गोंदिया,दि.20- स्थानिक पिंडकेपार मार्गावरील जैन कलार समाज भवनात जैन कलार समाजाचे आराध्य दैवत राज राजेश्वर कार्तवीर्य भगवान सहस्त्रबाहू यांची जयंती मोठ्या उत्साहात रविवारी (दि.18) साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गोंदिया येथील जैन कलार समाजाचे समाजाचे अध्यक्ष तेजराम मोरघडे हे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तिरोडा न.प.चे उपाध्यक्ष सुनील पालांदुरकर, माजी समाजाध्यक्ष काशीनाथ सोनवाने, कोसरे कलार समाजाचे अध्यक्ष तीर्थराज उके, माजी उपाध्यक्ष ओंकार लिचडे, हरिराम भांडारकर, सचिव सुखराम खोब्रागडे, उपाध्यक्ष शालीकराम लिचडे, युवा अध्यक्ष चंद्रशेखर लिचडे, सदस्य लालचंद भांडारकर प्रामुख्याने उपस्थित होते
सर्व प्रथम मान्यवरांच्या हस्ते माता जैनादेवी व भगवान सहत्रबाहु च्या छायाचित्राला माल्यार्पण व दिप प्रज्वलीत करण्यात आले. भगवान सहत्रबाहु यांनी समाजासाठी केलेल्या कार्याबद्दल व समाजाच्या वाटचालीबद्दल आपल्या प्रास्ताविकेतून सचिव सुखराम खोब्रागडे यांनी माहिती दिली. यावेळी मान्यवरांनी उपस्थितांना समयोचित मार्गदर्शन केले
सूत्रसंचालन उमेश भांडारकर यांनी केले. उपस्थितांचे आभार पुष्पा भांडारकर यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सुखराम हरडे, श्याम लिचडे, दीपक रामटेक्कर, मनोज भांडारकर, विणा सोनवाने, यशोधरा सोनवाने, प्राजक्ता रणदिवे, सीमा इटानकर, गीता दहिकर, हर्षा आष्टीकर, शालिनी हरडे, उषा मोरघडे, रेखा कावळे, वर्षा तिडके, ज्योती किरणापूरे, वच्छला पालांदूरकर, अनिता मुरकुटे, चेतना रामटेक्कर,मनोज किरणापूरे, सचिन पालांदूरकर, अतुल खोब्रागडे, राजकुमार पेशने, वशिष्ठ खोब्रागडे, रोशन दहीकर, विजय ठवरे, देवानंद भांडारकर, शिवाजी सोनवाने, प्रमोद दहिकर यांनी सहकार्य केले.यावेळी जिल्ह्यातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment