Wednesday 28 November 2018

28 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर 2018 बेरार टाईम्स अंक,ताज्या बातम्यासांठी क्लिक करा http://berartimes.com/





चिचगड येथे तालुका विज्ञान प्रदर्शन उद्या


Image result for science exhibition


देवरी,दि.२८- देवरी पंचायत समिती अंतर्गत शिक्षण विभागाच्या वतीने दोन दिवसीय तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन चिचगड येथे उद्या (दि.२९) करण्यात आले आहे.
चिचगडच्या श्रीराम विद्यालयात आयोजित या प्रदर्शनाचे उद्घाटन देवरी पंचायत समितीच्या सभापती सुनंदा बहेकार यांच्या अध्यक्षतेत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अल्ताफ हमीद यांचे हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून चिचगडचे सरपंच कल्पना गोस्वामी,देवरी पंसचे उपसभापती गणेश सोनबाईर, जि.प.सदस्य दीपकसिंह पवार, उषा शहारे, माधुरी कुंभरे,सरिता रहांगडाले, पं.स.सदस्य महेंद्र मेश्राम,गणेश तोफे, संगीता भेलावे, मेहतर कोराम, देवकी मरई,  अर्चना ताराम, नरेंद्र मडावी, लखमी सलामे, गटशिक्षणाधिकारी डी बी साकुरे, विस्तार अधिकारी आर एस येटरे, डी.बी, दिघोरे, केंद्रप्रमुख वाय एम कोल्हारे, ठाणेदार भास्कर आदी मान्यवर  उपस्थित राहणार आहेत.
या प्रदर्शनाचे बक्षीस वितरण शुक्रवारी (दि.३०) दुपारी १२ वाजता करण्यात येणार आहे. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी आलेवाडाचे मुख्याध्यापक विनोद गिèहेपुंजे हे राहणार आहे. देवरीचे गटविकास अधिकारी मनोज हिरुडकर यांचे हस्ते विजेत्यांना पुरस्कार दिल्या जातील. यावेळी विस्तार अधिकारी येटरे, दिघोरे, केंद्रप्रमुख शेंडे, बोपचे, येळणे, बैस, सूर्यवंशी, लंजे, उईके, बंसोड, गजभिये, शिवकुमार राऊत, विषय तज्ज्ञ उमेश भरणे, धनवंतराव कावळे, एस टी मस्के, एस ए वलथरे, आर टी शेंद्रे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Wednesday 21 November 2018

देवरी: 21
देवरी येथे शिख समुदायाच्यावतीने गुरुनानक जयंतीच्या पार्श्व भूमीवर गुरुपुरब उत्सव थाटात साजरा करण्यात आला याप्रसंगी रॅली चे आयोजन करण्यात आले होते.
संपूर्ण शहरातील रस्त्याची स्वच्छता करत या रॅलीचा समारोप झाला.

21 ते 27 नोव्हेंबर बेरार टाईम्स अंक CLICK -berartimes.com





Tuesday 20 November 2018

भीमा-कोरेगाव ते चैत्यभूमीपर्यंत संविधान मार्च काढणार, जोगेंद्र कवाडे यांची घोषणा

मुंबई, दि.२०– केंद्र आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपा सरकारमधील मंत्री आणि नेते संविधान हटवण्याची मागणी करत आहेत. त्यामुळेच संविधान हा देशाचा गौरव असल्याची जाणीव करून देण्यासाठी भीमा कोरेगाव-भीमा ते चैत्यभूमीपर्यंत संविधान मार्च काढण्याची घोषणा पीपल्स रिपल्बिकन पार्टीचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी आज केली. या लाँग मार्चला २६ नोव्हेंबरपासून सुरुवात होईल, तर ६ डिसेंबरला चैत्यभूमीवर हा मोर्चा धडक देईल.
पीपल्स रिपल्बिकन पार्टीने मंगळवारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जोगेंद्र कवाडे यांनी या संविधान सन्मान लाँग मार्चमध्ये हजारो भीमसैनिक सामील होतील,असा दावा केला.ङ्कङ्कभारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अँड प्रकाश आंबेडकर, रिपाइं (ए) चे अध्यक्ष व केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांना संविधानाचा आदर असेल, तर त्यांनी या मार्चमध्ये सामील व्हावे, ङ्कङ्कअसे आवाहन पक्षाचे कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी केले आहे.

एसीबीचे तत्कालीन पोलीस उपअधिक्षक शिरसाठ लाच घेताना अटक

पुणे,दि.20 : चंद्रपूर येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागात पोलीस उपअधीक्षक म्हणून कार्यरत राहिलेले तसेच सध्या नाशिक येथील आथिर्क गुन्हे शाखेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले राजेश शिरसाठ(48) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुणे येथे दोन लाख रुपयाची लाच घेताना अटक केली.
शिरसाठ हे चंद्रपूरमध्ये 2012 ते 14 दरम्यान कार्यरत होते.नाशिक आथिर्क गुन्हे शाखेत वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत असतांना एका प्रकरणात पुण्यात वारंट न बजावण्यासाठी त्यांनी एका हवालदारामार्फत तक्रारदाराला दोन लाख रुपयांची लाच मागितली होती. या प्रकरणी त्यांना तसेच हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.
चंद्रपूरमध्ये कार्यरत असताना त्यांनी काही अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रकरणामध्ये केस दाखल केली होती. यातील काही प्रकरणांचा न्यायालयाने निपटारा केला असून अधिकाऱ्यांची निर्दोष सुटका केली आहे. विशेष म्हणजे, निकालावेळी न्यायालयाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे तत्कालीन उपाधीक्षक शिरसाठ यांच्यासह तपास यंत्रणेवर ताशेरे ओढले होते. दरम्यान आता शिरसाठ हे स्वतःच लाच प्रकरणात अडकल्याने त्यांच्या चंद्रपूर येथील कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

गोंदिया येथे भगवान सहस्त्रबाहू जयंती साजरी



गोंदिया,दि.20- स्थानिक पिंडकेपार मार्गावरील जैन कलार समाज भवनात जैन कलार समाजाचे आराध्य दैवत राज राजेश्वर कार्तवीर्य भगवान सहस्त्रबाहू यांची जयंती मोठ्या उत्साहात रविवारी (दि.18) साजरी  करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गोंदिया येथील जैन कलार समाजाचे समाजाचे अध्यक्ष तेजराम मोरघडे हे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तिरोडा न.प.चे उपाध्यक्ष सुनील पालांदुरकर, माजी समाजाध्यक्ष काशीनाथ सोनवाने, कोसरे कलार समाजाचे अध्यक्ष तीर्थराज उके, माजी उपाध्यक्ष ओंकार लिचडे, हरिराम भांडारकर, सचिव सुखराम खोब्रागडे, उपाध्यक्ष शालीकराम लिचडे, युवा अध्यक्ष चंद्रशेखर लिचडे, सदस्य लालचंद भांडारकर प्रामुख्याने उपस्थित होते
सर्व प्रथम मान्यवरांच्या हस्ते माता जैनादेवी व भगवान सहत्रबाहु च्या छायाचित्राला माल्यार्पण व दिप प्रज्वलीत करण्यात आले.  भगवान सहत्रबाहु यांनी समाजासाठी केलेल्या कार्याबद्दल व समाजाच्या वाटचालीबद्दल आपल्या प्रास्ताविकेतून सचिव सुखराम खोब्रागडे यांनी माहिती दिली. यावेळी मान्यवरांनी उपस्थितांना समयोचित मार्गदर्शन केले
सूत्रसंचालन उमेश भांडारकर यांनी केले. उपस्थितांचे आभार पुष्पा भांडारकर यांनी मानले.  
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सुखराम हरडे, श्याम लिचडे, दीपक रामटेक्कर, मनोज भांडारकर, विणा सोनवाने, यशोधरा सोनवाने,  प्राजक्ता रणदिवे, सीमा इटानकर, गीता दहिकर, हर्षा आष्टीकर, शालिनी हरडे, उषा मोरघडे, रेखा कावळे, वर्षा तिडके, ज्योती किरणापूरे, वच्छला पालांदूरकर, अनिता मुरकुटे, चेतना रामटेक्कर,मनोज किरणापूरे, सचिन पालांदूरकर, अतुल खोब्रागडे, राजकुमार पेशने, वशिष्ठ खोब्रागडे, रोशन दहीकर, विजय ठवरे, देवानंद भांडारकर, शिवाजी सोनवाने, प्रमोद दहिकर यांनी सहकार्य केले.यावेळी जिल्ह्यातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तहसिल कार्यालयासमोर वाहनाच्या धडकेत इसमाचा मृत्यू




देवरी,दि.२०ः- मुबंई कलकत्ता राष्ट्रीय महामार्गावरील देवरी तहसील कार्यालयासमोर आज दुपारच्या सुमारास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
सदर मृत व्यक्तीचे नाव रामचंद्र लक्ष्मण डोंगरे असे असून ते कवलेवाडा(आलेवाडा) येथील रहिवासी आहेत.अपघातानंतर रामंचंद्र डोंगरेला उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र, रुग्णालयात योग्य उपचार मिळू शकले नाही.

Monday 19 November 2018

कॅनरा बँक देवरी येथे 113वा संस्थापक दिन साजरा

देवरी:19नोव्हेंबर
देवरी येथील कॅनरा बँक मध्ये दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा बँकेचे संपादक अमेम्बल सुब्बाराव पै यांची 113 वी जयंती संस्थापक दिन म्हणून साजरी करण्यात आली. या प्रसंगी बँकेचे व्यवस्थापक पूनम लता, सह व्यवस्थापक विवेक पटले, अक्षय पटेल, प्रवीण राणे, आकाश बोनगीरवर  आणि सुनील पराते उपस्थित होते.
या प्रित्यर्थ सर्व प्रथम संपादक यांच्या प्रतिमेला आदरपूर्वक पुष्पहार वाहण्यात आले.
बँकेत आलेल्या सर्व ग्राहकांना मिठाई देण्यात आली आणि ग्राहकाची सेवा हे आमचे आद्य कर्तव्य यावेळी शाखा व्यवस्थापक बोलत होते.
यावेळी देवरीतील प्रसिद्ध उद्योगपती विष्णुप्रसाद अग्रवाल, देवराम गुणेवार, रवींद्र राठोड उपविभागीय अधिकारी, एम बी हिरुडकर खंडविकास अधिकारी, डॉ सुजित टेटे, पटसंस्थेचे ओमप्रकाश पटले, शिथिलेश मोहबिया, मेश्राम, अन्य व्यापारी व ग्राहक उपस्थित होते.
बँकेच्या कार्याबद्दल सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देण्यात आली.

Sunday 18 November 2018

गोवर रुबेला लसीकरण मोहिम यशस्वीतेसाठीसर्वांचा सहभाग आवश्यक- जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे

 २७ नोव्हेंबरपासून लसीकरण


गोंदिया दि.१८.: गोवर हा अत्यंत संक्रामक आणि घातक आजार आहे. गोवर आजाराचे निर्मुलन व रुबेला आजारावर नियंत्रण करण्यासाठी या मोहिमेची सुरुवात २७ नोव्हेंबरपासून होणार असून प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून समाजामध्ये या मोहिमेबाबत जागरुकता व सुरक्षितता निर्माण करण्यासाठी या मोहिमेत पालकांनी, शिक्षकांनी व नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले.
गोवर रुबेला लसीकरण मोहिमेसंदर्भात १५ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सभा घेण्यात आली, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.पी.बी.खंडाते, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.व्ही.पी.रुखमोडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
डॉ.बलकवडे पुढे म्हणाल्या, सर्वप्रकारच्या जिल्हास्तरीय व गाव पातळीवरील आढावा सभा तसेच कार्यशाळा घेवून आपण आपली जबाबदारी समजून गोवर रुबेला लसीकरण मोहिमेबाबत जनजागृती करुन व्यापक प्रमाणात प्रचार-प्रसिध्दी करावी. समाजामध्ये या मोहिमेबाबत जागरुकता व सुरक्षीतता निर्माण करुन प्रत्येकाने आपल्या मुला-मुलींना दोन्ही रोग होण्यापासून वाचवावे. ही मोहिम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी जिल्हा आरोग्य प्रशासनाला सहकार्य करावे, जेणेकरुन जिल्ह्यातील एकही बालक गोवर रुबेला लसीकरणापासून वंचित राहणार नाही असे त्यांनी सांगितले.
डॉ.दयानिधी म्हणाले, गोवर रुबेला लसीकरण मोहिमेअंतर्गत ९ महिने ते १५ वर्षापर्यंत जवळपास ३,६०,०३५ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. निश्चित लाभार्थीपैकी जरी या अगोदर गोवर रुबेला लस दिली असेल तरी त्या बालकांना लसीकरण करावयाचे आहे. मोहिमेचा शुभारंभ २७ नोव्हेंबर रोजी झाल्यानंतर ४ ते ५ आठवड्याच्या कालावधीत मोहीम पूर्ण करण्यात येणार आहे. निर्धारित करण्यात आलेल्या एकूण लाभार्थीपैकी ६० ते ६५ टक्के लाभार्थी हे शाळेत जाणारे विद्यार्थी असल्यामुळे आरोग्य विभागाच्या मदतीने सर्व शाळांमध्ये पहिल्या २ ते ३ आठवड्यात लसीकरण सत्र आयोजित करण्यात येणार आहे. त्यानंतर उर्वरित ३५ ते ४० टक्के लाभार्थीचे लसीकरण अंगणवाडी केंद्र व नियमीत लसीकरण सत्राच्या किंवा उपकेंद्राच्या ठिकाणी करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
डॉ.निमगडे म्हणाले, गोवर हा अत्यंत संक्रामक आणि घातक आजार असून मुख्यत: १५ वर्षाखालील मुलांना होतो. सन २०१६ च्या आकडेवारीनुसार गोवर आजारामुळे जवळपास ४९२०० मुले संपूर्ण भारतामध्ये दरवर्षी मृत्यूमुखी पडतात. रुबेला या आजाराचा संसर्ग गर्भवती स्त्रीयांना झाला तर त्यामुळे अचानक गर्भपात किंवा जन्मजात दोष (अंधत्व,बहिरेपणा व हृदयविकृती) होऊ शकते. सध्या गोवर व रुबेला हे आजार बालकांच्या दृष्टीने सर्वात हानीकारक आजार आहे. याकरीता भारत सरकारने सन २०२० पर्यंत गोवर या आजाराचे निर्मुलन व रुबेला या आजाराचे नियंत्रण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. आजपर्यंत २१ राज्यात हे लसीकरण झालेले असून ४० कोटी बालकांना लस देण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातील ६ कोटी ७ लाख बालकांना २७ नोव्हेंबरपासून लस देण्यात येणार असून त्यात गोंदिया जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे. लसीकरण मोहिमेअंतर्गत सर्व लाभार्थ्याला गोवर रुबेला लसीचे एक इंजेक्शन देण्यात येणार असून ग्रामीण व नागरी भागामध्ये १०० टक्के लाभार्थ्यांना लसीकरण करणे आवश्यक आहे असे त्यांनी सांगितले.
सभेला उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुषार पवनीकर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.विशाल काळे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.वेदप्रकाश चौरागडे, उपशिक्षणाधिकारी (प्राथ.) एल.एम.मोहबंशी, लायन्स क्लबतर्फे प्रमोद गुळधे, खाजगी शाळा कार्यकारी समितीचे अध्यक्ष व्ही.डी.मेश्राम, नर्सींग स्कूलच्या प्रभारी श्रीमती शहारे, जागतिक आरोग्य संघटनेचे आरआरटी डॉ.एफ.ए.मेश्राम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सी.डब्ल्यू.वंजारे, डॉ.शितल मोहने व डॉ.हर्षवर्धन मेश्राम उपस्थित होते. सभेचे संचालन जिल्हा माताबालसंगोपन अधिकारी डॉ.अनंत चांदेकर यांनी केले. उपस्थितांचे आभार अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.वेदप्रकाश चौरागडे यांनी मानले. सभेच्या यशस्वीतेसाठी आरोग्य सहायक ए.एस.वंजारी यांनी सहकार्य केले.

मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार : विखे-पाटील




मुंबई,दि.18 : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवरून मागासवर्गीय आयोगाचा अहवाल सभागृहात सादर होण्यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता आंदोलन करू नका, एक डिसेंबरला जल्लोष करा, असे वक्तव्य केले होते. त्यांचे हे वक्तव्य सभागृहाचा हक्कभंग करणारे आहे. त्यामुळे येत्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणू, अशी भूमिका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मांडली.
मुंबईतील आझाद मैदानावर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आरक्षणासह विविध मागण्यासांठी उपोषण सुरु करण्यात आले आहे. या उपोषणकर्त्यांना भेटल्यानंतर विखे-पाटील माध्यमांसमोर बोलत होते. ते म्हणाले, ”मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलनकर्ते गेल्या 16 दिवसांपासून उपोषणास बसले आहेत. सरकारचा हा कोडगेपणा आहे. सरकारकडून जाणीवपूर्वक त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. मंत्री येथे फिरकायला तयार नाहीत. ते समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत”.दरम्यान, गेल्या 16 दिवसांपासून हे आंदोलनकर्ते विविध मागण्यांसाठी उपोषणास बसले असून, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याशिवाय कोणीही त्यांची भेट घेतली नाही, असेही ते म्हणाले.

राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलन २६ पासून चिंचपूर येथे




अमरावती,दि.18ः- राष्ट्रसंत तुकडोजी विचार साहित्य संमेलन समिती, श्री गुरुदेव अध्यात्म गुरुकुल गुरुकुंज व श्री गुरुदेव सेवा मंडळ चिंचपूर यांच्या संयुक्त विद्यमाने सोळावे राष्ट्रसंत तुकडोजी विचार साहित्य संमेलन २६ व २७ नोव्हेंबरदरम्यान आयोजित करण्यात आले आहे. कर्मयोगी तुकारामदादा गीताचार्य साहित्यनगरी, चिंचपूर, तालुका धामणगाव रेल्वे, जिल्हा अमरावती येथे होणाऱ्या या संमेलनाचे अध्यक्ष राष्ट्रीय प्रबोधनकार व सप्तखंजेरीवादक भाऊसाहेब थुटे राहणार आहेत.
सोमवारी, २६ तारखेला राष्ट्रसंत तुकडोजी विचार प्रबोधन दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी २७ तारखेला सकाळी ८ वाजता साहित्य दिंडीने संमेलनाला प्रारंभ होणार आहे. संमेलनाचे उद्घाटन सकाळी ९.१५ वाजता रोजगार संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. संजय नाथे यांच्या हस्ते होणार आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष श्री गुरुदेव सेवा मंडळाचे मुकेश कोल्हे, रवीदादा मानव, चंद्रकात मोहिते, देविदास लाखे, रामपाल धारकर, पंकजपाल राठोड, आंनदपाल अबर्ते यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. संमेलनात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवाव्रती पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे. यावर्षीच्या या पुरस्काराचे मानकरी मतीन शंकर भोसले, त्र्यंबक गुलाब गायकवज्ञउ, मकरंद रमेशचंद्र खेडकर आहेत.
दुपारी १२ वाजता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या साहित्यातून अंधश्रद्धा, अंधरुढ्या निर्मूलन, आदर्श लोकशाही, आदर्श शिक्षक, आदर्श विद्यार्थी, ग्रामगीतेतून रोजगाराच्या संधी, खरी ग्रामसभा, महिलोन्नती, सण उत्सव या विषयावर परिसंवाद होणार आहे. रवीदादा मानव, हनुमंत ठाकरे, राज घुमनार, आनंद साळुके, हेमंत टाले, रक्षा ठाकरे, नरेश इंगळे यांचा सहभाग राहील. त्यानंतर कविसंमेलन होणार आहे.

Saturday 17 November 2018

एसटीची रुग्णवाहिकेला जबर धडक, वृद्धेचा मृत्यू, ३ जखमी

गोंदिया - जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातून जाणाऱ्या तिरोडा नागपूर महामार्गावर आज एसटी बसने रुग्णवाहिकेला जोरदार धडक दिली. या धडकेत रुग्णवाहिकेतील एका वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू तर तीन जण जखमी झाले आहेत. जखमींना गोंदियातील सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे. 

तिरोडा येथून एका खासगी रुग्णालयातून रुग्णाला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला एसटी बसने तिरोडा तालुक्यातील सरांडी गावाजवळ सांयकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान धडक दिली. या धडकेत रुग्णवाहिकेतील ७५ वर्षीय महिला रूग्ण अंजनाबाई सहारे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. रुग्णवाहिकेचा चालक राजा कारेकर आणि मृताची मुलगी आणि मुलगा हे देखील या अपघातात जखमी झाले. त्यांच्यावर गोंदिया येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे.

सहावे राज्यस्तरीय ओबीसी सम्मेलन तिगाव येथे उद्या १८ नोव्हेंबरला



कवी संमेलनासह,शेतकरी-कामगारप्रश्नावर होणार चर्चा

विदर्भाच्या बहिणाबाई अंजणाबाई खुणेंचा होणार सत्कार

आमगाव,दि.17(पराग कटरे),-ओबीसी सेवा संघाच्या वतीने संवैधानिक भारत राष्ट्र निर्माण अभियानांतर्गत सहावे राज्यस्तरीय ओबीसी साहित्य सम्मेलन व संगीतमय प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन आमगाव तालुक्यातील तिगाव येथे उद्या रविवार १८ नोव्हेंबरला सकाळी ९ वाजता करण्यात आले आहे. 
या कार्यक्रमाचे उद्घाटन समता प्रकाशनाचे संपादक प्रदीप गायकवाड यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ओबीसी सेवा संघाचे संस्थापक इंजि.प्रदिप ढोबळे हे राहणार आहेत. या सम्मेलनात विदर्भाच्या बहिणाबाई जेष्ठ कवियत्री अंजनाबाई खुणे यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
सकाळी ९ वाजता समेलनाची सुरवात संविधान ग्रंथदिंडीने होणार असून सकाळी ११ वाजता पहिल्या सत्राला सुरवात होणार आहे. या सत्रामध्ये भारतीय संविधान, ओबीसी, शेतकरी-कामगारांचे प्रश्न व साहित्य या विषयावर चर्चा होणार असून ओबीसी सेवासंघ जिल्हा सचिव दिनेश तिरेले हे भूमिका मांडणार आहेत. तर मार्गदर्शक म्हणून साहित्यिक,नाटककार,कवी प्रा. ज्ञानेश वाकुडकर उपस्थित राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून ओबीसी संघर्ष कृती समितीचे जिल्हाध्यक्ष बबलू कटरे, पं.स.सदस्य अशोक पटले, ओबीसी महिला संघाच्या जिल्हाध्यक्ष पुष्पा खोटेले,कन्हैया बोपचे,स्वागताध्यक्ष म्हणून तिगावंचे सरपंच नरेंद्र शिवणकर उपस्थित राहणार आहेत.
दुसऱ्या सत्रामध्ये दुपारी २ वाजता शिक्षण रोजगार,शेती,भ्रष्टाचार,आरक्षण,महिला उत्पीडन,सामाजिक-शैक्षणिक क्षेत्रातील वास्तव्यदर्शन घडविणाऱ्या कवितांचे वाचन कवी संमेलनातून केले जाणार आहे. या कार्यक्रमात नांदेड जिल्हा ओबीसी सेवा संघाचे अध्यक्ष श्रीनीवास मस्के,अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे विदर्भ अध्यक्ष मिलिंद रंगारी,कवी चंद्रकुमार बहेकार,मेघराज मेश्राम,महेंद्र सोनवाने,दिपक बहेकार,पवन पाथोडे,राहुल हटवार,देवेंद्र रहागंडाले,असीम आमगावी,सागर बिसेन,इंद्रकला बोपचे,लोकेश नागरीकर कविता सादर करणार आहेत.या सत्राचे अध्यक्ष ओबीसी सेवा संघाचे राज्यउपाध्यक्ष सावन कटरे हे राहणार आहेत. सायंकाळी ५ वाजता इंजि.प्रदिप ढोबळे लिखित मुख्यमंत्री या दोन अंकी नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. तर सायकांळी ७ वाजता सप्तखंजिरीवादक इंजि.भाऊ थुटे यांच्या संगीतमय प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय वानखेडे उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा.बी.एम.करमकर राहणार आहेत. दीपप्रज्वलक म्हणून अनिल बिसेन, विशेष अतिथी म्हणून बेरार टाईम्सचे संपादक खेमेंद्र कटरे, योगेश शिवणकर,जि.प. सदस्य जियालाल पंधरे, उपसरपंच अजय बिसेन, प्रवण पठ्ठे, रविंद्र शहारे, मोहम्मद रफीक शेख उपस्थित राहणार आहेत. या संमेलनाच्या आयोजनासाठी ओबीसी सेवा संघ व ओबीसी संघर्ष कृती समितीचे सर्व पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.

देवरी येथे वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही


देवरी, दि.17-   विना हेल्मेट दुचाकी चालवून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर देवरी पोलिसांनी दंडात्मक कार्यवाही करीत सुमारे 22 हजारांचा दंड वसूल केला. सदर कार्यवाही ही गेल्या गुरूवारी (दि.15) रोजी देवरी येथे करण्यात आली.
 रस्ता अपघातामध्ये मृत्यू पावणाऱ्यांमध्ये मोठ्याप्रमाणावर दुचाकीचालकांचा समावेश असून हा आकडा खाली आणण्याच्या उद्देशाने गोंदिया जिल्हा पोलिस अधीक्षक हरिष बैजल यांनी जिल्ह्यात गेल्या 15 आक्टोबरपासून हेल्मेट शक्तीच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत. त्यानुसार सध्या जिल्हा पोलिस वाहतूक विभाग त्यावर अमलबजावणी करीत असून ठिकठिकाणी विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्यांवर कार्यवाही करून दंड वसूल करण्यात येत आहे. अशीच कार्यवाही देवरी पोलिसांच्या वतीने गेल्या गुरूवारी देवरीत करण्यात आली. यामध्ये  सुमारे 45 दुचाकीस्वारांवर कार्यवाही करण्यात आली. या कार्यवाहीत  वाहनचालकांवर तडजोड रक्कम(दंड) आकारत सुमारे 22 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सदर कार्यवाही देवरी पोलिसांनी ठाणेदार कमलेश बच्छाव आणि सहायक पोलिस निरीक्षक सचिन ढोके यांचे नेतृत्वात करण्यात आली.

