Thursday 31 August 2017

बेरार टाईम्सचा दणका ईओने केल्या शिक्षकांच्या समायोजन बदल्या रद्द

IMG_20170831_210919

तत्कालीन बीईओ घरडेच्या गैरकारभाराचा पर्दाफाश
सेवानिवृत्तीच्या दिवशीच घरडेंच्या कारभाराच्या चौकशीचे आदेश
गोंदिया,दि.३१-गोंदिया पंचायत समितीमध्ये पदाधिकाèयांना विश्वासात न घेताच आज ३१ ऑगस्ट रोजी दुपारनंतर सेवानिवृत्त झालेले उपशिक्षणाधिकारी व गोंदिया पंचायत समितीचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी घरडे यांनी जून ते ऑगस्ट महिन्यात केलेल्या शिक्षक समायोजनेच्या नावावरील सर्व शिक्षकांच्या बदल्या रद्द करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनी दिल्याने घरडेंच्या गैरकारभाराचे पितळ उघडे पडले आहे.विशेष म्हणजे बेरार टाईम्स न्युजपोर्टलने गोंदिया पंचायत समितीमध्ये समायोजनेच्या नावावर शिक्षकांच्या बदल्यांचा गोरखधंदा करुन आर्थिक व्यवहार करण्यात आल्याचे वृत्त ३० ऑगस्ट रोजी प्रसिध्द केले होते.ते वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर पंचायत समितीच्या शिक्षण विभागासह जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातही खळबळ माजली.
या पंचायत समितीमधील गैरव्यवहाराची माहिती सीईओ आर.एच.ठाकरे व शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांना बेरार टाईम्सच्यावतीने भ्रमणध्वनीवर देण्यात आली होती.त्यानंतर आज ३१ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजताच शिक्षणाधिकारी नरड यांनी गोंदिया पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला भेट देऊन सर्व अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते.त्यानंतर जून ते ऑगस्ट दरम्यान तालुकास्तरावर केलेल्या शिक्षकांचे समायोजन व शैक्षणिक कार्यासाठी केलेली पदस्थापनेची १ सप्टेंबरपर्यंत सर्व केंद्रनिहाय आढावा घेऊन चौकशी अहवाल सादर करण्याकरिता उपशिक्षणाधिकारी लोकेश मोहबंशी यांना चौकशी अधिकारी म्हणून नेमले.सोबतच सर्व शिक्षकांचे आदेश तत्काळस्वरुपात रद्द करुन त्या सर्व शिक्षकांना पुर्ववत शाळेत रुजू होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.त्यातच जे शिक्षक पुर्वीच्या मुळ पदस्थापनेच्या शाळेत रूजू होणार नाहीत,त्यांचे वेतन स्थगित ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.शिक्षणाधिकारी यांच्यावतीने दिलेल्या पत्रात स्पष्टपणे तत्कालीन बीईओ घरडे यांनी नियमबाह्यरित्या शिक्षकांचे समायोजन केल्याचे स्पष्ट झाले असून त्यांच्या कार्यकाळातील सर्वच प्रकरणाची अजून सखोल चौकशी होण्याची गरज निर्माण झाली आहे.
गोंदिया पंचायत समितीमधील या सर्वगोंधळाबाबत बेरार टाईम्सने सभापती,उपसभापतीसह अधिकारी यांच्या लक्षात हे प्रकरण लक्षात आणून देत शिक्षकांच्या समायोजनाच्या नावावर दलाली करणाèया शिक्षकावंर सुधद कारवाई अपेक्षित केली असून उद्या पंचायत समितीच्या होणाèया मासिक सभेत पदाधिकारी या शिक्षण विभागाच्या गोंधळावर काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.

‘महा अवयवदान’ लोक चळवळीत सहभागी व्हा


d305481-large
भंडारा,दि.31- रक्तदान व अवयवदान हे पुण्यकर्म आहे. अवयन दानामुळे आपण एकाच वेळी सहा व्यक्तींचे प्राण वाचवू शकतो. त्याचप्रमाणे अवयव दानाच्या रूपाने जीवंत राहण्याचे भाग्यही लाभते. महाअवयवदान या सामाजिक लोकचळवळीत सर्वांनी सहभागी होऊन अवयव दान करावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ रविशेखर धकाते यांनी केले. भंडारा चा राजा येथे जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने अत्यंत मंगलमय वातावरणात आयोजित संवाद पर्व या कार्यक्रमात ते बोलत होते.
जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक आर.एस. खांडेकर, डॉ. भगवान म्हस्के, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, भंडारा चा राजा मंडळाचे संयोजक मंगेश वंजारी, मदन बागडे व सुनीलदत्त जांभूळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाने ऐतिहासिक कर्ज माफी केली यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ या कार्यक्रमात शेतकरी यांच्याशी संवाद साधला यावर आधारित माहिती व जनसंपर्क महासंचालयाने पुस्तिका तयार केली या पुस्तिकेचे संवाद पर्व कार्यक्रमात प्रकाशन करण्यात आले.
यावेळी बोलतांना डॉ. धकाते म्हणाले की, शासनाने लोकांच्या हिताच्या अनेक योजना तयार केल्या आहेत. आरोग्य विभागामार्फत जन आरोग्याच्या अनेक योजना राबविल्या जात आहेत. रक्तदान व महा अवयवदान ही आता लोक चळवळ बनली आहे. अवयव दानामुळे आपण एकाच वेळी सहा व्यक्तींचे प्राण वाचवू शकतो. प्रत्येक व्यक्तीने अवयव दानाचा संकल्प केल्यास गरजू व्यक्तींचे प्राण वाचतील व आपल्याला पुण्य मिळेल असे त्यांनी सांगितले. अवयवदानामुळे आपण मरोणोपरांत जीवन पाहू शकतो. महा अवयव दानाच्या सामाजिक लोक चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
प्रधानमंत्री सुरक्षा योजना, अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री मुद्रा योजना, प्रधानमंत्री उज्वला योजना, जनधन योजना अशा अनेक योजना बँके मार्फत राबविल्या जातात या सर्व योजनांचा लाभ आपण घ्यावा असे आवाहन अग्रणी बँक व्यवस्थापक आर.एस. खांडेकर यांनी केले. जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते यांनी संवाद पर्व कार्यक्रमाचा उद्देश व भुमिका प्रस्ताविकातून विषद केली. गणेश उत्सव काळात गणेश भक्तांना शासनाच्या योजनांची माहिती देण्यासाठी माहिती व जनसंपर्क महा संचालनयाच्या वतीने संपूर्ण राज्यभर संवाद पर्व हा अभिनव उपक्रम राबविला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता भंडाराचा राजा प्रतिष्ठानचे खुशाल पराते, किरीट पटेल, मनिष वासनिक, नितीन दुरुगकर, दिलीप बागडे, कैलाश तांडेकर अतुल धुत, सिध्दार्थ गडकरी, प्रदीप वंजारी, निमिष डोकरीमारे, अमोल, घाटोळे, भुमेश मंदुरकर, प्रशांत र्शावणकर, नितीन धकाते, कुमार आकरे, अतुल वंजारी, बंडु वैद्य, छायाचित्रकार सुरेश फुलसुंगे, जिल्हा माहिती कार्यालयाचे बंडुसिंग राठोड, धनश्याम खडसे, सुनिल फुलसुंगे, विजय डेहनकर, घनश्याम सपाटे, रेखाबाई निनावे यांनी पर्शिम घेतले. संवादपर्व या कार्यक्रमास गणेश भक्तांचा उत्स्फरुत प्रतिसाद लाभला. यावेळी मोठय़ा संख्येने नागरिक उपस्थित होते.

गराड्यातील कुंटणखान्यावर पोलिसांची धाड

30bhph41_2017088758लाखनी,दि.31- तालुक्यातील गराडा येथे देहव्यवसाय सुरु असल्याच्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखा व लाखनी पोलिसांच्या संयुक्त पथकाने काल मंगळवारी कारवाई केली. यात एका घरी धाड घालून महिलेविरुद्ध कारवाई करण्यात आली.गराडा येथे देहव्यापार सुरु असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार घुसर यांना मिळाली. त्यांनी याची माहिती लाखनीचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर चकाटे यांना दिली. यावेळी दोन विभागाच्या वतीने सापळा रचून गराडा येथील सदर महिलेच्या घरी धाड घालण्यात आली.

यात देहविक्री करण्याच्या उद्देशाने एक महिला ही आढळली. सदर महिलेविरुद्ध लाखनी पोलीस ठाण्यात स्त्रियांचा अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा सन १९५६ कलम ३,४,५ अन्वये कारवाई करण्यात आली.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक विनिता साहू, अप्पर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर व साकोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत डिसले यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश घुसर, लाखनीचे ठाणेदार चंद्रशेखर चकाटे, सहाय्यक निरीक्षक सोनटक्के, सहाय्यक फौजदार नेपाल टिचकुले, पोलीस नायक रोशन गजभिये, सत्यराव हेमने, पोलीस शिपाई वैभव चामट,कौशीक गजभिये, पौर्णिमा कान्हेकर यांनी केली.

