गोंदिया - जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातून जाणाऱ्या तिरोडा नागपूर महामार्गावर आज एसटी बसने रुग्णवाहिकेला जोरदार धडक दिली. या धडकेत रुग्णवाहिकेतील एका वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू तर तीन जण जखमी झाले आहेत. जखमींना गोंदियातील सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
तिरोडा येथून एका खासगी रुग्णालयातून रुग्णाला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला एसटी बसने तिरोडा तालुक्यातील सरांडी गावाजवळ सांयकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान धडक दिली. या धडकेत रुग्णवाहिकेतील ७५ वर्षीय महिला रूग्ण अंजनाबाई सहारे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. रुग्णवाहिकेचा चालक राजा कारेकर आणि मृताची मुलगी आणि मुलगा हे देखील या अपघातात जखमी झाले. त्यांच्यावर गोंदिया येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे.
No comments:
Post a Comment