गडचिरोली(जिल्हाप्रतिनिधी)दि.16 : महसूल कर्मचाऱ्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या सिरोंचा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी,या मागणीला घेऊन महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या आवाहनावर आज शुक्रवारला गडचिरोली जिल्ह्यातील सर्व तहसिल कार्यालयासह जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी काळ्याफिती लावून लेखणीबंद आंदोलन केले.
त्याआधी महसूल कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी गडचिरोली येथे पत्रकार परिषद घेऊन झालेल्या प्रकाराची माहिती देत निषेध नोंदविला होता.त्या पत्रपरिषदेला यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंदू प्रधान, कार्याध्यक्ष वनिश्याम येरमे, डी. एम. दहिकर, एस. एस. बारसागडे, किशोर मडावी, झेमानंद मेश्राम, विकास कुमरे आदी उपस्थित होते.आज जिल्हाधिकारी कार्यालयास सह जिल्ह्यातील सर्वच कर्मचारी यानी लेंखणीबंद आंदोलन केले.दरम्यान सिरोंचा तहसिल कार्यालयात आज दिवसभर कुणीही कर्मचारी आपल्या कार्यालयातील टेबलावर हजर नसल्याचे चित्र बघावयास मिळाले.
सविस्तर असे की, १ नोव्हेंबर रोजी महसूल विभागाच्या वतीने रात्री १२ वाजतापासून कारवाई करीत तेलंगणा राज्यातून मेडीगड्डा प्रकल्पासाठी अवैध गोणखनिजाची वाहतूक करताना १० ट्रक जप्त करण्यात आले. त्यानंतर सदर ट्रक सिरोंचाच्या पोलीस ठाण्यात पहाटे ४ वाजता देण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी २ नोव्हेंबरला सिरोंचाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सायंकाळी ६.१५ वाजताच्या सुमारास सिरोंचाच्या तहसील कार्यालयात दोन अज्ञात व्यक्ती व पोलीस पथकासह आले. यावेळी सिरोंचाचे तहसीलदार शासकीय दौऱ्यावर होते. यावेळी तिथे गौणखनिज जप्त प्रकरणी कार्यवाही करण्यासाठी उपस्थित असलेल्या तलाठी रवी मेश्राम व गजभिये यांना एसडीपीओंनी अर्वाच्च भाषेत शिविगाळ करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला, अशी तक्रार जिल्हाधिकारी यांना निवेदनातून करण्यात आली होती.त्या मुद्याला घेत महसूल संघटनेचे जिल्हा अध्यक्ष चंदू प्रधान यांनी याबाबतची लेखी तक्रार संबंधितांनी संघटनेकडे केली. त्यामुळे आपण संघटनेच्या माध्यमातून त्यांना न्याय देण्यासाठी पुढाकार घेत आहोत, असे प्रधान यांनी सांगितले होते. या प्रकरणी संबंधित उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्याकडे करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले. सदर शिवीगाळ प्रकरणी कारवाईच्या मागणीसाठी संघटनेच्या वतीने १४ नोव्हेंबरपासून कर्मचाऱ्यांच्या काळ्या फिती आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment