Sunday, 4 November 2018

अन्न औषध विभागाच्या तपासणीत नकली,तेल,दुध पावडरचे नमुने ताब्यात

गोंदिया,दि.04ः- अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने दिवाळीच्या दरम्यान विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.विशेष म्हणजे मिठाईच्या नावावर परराज्यातून आलेल्यांनी जागोजागी दुकांनी थाटली असली तरी त्या दुकांनाची मात्र चौकशी आणि त्यांच्या पदार्थाची तपासणीची मोहीम विभाग कधी राबविणार याकडेही लक्ष लागले असतनाच सह आयुक्त  शशिकांत केकरे यांच्या मार्गदर्शनात, सहायक आयुक्त  ना.रा.सरकटे यांच्या नेतृत्वात अन्न सुरक्षा अधिकारी अ.दा. राऊत, पि.व्ही.मानवतकर यांनी जिल्ह्यात मोहीम राबवून 17 नमुने तपासासाठी घेतले आहेत.त्यामध्ये नकलीतेलासह दुध व पावडरचाही समावेश आहे.
अन्न औषध प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यातील देवरी येथील प्रदीप डेली नीडस मधून मदर डेअरी लिव्ह लाईट डबल टोनड मिल्क व एबीस नॅचरल टोन्ड मिल्क त्याचप्रमाणे देवरी येथीलच आर.के.ट्रेडर्स मधून प्रसाद भोग ,मटर, डाळ, बेसन व दिनशॉ तूप या अन्न पदार्थाचे नमुणे चौकशीसाठी व तपासणीकरीता ताब्यात घेतले असून त्या पदार्थाचा तपासणी अहवालाकडे लक्ष लागले आहे.
जिल्यातील धापेवाडा महालगाव हे खोव्यासाठी प्रसिद्ध असल्याने महालगाव येथील आगाशे यांच्याकडील खोव्याचा नमुना तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले.गोंदिया शहरात तेलाचा मोठा काळाबाजार सुरु असून या काळाबाजार सरकारी विभागही सहभागी असल्याची चर्चा असतानाच गोंदिया येथील गुरूंनानक तेल भांडार, गौशाला वॉर्ड येथून प्रेस्टीज ब्रांडच्या नावावर तयार करण्यात आलेले Prestige brand 94 लिटर refined soyabean  तेल 12 हजार 220 रुपयाचे जप्त करण्यात आले आहे. शुभम ट्रेडर्स रिंग रोड गोंदिया येथील पनीर, क्रीम, व्हे पावडर,स्किम्ड मिल्क पावडरचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले.तसेच 8 हजार किमतीचा 48 किलो स्किम्ड मिल्क पॉवडर व 19 हजार 110 रुपयाचा 273 किलो व्हे पावडरही जप्त करण्यात आला आहे.सुनील ऑइल मिल मधून वनस्पती व refined soyabean तेलाचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले.
आमगाव येथील बिकानेर दूकानातू चांदी वर्क व बेसनचे नमुने,सुरेश ट्रेडर्स येथुन blended edilble vegitable  तेलाचे नमुने अन्न औषध प्रशासनाने ताब्यात घेतले.तपासादरम्यान 17 नमुने तपासासाठी घेतले असून या अहवालाकडे लक्ष लागले आहे.सणासुदीच्या काळात मोठ्याप्रमाणात बाजारात दरवर्षी नकली तेल,मिठाई आदी अन्न औषधांची विक्री होत असून त्यांच्यावर पाहिजे तसा वचक विभागाचा का नाही हे कळायला मार्ग राहिलेले नाही.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...