Saturday 11 February 2017

'रेनकोट' विधानावरून वाद अयोग्य : राजनाथसिंह

लखनौ (वृत्तसंस्था)- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्याविषयी "रेनकोट'संबंधीच्या केलेल्या विधानावरून सुरू असलेला वाद अयोग्य असल्याचे स्पष्ट करताना केंद्रीय मंत्री राजनाथसिंह यांनी हे वक्तव्य अवमानकारक नसून, कॉंग्रेस नेत्यांनी आक्रमक होण्याचे कोणतेही कारण नसल्याचे मत व्यक्त केले.
मोदी यांनी त्यांच्या रेनकोटसंबंधीच्या वक्तव्यावरून कोणाचाही अपमान केलेला नाही. हे विधान केवळ यूपीए सरकारच्या काळात झालेल्या भ्रष्टाचाराकडे निर्देश करणारे होते, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह म्हणाले. सर्वांत भ्रष्ट सरकारमध्ये पंतप्रधान असूनही मनमोहनसिंग यांच्यावर भ्रष्टाचाराचा एक डागही लागला नाही. बाथरूममध्ये रेनकोट घालून अंघोळ करण्याची कला फक्त मनमोहनसिंग यांनाच माहिती आहे, असे मोदींनी राज्यसभेत बोलताना म्हटले होते. मोदींच्या या वादग्रस्त विधानावर कॉंग्रेससह सर्वच स्तरातून नाराजी व्यक्त होत होती.
मोदींच्या या विधानाची गृहमंत्री राजनाथसिंह यांनी शुक्रवारी पाठराखण केली. सिंह म्हणाले, मोदींनी कोणाचाही अपमान केला नाही. आम्ही सर्व जण मनमोहनसिंग यांचा आदरच करतो. एवढे गैरव्यवहार होऊनही मनमोहनसिंग यांच्यावर एकही आरोप झाला नाही, असे मोदींनी म्हटले होते. मोदींनी मनमोहनसिंग यांचे कौतुकच केले, असे राजनाथसिंह यांनी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...