Sunday 18 November 2018

राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलन २६ पासून चिंचपूर येथे




अमरावती,दि.18ः- राष्ट्रसंत तुकडोजी विचार साहित्य संमेलन समिती, श्री गुरुदेव अध्यात्म गुरुकुल गुरुकुंज व श्री गुरुदेव सेवा मंडळ चिंचपूर यांच्या संयुक्त विद्यमाने सोळावे राष्ट्रसंत तुकडोजी विचार साहित्य संमेलन २६ व २७ नोव्हेंबरदरम्यान आयोजित करण्यात आले आहे. कर्मयोगी तुकारामदादा गीताचार्य साहित्यनगरी, चिंचपूर, तालुका धामणगाव रेल्वे, जिल्हा अमरावती येथे होणाऱ्या या संमेलनाचे अध्यक्ष राष्ट्रीय प्रबोधनकार व सप्तखंजेरीवादक भाऊसाहेब थुटे राहणार आहेत.
सोमवारी, २६ तारखेला राष्ट्रसंत तुकडोजी विचार प्रबोधन दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी २७ तारखेला सकाळी ८ वाजता साहित्य दिंडीने संमेलनाला प्रारंभ होणार आहे. संमेलनाचे उद्घाटन सकाळी ९.१५ वाजता रोजगार संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. संजय नाथे यांच्या हस्ते होणार आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष श्री गुरुदेव सेवा मंडळाचे मुकेश कोल्हे, रवीदादा मानव, चंद्रकात मोहिते, देविदास लाखे, रामपाल धारकर, पंकजपाल राठोड, आंनदपाल अबर्ते यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. संमेलनात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवाव्रती पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे. यावर्षीच्या या पुरस्काराचे मानकरी मतीन शंकर भोसले, त्र्यंबक गुलाब गायकवज्ञउ, मकरंद रमेशचंद्र खेडकर आहेत.
दुपारी १२ वाजता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या साहित्यातून अंधश्रद्धा, अंधरुढ्या निर्मूलन, आदर्श लोकशाही, आदर्श शिक्षक, आदर्श विद्यार्थी, ग्रामगीतेतून रोजगाराच्या संधी, खरी ग्रामसभा, महिलोन्नती, सण उत्सव या विषयावर परिसंवाद होणार आहे. रवीदादा मानव, हनुमंत ठाकरे, राज घुमनार, आनंद साळुके, हेमंत टाले, रक्षा ठाकरे, नरेश इंगळे यांचा सहभाग राहील. त्यानंतर कविसंमेलन होणार आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...