राजेश तटकरे, मारबते, भोई, अड्डेवार, प्रा. गंगणे यांनी सत्काराला उत्तर देताना समाजातील समस्यांना वाचा फोडण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी संघटित होऊन समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
प्रास्ताविक गोपाल मेश्राम यांनी केले. संचलन प्रकाश मेश्राम यांनी केले. उपस्थितांचे आभार जगदीश खेडकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी के. टी. कांबळे, गणराज नान्हे, मुरलीधर शेंडे, तुलाराम कुरार्डे, द्वारका धरमगुळे, सुषमा वलथरे,साधना नान्हे आदींनी सहकार्य केले. या कार्यक्रमाला तालुक्यातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...