
राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने काढलेल्या परिपत्रकानुसार आरटीई कायद्याखाली इयत्ता पहिलीमध्ये गरजू विद्यार्थ्याना मिळणाऱ्या 25 टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेच्या मुदतीत येत्या 25 तारखेपर्यंत मुदतवाढ दिली आहे. या नियमांतर्गत गोंदिया जिल्ह्यासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया ही 05 फेब्रुवारी 2017 पासुन सुरु करण्यात आली होती. ज्यांचे नागरिकांचे वार्षिक उत्पन्न १ लाखापेक्षा कमी आहे, असा पालकांच्या पाल्यांनाय योजनेचा लाभ दिल्या जातो. यामध्ये इतर मागास वर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि अपंग गटातील संबंधित पालकांनी अर्ज करुन या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन ब्लॉसम पब्लिक स्कूलचे मुख्याधापक सुजित टेटे यांनी केले आहे. या योजने अंतर्गत देवरी तालुक्यात एकूण ७५ जागा असून १० जागा ब्लॉसम स्कूल मध्ये आहेत. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाने ठरविलेल्या नियमावलीनुसार पालक व पाल्याचे आधारकार्ड , रहिवासी प्रमाणपत्र, शाळेपासून 3 किमीपेक्षा जास्त अंतर नसल्याचा पुरावा, तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला , भाडे तत्वावर राहणाऱ्या पालकांसाठी दुय्यम निबंधक यांचा दाखला आदी कागदपत्रे आवश्यक आहेत. गोंदिया जिल्ह्यात उपलब्ध जागांचा तपशील याप्रमाणे
अ.क्र. तालुका एकूण शाळा एकूण जागा एकूण प्राप्त अर्ज प्रलंबित अर्ज मंजूर अर्ज
1 अर्जूनी मोर 11 126 35 09 26
2 आमगाव 10 120 124 32 92
3 देवरी 11 75 58 21 37
4 गोंदिया 50 464 700 172 528
5 गोरेगाव 14 93 97 18 79
6 सालेकसा 07 77 71 18 53
7 सडक अर्जूनी 11 83 59 10 49
8 तिरोडा 16 159 221 44 177
एकूण 130 1197 1365 324 1041
No comments:
Post a Comment