मुंबई,दि.18 : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवरून मागासवर्गीय आयोगाचा अहवाल सभागृहात सादर होण्यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता आंदोलन करू नका, एक डिसेंबरला जल्लोष करा, असे वक्तव्य केले होते. त्यांचे हे वक्तव्य सभागृहाचा हक्कभंग करणारे आहे. त्यामुळे येत्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणू, अशी भूमिका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मांडली.
मुंबईतील आझाद मैदानावर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आरक्षणासह विविध मागण्यासांठी उपोषण सुरु करण्यात आले आहे. या उपोषणकर्त्यांना भेटल्यानंतर विखे-पाटील माध्यमांसमोर बोलत होते. ते म्हणाले, ”मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलनकर्ते गेल्या 16 दिवसांपासून उपोषणास बसले आहेत. सरकारचा हा कोडगेपणा आहे. सरकारकडून जाणीवपूर्वक त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. मंत्री येथे फिरकायला तयार नाहीत. ते समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत”.दरम्यान, गेल्या 16 दिवसांपासून हे आंदोलनकर्ते विविध मागण्यांसाठी उपोषणास बसले असून, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याशिवाय कोणीही त्यांची भेट घेतली नाही, असेही ते म्हणाले.
No comments:
Post a Comment