Wednesday 30 August 2017

इयत्ता पाचवी, आठवीच्या नियमबाह्य तुकड्या बंद करा


29gndph01_2017088585


गोंदिया,दि.30- शिक्षणाधिकाºयांनी नियमांना बगल देत इयत्ता पाचवी व आठवीच्या तुकड्यांचे वाटप केले. यामुळे मात्र जिल्ह्यातील माध्यमिक शाळांचे शेकडो खाजगी शिक्षक सत्र २०१७-१८ मध्ये अतिरिक्त ठरणार आहे. यामुळे वर्ग ५ व ८ वीच्या तुडक्या त्वरित बंद करण्याची मागणी माजी आमदार दिलीप बंसोड यांनी केली आहे. यासाठी गोंदिया जिल्हा शाळा संचालक संघटनेच्यावतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रफुल कच्छवे यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनानुसार, प्राथमिक शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनी बालकांचा मोफत शिक्षणाचा अधिकार अधिनियमाला अनुसरून जिल्ह्यात वर्ग ५ व ८ वीच्या वर्गतुकड्यांचे वाटप केले. परंतु सदर तुकड्या मंजूर करीत असताना त्याच नियमात अंतर्भूत असलेले अंतर व पटसंख्येचे निकष न पाळता तसेच यासंदर्भात वरिष्ठांचे कोणतेही लेखी आदेश नसताना वर्ग ५ व ८ वीच्या तुकड्या मंजूर केल्या.
यामुळे सत्र २०१७-१८ मध्ये शेकडो खाजगी शाळांतील शिक्षक अतिरीक्त ठरणार आहेत. त्यामुळे या तुकड्या त्वरीत बंद करण्याची मागणी माजी आमदार बंसोड यांनी केली. तसेच योग्य तो निर्णय घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा देत निवेदन दिले.
निवेदन देताना, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष राधेलाल पटले, माधोराव भोयर, रूपचंद ठकरेले, अ‍ॅड.कटरे, यादनलाल बनोटे, विष्णू दोनोडे, लोकेश भोयर, राजेश चव्हाण, दिनेश टेंभरे, काथवटे, रामसागर धावडे, दिलीप टेंभरे, बी.एम.कोसरकर, भरणे व अन्य उपस्थित होते.

युपीतील मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

लखनौ,दि.30- उत्तर प्रदेशातील  मदरशांवर आता योगी सरकार  वॉच ठेवणार आहे. यासाठी जीपीएस यंत्रणेचा आधार घेतला जाणार आहे. या माध्यमातून उत्तर प्रदेशातील एकूण एक मदरशा आता सरकारच्या रडारवर असणार आहे. त्यासाठी मदरशांमधील शिक्षक, कर्मचारी आणि शाळा इमारतींच्या खात्यांची तसेच त्यांच्या आधार कार्डची माहिती घेतली जात आहे.
योगी आदित्यनाथ सरकारने मदरसा शिक्षा परिषदेच्या रजिस्ट्रारला सर्व १६ हजार मदरशांची जिओ-टॅगिंग करण्याचे आदेश दिले आहेत. जीपीएस प्रणाली लावल्यानंतर मदरशांना एक कोड दिला जाणार आहे. राज्यातील सर्व मदरशांनी १५ ऑक्टोबरपर्यंत madarsaboard.upsdc.gov.in वर नोंदणी करून घ्यावी, असे आदेशच प्रधान सचिव मोनिका गर्ग यांनी दिले आहेत. विकास, स्पर्धा, सुसुत्रीकरण आणि शिक्षणातील सुधारणा करण्याच्या हेतूने या पोर्टलची सुरूवात करण्यात आल्याचं आदेशात म्हटलं आहे. नकली विद्यार्थी आणि शिक्षकांची माहिती मिळावी म्हणून मदरशांमध्ये जीपीएस प्रणाली लावण्यात येणार आहे. मदरशातील कर्मचारी आणि शिक्षकांचे बँक खातेही तपासले जाणार आहेत. हे खाते तपासल्यानंतरच त्यांना पगार दिला जाणार आहे. जिल्हा अल्पसंख्यांक अधिकारी या मदरशांची तपासणी करणार आहे.

ब्लॉसमच्या विध्यार्थ्यांना चाईक्वा्डो स्पर्धेत दोन सुवर्ण आणि एक रजत पदक

देवरी: 30 ऑगस्ट
स्थानिक आईएसओ मानांकन ब्लॉसम पब्लिक स्कुल वेगवेगळ्या उपक्रमासाठी नेहमी लोक चर्चेत असते. शालेय उपक्रम आणि संकल्पना विध्यार्थी केंद्रित असल्यामुळे नेहमीच इतर शाळा या संकल्पना राबिण्यासाठी उत्सुक असतात. विध्यार्थ्यांना बदलत्या युगात सतत तेवत ठेवण्यासाठी मुख्याध्यापक
 सुजित टेटे नेहमीच महत्वाची भूमिका बजावत असतात.
नुकताच देवरी तालुका चायक्वाडो स्पर्धेमध्ये 14 वर्षे गटात तालुक्यातून 2 सुवर्ण पदक आणि एक रजत पदक ब्लॉसम च्या विध्यार्थ्यांनी पटकावला.
दक्ष गवते आणि आर्य मोहुर्ले यांनी सुवर्ण पदक तर केतन आंबिलकर याने रजत पदक पटकावला असून जिल्हा स्पर्धेसाठी यांची निवड झालेली आहे.
विध्यार्थ्यांना खेळात निपुण करण्यासाठी क्रीडा शिक्षक राहुल मोहुर्ले आणि असोसीएसणचे मार्गदर्शक अमित मेश्राम यांनी प्रयत्न चालविले होते. अखेर त्यांच्या प्रयत्नाला विध्यार्थ्यांनी यश मिळवून गुरुदक्षिणा दिली.
विध्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय क्रीडा शिक्षक राहुल मोहुर्ले चाई क्वाडो असोसिएशन चे अमित मेश्राम, पालक आणि मुख्याध्यापक सुजित टेटे यांना दिले.
ग्रामीण भागातही निपुण विध्यार्थी आहेत त्यांना योग्य दिशा व दृष्टी देण्याची गरज आहे या वेळी मुख्याध्यापक बोलत होते.

