Thursday 23 February 2017

ब्लासम पब्लिक स्कूलला आयएसओ मानांकन


 देवरी-  स्थानिक ब्लॉसम पब्लिक स्कूलचा आयएसओ 9001:2015 हे गुणवत्ता व्यवस्थापन पद्धतीमधील मानांकन देऊन नुकताच गौरव करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, गोंदियाच्या कल्पवृक्ष शिक्षण संस्थेद्वारे गेल्या 8 वर्षापासून देवरी येथे पब्लिक स्कूल चालविले जात आहे. सदर शाळा ही अल्पावधीतच आपल्या कल्पक शिक्षण पद्दतीमुळे नावारुपास आली. या शाळेतील सर्वांगीण शिक्षण पद्धतीत झालेल्या सुधारणांबद्दल संस्थेच्या संचालकसचिव निर्मल अग्रवाल यांनी  या यशाचे श्रेय शाळेचे मुख्याध्यापक सुजीत टेटे यांना  बेरारटाईम्सशी बोलताना दिले.
मुख्याध्यापक टेटे यांनी शाळेला आयएसओ मानांकन मिळण्यासाठी शाळेत आवश्यक तो सुधार करून प्रमाणपत्र मिळवण्यासाठी प्रयत्न चालविले होते. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश येत आयएएफ या संस्थेने गेल्या 11 फेब्रुवारी रोजी आयएसओ 9001 हे प्रमाणपत्र देऊन गौरव केला. शाळेला मिळालेल्या मानांकनाबद्दल शाळा व्यवस्थापन आणि पालकांसह तालुक्यातील अनेक मान्यवरांनी मुख्याध्यापक टेटे आणि त्यांच्या सहकाऱ्याचे अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...