कवी संमेलनासह,शेतकरी-कामगारप्रश्नावर होणार चर्चा
विदर्भाच्या बहिणाबाई अंजणाबाई खुणेंचा होणार सत्कार
आमगाव,दि.17(पराग कटरे),-ओबीसी सेवा संघाच्या वतीने संवैधानिक भारत राष्ट्र निर्माण अभियानांतर्गत सहावे राज्यस्तरीय ओबीसी साहित्य सम्मेलन व संगीतमय प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन आमगाव तालुक्यातील तिगाव येथे उद्या रविवार १८ नोव्हेंबरला सकाळी ९ वाजता करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन समता प्रकाशनाचे संपादक प्रदीप गायकवाड यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ओबीसी सेवा संघाचे संस्थापक इंजि.प्रदिप ढोबळे हे राहणार आहेत. या सम्मेलनात विदर्भाच्या बहिणाबाई जेष्ठ कवियत्री अंजनाबाई खुणे यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

दुसऱ्या सत्रामध्ये दुपारी २ वाजता शिक्षण रोजगार,शेती,भ्रष्टाचार,आरक्षण,महिला उत्पीडन,सामाजिक-शैक्षणिक क्षेत्रातील वास्तव्यदर्शन घडविणाऱ्या कवितांचे वाचन कवी संमेलनातून केले जाणार आहे. या कार्यक्रमात नांदेड जिल्हा ओबीसी सेवा संघाचे अध्यक्ष श्रीनीवास मस्के,अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे विदर्भ अध्यक्ष मिलिंद रंगारी,कवी चंद्रकुमार बहेकार,मेघराज मेश्राम,महेंद्र सोनवाने,दिपक बहेकार,पवन पाथोडे,राहुल हटवार,देवेंद्र रहागंडाले,असीम आमगावी,सागर बिसेन,इंद्रकला बोपचे,लोकेश नागरीकर कविता सादर करणार आहेत.या सत्राचे अध्यक्ष ओबीसी सेवा संघाचे राज्यउपाध्यक्ष सावन कटरे हे राहणार आहेत. सायंकाळी ५ वाजता इंजि.प्रदिप ढोबळे लिखित मुख्यमंत्री या दोन अंकी नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. तर सायकांळी ७ वाजता सप्तखंजिरीवादक इंजि.भाऊ थुटे यांच्या संगीतमय प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय वानखेडे उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा.बी.एम.करमकर राहणार आहेत. दीपप्रज्वलक म्हणून अनिल बिसेन, विशेष अतिथी म्हणून बेरार टाईम्सचे संपादक खेमेंद्र कटरे, योगेश शिवणकर,जि.प. सदस्य जियालाल पंधरे, उपसरपंच अजय बिसेन, प्रवण पठ्ठे, रविंद्र शहारे, मोहम्मद रफीक शेख उपस्थित राहणार आहेत. या संमेलनाच्या आयोजनासाठी ओबीसी सेवा संघ व ओबीसी संघर्ष कृती समितीचे सर्व पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.
No comments:
Post a Comment