Tuesday 29 August 2017

BERARTIMES_ 30-AUG-05-SEPT_2017





देवरी नगरपंचायतीतील भाजपच्या नगरसेविका बागडे एसीबीच्या जाळ्यात

देवरी,दि.29ेयेथील नगरपंचायतीच्या भाजपच्या महिला नगरसेविका भुमिका आयलेश बागडे व भुषण वंसता आकरे या खासगी इसमाला आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने १ लाख रुपयाची लाच घेतांना रंगेहाथ अटक करण्यात आली.

तक्रारदार हे दारुव्यवसायिक असून ते नागपूर येथील रहिवासी आहेत.त्यांचे कुमार वाईन शॉप नावाने ३५ वर्षापासून दुकान देवरीत आहे.आधी दुकान राष्ट्रीय महामार्गावर होते.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ते दुकान बंद झाले होते.त्यानंतर ऑगस्ट २०१७ पासून ते दुकान शेडेपार मार्गावर त्यांनी सुरु केले.शेडेपार मार्गपरिसराच्या भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका भुमिता बागडे यांनी आपल्या प्रभागात दारुचे दुकान नको यासाठी २५-३० महिलांना घेऊन दारुदुकानावर मोर्चा नेला होता.त्यानंतर तक्रारदाराचे मित्र भुषण आकरे यांनी सांगितले की,नगरसेविका बागडे या दारु दुकानाचा विरोध मागे घेण्यासाठी २ लाख रुपयाची मागणी करीत आहेत.परंतु रक्कम देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली.त्या तक्रारीच्या आधारावर आज सापळा रचण्यात आले असता श्रीमती बागडे यांनी २ लाखाची मागणी करुन तडजोडीनंतर एक लाखाची रक्कम भुषण आकरेमार्फत स्विकारली.यावरुन दोघाविरुध्द देवरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

देवरी नगर पंचायतीची एक नगरसेवका एसीबीच्या जाळ्यात

देवरी,29- देवरी नगर पंचायतीच्या एका नगरसेविकेला लाचलुचपत विभागाच्या पथकाने अटक केल्याची चर्चा शहरात आहे. सदर प्रकरणी देवरी पोलिसात गुन्हा नोंदविण्याची कार्यवाही सुरू आहे.
आरोपी नगरसेविकेचे नाव बागडे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Monday 28 August 2017

आसाराम प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाची गुजरात सरकारला फटकार



नवी दिल्ली, दि. 28 - बलात्काराच्या प्रकरणात गेल्या चार वर्षापासून कारागृहात असलेल्या आसाराम बापू प्रकरणी लेचीपेची भूमिका घेणाऱ्या गुजरात सरकारला सर्वोच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले आहे. न्यायालयीन प्रगती अहवाल सादर करण्याचा आदेश ही दिला आहे.
 आसाराम बापूवर आश्रमात 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. ऑगस्ट 2013 पासून तो राजस्थान कारागृहात बंद आहे. दोन महिन्यानंतर आसाराम बापू आणि मुलगा नारायण साई यांच्यावर सुरतमधील आश्रमात दोन बहिणींवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गांधीनगरमधील न्यायालयात खटला प्रलंबित आहे. 
सर्वोच्च न्यायालयात आसाराम बापू यांनी जामीनासाठी अर्ज केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर गुजरात सरकारने आसाराम बापूंमुळेच खटल्याला उशीर होत असल्याची माहिती दिली आहे. याआधी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने आरोप करणा-या पीडित महिला आणि इतर साक्षीदारांचा जबाब तात्काळ नोंदवण्याचा आदेश दिला होता. जवळपास 40 साक्षीदार असून अद्याप त्यांचा जबाब नोंदवण्यात आलेला नाही. 
'उगाच रेंगाळत राहू नका, हेच आम्हाला सांगायचं आहे. लवकरात लवकर पुरावे सादर करा', असं न्यायाधीशांनी एप्रिल महिन्यात सांगितलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने आसाराम बापूंना जामीन देण्यास नकार दिला आहे. आसाराम बापू यांनी अनेकदा आपल्या तब्बेतीचं कारण देत जामीन देण्याचा अर्ज केला आहे. 
आसाराम बापू आणि त्यांचा मुलगा जेलमध्ये असताना सहा साक्षीदारांवर हल्ला झाला असून त्यामधील दोघांचा मृत्यू झाला आहे. 