लालूप्रसाद यादव यांची प्रकृती खालावली




रांची,दि.16(वृत्तसंस्था) : चारा घोटाळ्यातील चार प्रकरणांमध्ये तुरुंगात असलेले राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांची प्रकृती कमालीची खालावली आहे. त्यांना चालता येत नसून पायावर खोलवर जखमा आणि सूज आल्याचे सुत्रांनी लेसांगित.
तसेच त्यांची किंडनीही काम करत नसल्याने त्यांना दुसरीकडे हलविण्यात येणार असल्याचे समजते. रांचीतील रिम्स रुग्णालयात लालू यांच्यावर वरिष्ठ डॉक्टर उमेश प्रसाद यांनी ही माहिती दिली आहे. गेल्या तीन दिवसांपासून लालू यांची प्रकृती खालावत आहे. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्या पायांवर खोलवर जखमा झाल्याने चिंता आणखी वाढल्या आहेत. लालू यांची किडनी काम करत नसल्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तविली आहे. त्यांची क्रिटनिन पातळी 1.85 वर पोहोचली आहे. मधुमेहही 190 वर पोहोचला आहे. रिम्समध्ये लालू यांच्यावर उपचार करणे डॉक्टरांना दिवसेंदिवस कठीण जात असून पुढील दोन-तीन दिवसांत त्यांची प्रकृती सुधारली नाही तर राज्याबाहेरील मोठ्या रुग्णालयात पाठविण्यात येण्याची शक्यता आहे.

सिरोंचा एसडीपीओंच्या कार्यप्रणाली विरोधात महसूल कर्मचारी संघटनेचे लेखणीबंद आंदोलन


गडचिरोली(जिल्हाप्रतिनिधी)दि.16 : महसूल कर्मचाऱ्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या सिरोंचा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी,या मागणीला घेऊन महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या आवाहनावर आज शुक्रवारला गडचिरोली जिल्ह्यातील सर्व तहसिल कार्यालयासह जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी काळ्याफिती लावून लेखणीबंद आंदोलन केले.
त्याआधी महसूल कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी गडचिरोली येथे पत्रकार परिषद घेऊन झालेल्या प्रकाराची माहिती देत निषेध नोंदविला होता.त्या पत्रपरिषदेला यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंदू प्रधान, कार्याध्यक्ष वनिश्याम येरमे, डी. एम. दहिकर, एस. एस. बारसागडे, किशोर मडावी, झेमानंद मेश्राम, विकास कुमरे आदी उपस्थित होते.आज जिल्हाधिकारी कार्यालयास सह जिल्ह्यातील सर्वच कर्मचारी यानी लेंखणीबंद आंदोलन केले.दरम्यान सिरोंचा तहसिल कार्यालयात आज दिवसभर कुणीही कर्मचारी आपल्या कार्यालयातील टेबलावर हजर नसल्याचे चित्र बघावयास मिळाले.

सविस्तर असे की, १ नोव्हेंबर रोजी महसूल विभागाच्या वतीने रात्री १२ वाजतापासून कारवाई करीत तेलंगणा राज्यातून मेडीगड्डा प्रकल्पासाठी अवैध गोणखनिजाची वाहतूक करताना १० ट्रक जप्त करण्यात आले. त्यानंतर सदर ट्रक सिरोंचाच्या पोलीस ठाण्यात पहाटे ४ वाजता देण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी २ नोव्हेंबरला सिरोंचाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सायंकाळी ६.१५ वाजताच्या सुमारास सिरोंचाच्या तहसील कार्यालयात दोन अज्ञात व्यक्ती व पोलीस पथकासह आले. यावेळी सिरोंचाचे तहसीलदार शासकीय दौऱ्यावर होते. यावेळी तिथे गौणखनिज जप्त प्रकरणी कार्यवाही करण्यासाठी उपस्थित असलेल्या तलाठी रवी मेश्राम व गजभिये यांना एसडीपीओंनी अर्वाच्च भाषेत शिविगाळ करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला, अशी तक्रार जिल्हाधिकारी यांना निवेदनातून करण्यात आली होती.त्या मुद्याला घेत महसूल  संघटनेचे जिल्हा अध्यक्ष चंदू प्रधान यांनी याबाबतची लेखी तक्रार संबंधितांनी संघटनेकडे केली. त्यामुळे आपण संघटनेच्या माध्यमातून त्यांना न्याय देण्यासाठी पुढाकार घेत आहोत, असे प्रधान यांनी सांगितले होते. या प्रकरणी संबंधित उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्याकडे करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले. सदर शिवीगाळ प्रकरणी कारवाईच्या मागणीसाठी संघटनेच्या वतीने १४ नोव्हेंबरपासून कर्मचाऱ्यांच्या काळ्या फिती आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

Sunday 11 November 2018

हजारो गोवारी बांधव धडकले आमदार निवासावर

देवरी/पुराडा, दि.11
सूत्राच्या माहिती नुसार आज दुपारी हजाराच्या संख्येत गोवारी बांधव आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय पुराम यांच्या निवासस्थानी धडकल्याचे वृत्त आहे. यामध्ये गोवारी समाजाला न्याय मिळवून दिल्याचे आश्वासन वेळोवेळी दिल्याचे बोलले जाते परंतु आता पर्यंत मागण्या पूर्ण न झाल्याने सदर हजारो समाज बांधव संजय पुराम यांच्या निवास स्थानी धडकले आणि मागण्या पूर्ण करण्यासाठी निवेदन दिले.
यावेळी संजय पुराम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क केला परंतु त्यांनी प्रतिसाद न दिल्याचे वृत्त प्रत्येक्षदर्शी बेरार टाइम्स बोलतांना सांगीतले.

Sunday 4 November 2018

अन्न औषध विभागाच्या तपासणीत नकली,तेल,दुध पावडरचे नमुने ताब्यात

गोंदिया,दि.04ः- अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने दिवाळीच्या दरम्यान विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.विशेष म्हणजे मिठाईच्या नावावर परराज्यातून आलेल्यांनी जागोजागी दुकांनी थाटली असली तरी त्या दुकांनाची मात्र चौकशी आणि त्यांच्या पदार्थाची तपासणीची मोहीम विभाग कधी राबविणार याकडेही लक्ष लागले असतनाच सह आयुक्त  शशिकांत केकरे यांच्या मार्गदर्शनात, सहायक आयुक्त  ना.रा.सरकटे यांच्या नेतृत्वात अन्न सुरक्षा अधिकारी अ.दा. राऊत, पि.व्ही.मानवतकर यांनी जिल्ह्यात मोहीम राबवून 17 नमुने तपासासाठी घेतले आहेत.त्यामध्ये नकलीतेलासह दुध व पावडरचाही समावेश आहे.
अन्न औषध प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यातील देवरी येथील प्रदीप डेली नीडस मधून मदर डेअरी लिव्ह लाईट डबल टोनड मिल्क व एबीस नॅचरल टोन्ड मिल्क त्याचप्रमाणे देवरी येथीलच आर.के.ट्रेडर्स मधून प्रसाद भोग ,मटर, डाळ, बेसन व दिनशॉ तूप या अन्न पदार्थाचे नमुणे चौकशीसाठी व तपासणीकरीता ताब्यात घेतले असून त्या पदार्थाचा तपासणी अहवालाकडे लक्ष लागले आहे.
जिल्यातील धापेवाडा महालगाव हे खोव्यासाठी प्रसिद्ध असल्याने महालगाव येथील आगाशे यांच्याकडील खोव्याचा नमुना तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले.गोंदिया शहरात तेलाचा मोठा काळाबाजार सुरु असून या काळाबाजार सरकारी विभागही सहभागी असल्याची चर्चा असतानाच गोंदिया येथील गुरूंनानक तेल भांडार, गौशाला वॉर्ड येथून प्रेस्टीज ब्रांडच्या नावावर तयार करण्यात आलेले Prestige brand 94 लिटर refined soyabean  तेल 12 हजार 220 रुपयाचे जप्त करण्यात आले आहे. शुभम ट्रेडर्स रिंग रोड गोंदिया येथील पनीर, क्रीम, व्हे पावडर,स्किम्ड मिल्क पावडरचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले.तसेच 8 हजार किमतीचा 48 किलो स्किम्ड मिल्क पॉवडर व 19 हजार 110 रुपयाचा 273 किलो व्हे पावडरही जप्त करण्यात आला आहे.सुनील ऑइल मिल मधून वनस्पती व refined soyabean तेलाचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले.
आमगाव येथील बिकानेर दूकानातू चांदी वर्क व बेसनचे नमुने,सुरेश ट्रेडर्स येथुन blended edilble vegitable  तेलाचे नमुने अन्न औषध प्रशासनाने ताब्यात घेतले.तपासादरम्यान 17 नमुने तपासासाठी घेतले असून या अहवालाकडे लक्ष लागले आहे.सणासुदीच्या काळात मोठ्याप्रमाणात बाजारात दरवर्षी नकली तेल,मिठाई आदी अन्न औषधांची विक्री होत असून त्यांच्यावर पाहिजे तसा वचक विभागाचा का नाही हे कळायला मार्ग राहिलेले नाही.

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...