देवरी,दि.२८- देवरी पंचायत समिती अंतर्गत शिक्षण विभागाच्या वतीने दोन दिवसीय तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन चिचगड येथे उद्या (दि.२९) करण्यात आले आहे.
चिचगडच्या श्रीराम विद्यालयात आयोजित या प्रदर्शनाचे उद्घाटन देवरी पंचायत समितीच्या सभापती सुनंदा बहेकार यांच्या अध्यक्षतेत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अल्ताफ हमीद यांचे हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून चिचगडचे सरपंच कल्पना गोस्वामी,देवरी पंसचे उपसभापती गणेश सोनबाईर, जि.प.सदस्य दीपकसिंह पवार, उषा शहारे, माधुरी कुंभरे,सरिता रहांगडाले, पं.स.सदस्य महेंद्र मेश्राम,गणेश तोफे, संगीता भेलावे, मेहतर कोराम, देवकी मरई, अर्चना ताराम, नरेंद्र मडावी, लखमी सलामे, गटशिक्षणाधिकारी डी बी साकुरे, विस्तार अधिकारी आर एस येटरे, डी.बी, दिघोरे, केंद्रप्रमुख वाय एम कोल्हारे, ठाणेदार भास्कर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या प्रदर्शनाचे बक्षीस वितरण शुक्रवारी (दि.३०) दुपारी १२ वाजता करण्यात येणार आहे. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी आलेवाडाचे मुख्याध्यापक विनोद गिèहेपुंजे हे राहणार आहे. देवरीचे गटविकास अधिकारी मनोज हिरुडकर यांचे हस्ते विजेत्यांना पुरस्कार दिल्या जातील. यावेळी विस्तार अधिकारी येटरे, दिघोरे, केंद्रप्रमुख शेंडे, बोपचे, येळणे, बैस, सूर्यवंशी, लंजे, उईके, बंसोड, गजभिये, शिवकुमार राऊत, विषय तज्ज्ञ उमेश भरणे, धनवंतराव कावळे, एस टी मस्के, एस ए वलथरे, आर टी शेंद्रे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
No comments:
Post a Comment