20 वर्षाचा सश्रम कारावास होताच रामरहीम रडत दयेची भीक मागू लागला


ram-rahimचंदीगड,28- स्वतःला 'देवदूत' म्हणवणारा डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत रामरहीम सिंग याच्यावर आज भर कोर्टात हमसून रडण्याची पाळी आली. दोन अनुयायी साध्वींवर बलात्कार केल्याप्रकरणी गुरमीतला सीबीआयच्या विशेष न्यायालयाने २० वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावताच तो ढोंगी बाबा कोर्टापुढे रडत दयेची भीक मागू लागला होता. राम रहीमला बलात्काराच्या दोन प्रकरणांवर शिक्षा ठोठावताना न्यायाधीश जगदीप सिंह यांनी प्रत्येकी १०-१० वर्षांची अर्थात एकूण २० वर्षांचा कारावास आणि एकूण ३० लाखांचा दंड ठोठावला.
रामरहीमच्या वासनेची शिकार ठरलेल्या दोन महिला गेल्या १५ वर्षांपासून न्यायाची प्रतीक्षा करत होत्या. गुरमीतला त्याच्या पापाची शिक्षा देण्यासाठी कायदेशीर लढाई लढत होत्या. त्यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने शुक्रवारी दिलासा दिला. न्यायमूर्तींनी रामरहीमला बलात्काराच्या खटल्यात दोषी ठरवलं होतं. या निकालानंतर, हरियाणातील पंचकुला, सिरसा भागात हिंसाचार उसळला होता. राम रहीमच्या समर्थकांनी ठिकठिकाणी जाळपोळ आणि दगडफेक केली होती. त्यात ३८ जणांचा मृत्यू झाला, तर शेकडो लोक जखमी झालेत.
या पार्श्वभूमीवर, आज रामरहीमला विशेष सीबीआय कोर्टाचे न्यायमूर्ती जगदीप सिंह यांनी शिक्षा सुनावली. भादंवि कलम ३७६, ५११ आणि ५०६ अन्वये त्यांनी बाबाची रवानगी १० वर्षांसाठी तुरुंगात केली. निकालाचं वाचन पूर्ण झाल्यानंतरही, रामरहीम रोहतक तुरुंगातील कोर्टरूममधून बाहेरच यायला तयार नव्हता. तिथेच फरशीवरून तो रडत होता. त्याला पोलिसांनी खेचून बाहेर आणलं आणि वैद्यकीय तपासणीसाठी नेलं. आता त्याला कैद्याचे कपडे दिले जातील आणि त्याला कोठडीत ठेवलं जाईल.

शेतक-याची आत्महत्या, मदतीसाठी गावकऱ्यांचे आंदोलन


लाखनी ,दि.28 : लाखनी तालुक्यातील रेंगेपार (कोठा) येथील दीक्षीत रूपचंद हजारे या ४५ वर्षीय अल्पभूधारक शेतक-याने, रविवारी दुपारी विषप्राशन करून आत्महत्या केली. या दरम्यान मृत शेतक-याच्या कुटुंबीयांना १० लक्ष रुपयांची मदत द्यावी, या मागणीसाठी रेंगेपारवासीयांनी मृतदेह तहसील कार्यालयात आणला. त्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
उपविभागीय अधिकारी अर्चना मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत डीसले, नायब तहसीलदार व्ही. आर. थोरवे यांच्या उपस्थितीत चर्चा करण्यात आली. या वेळी मृताच्या कुटुंबीयांना मदतीसाठी सहकार्य केले जाईल, असे आश्वासन देण्यात आले. प्रशासनाकडून १० हजारांची तत्काळ आर्थिक मदत देण्यात आल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या वेळी डॉ. अजय तुमसरे, दिनेश गिरीपुंजे, बाळा शिवणकर, सुनील भांडारकर, सूरज पंचबुद्धे, मोहन निर्वाण यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते.

आता राष्ट्रीय स्तरावर महाआघाडी - शरद यादव

  पाटणा,(वृत्तसंस्था)- ‘बिहारमधील महाआघाडी संपुष्टात आल्याने मी फार दु:खी आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) पराभव करण्यासाठी देशपातळीवर ‘महाआघाडी’ उघडण्यात येईल,’ असा इशारा संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) बंडखोर नेते शरद यादव यांनी रविवारी दिला. ‘तुम्ही सत्तेसाठी बिहारमधील ‘महाआघाडी’ तोडून जनतेशी गद्दारी केलीत. मतदारांनी जो जनादेश दिला होता तो नाकारून विश्वासघात केलात. आता तुम्हाला राष्ट्रीय पातळीवरील ‘महाआघाडी’तून उत्तर देऊ,’ असा टोला शरद यादव यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे नाव न घेता लगावला.
राष्ट्रीय जनता दलप्रमुख व बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी पाटण्यातील ऐतिहासिक गांधी मैदानात आयोजित केलेल्या ‘देश बचाओ, बीजेपी भगाओ’ या महारॅलीत एकत्रित आलेल्या विरोधी पक्षांनी आपली ताकद दाखवून दिली. भाजपविरोधात लालूप्रसाद यांनी दिलेल्या हाकेला साद देऊन शरद यादव यांच्यासह तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद, सी. पी. जोशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तारीक अन्वर, राष्ट्रीय लोकदलाचे जयंतसिंह चौधरी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सुधाकर रेड्डी, झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते व माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन, झारखंड विकास मोर्चाचे बाबुलाल मरांडी, ‘एआययूडीएफ’चे बद्रुद्दीन अजमल आणि द्रमुक, धर्मनिरपेक्ष जनता दल या पक्षाच्या नेत्यांनी व्यासपीठावर हजेरी लावली; तसेच लालूप्रसाद यांची पत्नी माजी मुख्यमंत्री राबडीदेवी, पुत्र तेजस्वी व तेजप्रताप आणि कन्या खासदार मीसा भारतीही उपस्थित होते.



पटना के गाँधी मैदान में उमड़ा ये जनसैलाब उड़ा देगा बीजेपी के होश?

patna-lalu-madhyamarg-1-3-768x576

पटना। आरजेडी प्रमुख लालू यादव ने रविवार 27 अगस्त को गांधी मैदान में आयोजित ‘भाजपा भगाओ-देश बचाओ’ रैली में मुख्यमंत्री नीतीश कुमार पर जमकर निशाना साधा।उन्होंने कहा कि नीतीश हमारे चाचा थे और रहेंगे परंतु वे अच्छा ‘चाचा’ नहीं हैं। उन्होंने नीतीश के जनता दल को नकली जेडी (यू) बताते हुए कहा कि असली जेडी (यू) शरद चाचा का है।लालू यादव ने कहा, मैं फिर आऊंगा बिहार में। लालू ने कहा कि फांसी पर चढ़ जाएंगे लेकिन बीजेपी से समझौता नहीं करेंगे। नीतीश कुमार के शराबबंदी के फैसले पर लालू ने कहा कि शराबबंदी के बावजूद घर-घर शराब मिल रही है।पटना के गांधी मैदान में आरजेडी की ‘देश बचाओ-भाजपा भगाओ रैली’ हो रही है। रैली में आज आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव, बिहार के पूर्व उप मुख्यमंत्री तेजस्वी यादव, यूपी के पूर्व सीएम अखिलेश यादव, पश्चिम बंगाल की मुख्यमंत्री ममता बनर्जी समेत कई विपक्षी दलों के नेता पहुँचे।
लालू ने आगे कहा कि नीतीश कुमार को दलितों से नफरत है। नीतीश कुमार ने जगजीवन बाबू की बेटी मीरा कुमार को धोखा दिया, नहीं तो वे देश की राष्ट्रपति होतीं।  नीतीश कुमार तेजस्वी यादव से जलने लगे थे। लोगों ने मेरा चेहरा देखकर वोट दिया था।
रैली में राहुल गांधी का संदेश भी पढ़कर सुनाया गया। जिसमें लिखा था- मुझे बेहद खुशी है कि पटना में आरजेडी ने विशाल रैली रखी है। जिसमें समान विचारधारा के लोग शामिल हो रहे हैं। यह रैली ऐसे वक्त पर हो रही है जब देश के बुनियादी ठांचे पर हमला हो रहा है, धन और बाहुबल के बल पर ऐसे राज्यो में विस्तार किया जा रहा जहां, बहुमत नहीं मिला था। ये सरकार जनता से किए वादों को भुला देना चाहती है। चंद करीबी लोगों को छोड़कर सभी गरीब लोग सरकार विरोधी नीति के खिलाफ हैं। महिलाओं, किसानों का भविष्य दांव पर लगा है। सरकार के कारनामों पर पर्दा डाला जा रहा है। मैं रैली में शामिल होना चाहता था लेकिन नोर्वे के आधिकारिक दौरे की वजह से नहीं आ पाया।

आर्किटेक्टरच्या विद्यार्थ्यांनी शहराच्या सौदंर्यिकरणात घातली भर

20952991_1611212612245840_2315012574353892980_n

गोंदिया(berartimes.com),दि.27- शहराच्या सौंदर्यिकरणात येथील मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आर्किटेक्चर शाखेच्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थिनी व विद्याथ्र्यांनी घातलेली भर ही नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागालाच नव्हे तर जिल्हा प्रशासनालाही लाजवणारी ठरली आहे.विशेष म्हणजे राष्ट्रीय स्तरावर आर्किटेक्चर विभागाच्यावतीने नॅशनल असोसिएशन ऑफ स्टुटंडस ऑफ आर्किटेक्चर च्यावतीने राष्ट्रीयपातळीवर डिझाईन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.त्यानुसार येथील एमआयटीच्या आर्किटेक्चरच्या ३०-४० विद्याथ्र्यांनी ५ गटाच्या माध्यमातून शहरातील पाच ते सहा चांगल्या स्थळांची निवड केली.त्यानंतर निवड केलेल्या स्थळाच्या सौंदर्यिकरणाची योजना आखली व नगरपरिषदेचे नगराध्यक्ष अशोक इंगळे यांची भेट घेऊन त्यांना आपली संकल्पना समजावली.त्या संकल्पनेला दाद देत नगराध्यक्ष इंगळे यांच्यासह नपचे बांधकाम सभापती घनश्याम पानतावणे, नगरसेवक शकील मंसुरी यांनी त्यांना पूर्ण सहकार्याचे आश्वासन देत नगरपरिषदेकडून या सौंदर्यिकरणासाठी मंजुरी दिली. विद्याथ्र्यांच्या पाचही गु्रपचे नेतृत्व अनुज जायस्वाल या विद्याथ्र्याने केले.
त्यानुसार पहिल्या ग्रुपमध्ये असलेल्या श्याम qबदल,पंखुरी अग्रवाल,अर्पिता चॅटर्जी,शारुन होतचदांनी,साची टेंभरे,अंजली गुप्ता,चेतना नंदनवार या विद्याथ्र्यांनी राजीव गांधी स्मारकाचे सौंदर्यीकरण केले आहे.ग्रुप २ मधील हंसा अजय अग्रवाल,रोहित गिर्हे,निधी जैन,रुतिका अग्रवाल,हर्षा गगवांनी,शिवानी पंडित,संजय मोहबे यांनी स्टेडीयम समोरील फुटपाथचे केलेले सौंदर्यिकरण हे अप्रतिम ठरले आहे.सोबतच ग्रुप ३ मधील गौरव समरीत,रुषिका जैन,कोमल रावलानी,qकजन चव्हाण,सरोज मेंढे,साक्षी बैस,निकिता रामटेके व निकिता लालवानी यांनी जमनालाल बजाज प्रतिमेचे सौदंर्यिकरण तसेच क्रॉसरोड चे काम केले आहे.चौथ्या ग्रुपमधील शुभम बनोटे,अमन चौरासिया,अनु श्रीवास्तव,विधी चव्हाण,ईशा वैद्य,जान्हवी रिचारिया,पूजा सोनवणे व श्वेता हिरापूरे यांनी मोक्षधामचे सौंदर्यिकरण केले आहे.तर पाचव्या ग्रुपमधील आयुषी दादरीवाल,श्रिया चंदेल,जुही पर्यानी,शैलजा मुरकुटे,यामिनी पटले,शिवानी पटले,अर्पिता अग्रवाल व साक्षी फाये यांनी सर्वाधिक वर्दळीचा चौक असलेल्या नेहरू चौकातील प्रतिमेचे व उड्डाण पुलाच्या खाली केलेले सौंदर्यिकरण हे आकर्षणाचे केंद्र ठरले आहे.20914210_1611212632245838_8368192041535534736_n
विशेष म्हणजे या विद्याथ्र्यांनी या सर्व कामासाठी प्रशासनासह नागरिकांचीतर मदत घेतलीच आहे.सोबतच स्पॉनसरशिपच्या व स्वतःच्या निधीतून हे कार्य केले आहे.या अभियानात सहभागी असलेली हंसा अजय अग्रवाल या विद्यार्थिनीने सांगितले की आम्ही पाच ग्रुपच्या माध्यमातून शहरातील पाच ते सहा मुख्यस्थळांची निवड केली आणि त्या स्थळांचे सौंदर्यिकरण करून ये जा करणाèयांना आपल्या शहराचा एक नवा रूप बघावयास मिळायला हवे ही संकल्पना मनात ठेवली.सोबतच राष्ट्रीय स्तरावर जर आम्हाला आमचे डिझाईन लोकांपर्यंत या स्पर्धेच्या माध्यमातून पोचवून शहराचे सुद्धा नाव देशपातळीवर दखल पात्र ठरावे या हेतूनेच आम्ही वेगवेगळ्या संकल्पना साकारत या स्पर्धेत सहभागी झाल्याचे सांगितले.विशेष म्हणजे या सौंदर्यिकरणानंतर नागरिकांच्या मनात एक चांगली प्रतिमा शहराची तयार होऊ लागल्याचे चित्र असून ज्याठिकाणी घाण व अस्ताव्यस्त परिसर असायचा आज तोच परिसर स्वच्छ व सुंदर कसा राहील विद्याथ्र्यांनी केलेले सौंदर्यिकरण टिकून कसे राहील यासाठी धडपडताना दिसून येतात हा या विद्याथ्र्यांच्या कलात्मकतेचा विजयच म्हणावा लागेल असे वाटते.विशेष म्हणजे नासा नॅशनल डि नगरपरिषदेने पूर्ण सहकार्य बहोत खर्चा स्पान्सरशिप सह अंदाजे ५-६ लाख रुपये जवळपास खर्च या कामासाठी आलेला आहे.

वाटसरुंच्या सतर्कतेमुळे तासाभरापुर्वी जन्मलेल्या बाळाला जिवनदान

IMG-20170827-WA0017

 नांदेड,(सय्यद रियाज),दि.27-  बिलोली तालुक्यातील कासराळी जवळ असलेल्या  कमल पेट्रोलपंपा  समोर  एका  पिशवीत गुंडाळलेले अभ्रक 27 आगस्टच्या सायंकाळी   सहा वाजेच्या  सुमारास  आढळून आल्याची घटना उघडकीस आली. थोड्या वेळापूर्वी आलेल्या जोरदार पावसाच्या दरम्यानच कुणीतरी तासाभरापुर्वी जन्माला आलेल्या त्या शिशूला फेकुन देण्यात आले होते.त्याचवेळी  सय्यद अजीसमौलास तसेच मोटारसायकलने जात असलेल्या अनुराधा पांडुरंग बागडे यांना पिशवी दिसून आली असता त्यांनी पतीला पिशवीत काहीतरी असल्याची शंका व्यक्त केली.त्यावेळी पांडुरंग बागडे यांनी मोटारसायकल थांबवून सदरील पिशवी पाहिली असता त्यामध्ये जिवंत बाळ  असल्याचे नजरेस आले. बाळ पावसाच्या पाण्यात पूर्णपने भिजलेले होते.त्या बाळाला ताबडतोब उचलून बिलोली ग्रामीण  रुग्णालयात आणण्यात नेण्यात आले.तिथे त्याच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर डॉ. नागेश लखमावार व डॉ. ठक्करवाड यांनी प्रथमोपचार करून 108 अंबुलंस ने नांदेड  येथील जिल्हा रुग्णालयात सदर बाळाला पुढील उपचारासाठी पाठविले आहे.

Sunday 27 August 2017

रेप के दोषी डेरा प्रमुख राम रहीम को धरती का भगवान मानते हैं BJP सांसद साक्षी महाराज

नई दिल्ली/कानपुर,27-डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम को पंचकुला की विशेष सीबीआई अदालत ने शुक्रवार को बलात्कार का दोषी ठहराया है। जिसके बाद उसके समर्थकों ने हरियाणा, पंजाब, दिल्ली में उत्पात मचाना शुरु कर दिया है। अब तक 30 से अधिक लोगों की जान जा चुकी हैं।
इस मामले में बीजेपी सांसद साक्षी महाराज लगाताक अपरिपक्व बयान दे रहे हैं। रेप कांड में दोषी ठहराए गए डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम को बीजेपी सांसद साक्षी महाराज ने धरती का भगवान कहा है। उन्होंने कहा कि वह डेरा सच्चा सौदा प्रमुख का सम्मान करते हैं। सीबीआई अदालत द्वारा गुरमीत राम रहीम को दोषी करार देने पर बीजेपी सांसद ने कड़ी आपत्ति जताई है।
शुक्रवार को कानपुर में उन्नाव से बीजेपी सांसद साक्षी महाराज ने कहा, क्या कोर्ट राम रहीम के करोड़ों अनुयायियों की आवाज़ नहीं सुन सकता जो उन्हें भगवान की तरह मानते हैं? करोड़ों लोग डेरा प्रमुख को दोषी करार देने के बाद उनके समर्थन में उतर आए हैं।
वहीं कोर्ट ने मात्र एक महिला के द्वारा लगाए गए रेप आरोप में कोर्ट ने उन्हें दोषी करार दे दिया।
साक्षी महाराज के मुताबिक राम रहीम पर यौन शोषण का आरोप भारतीय संस्कृति की छवि को धूमिल करने की कोशिश हो सकती है।
साक्षी महाराज ने कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा ठाकुर का हवाला देते हुए कहा कि योजनाबद्ध तरीके से साधु-संन्यासी ही नहीं भारतीय संस्कृति को बदनाम करने का पड्यंत्र हो रहा है।
साक्षी महराज ने आगे कहा कि डेरा प्रमुख को दोषी ठहराए जाने के बाद लोगों में जो हिंसक रुख अख्तियार किया उसका जिम्मेदार कोर्ट है। करोड़ों लोग उनके समर्थन में सड़कों पर उतर आए हैं। देश में कानून व्यवस्था लचर हो गई है। लोग मर रहे हैं, इसके लिए कौन जिम्मेदार है? क्या कोर्ट इस बात की जिम्मेदारी लेगा?
उन्होंने आागे कहा कि वह डेरा प्रमुख पर सफाई नहीं दे रहे हैं, इस तरह से दोषी ठहरा देना हिंदू संस्कृति को समाप्त करने का प्रयास है।
साक्षी महाराज ने न्याय व्यवस्था पर भी हमला बोला। उन्होंने कहा, क्या कोर्ट के पास जामा मस्जिद के इमाम को दोषी सिद्ध करने की हिम्मत है, इमाम पर बहुत मामले लंबित पड़े हैं।
कोर्ट मे दम हो तो उनके खिलाफ कार्रवाई करके दिखाए। गुरमीत राम रहीम सामान्य व्यक्ति हैं इसीलिए उनका शोषण किया गया है।

(साभार- नेशनल जनमत ब्यूरो)

कब समझोगे? धर्म, अध्यात्म, आत्मा-परमात्मा, पुनर्जन्म, मोक्ष सब बाबाओं के धन उगाहने के साधन हैं

नई दिल्ली,27-
हरियाणा में शुक्रवार को कोर्ट द्वारा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम को बलात्कार के आरोप में दोषी ठहराए जाने के बाद पूरे देश में हिंसा का माहौल है। बाबा राम रहीम के समर्थकों ने की हिंसा अब तक 30 से ज्यादा लोगों की मौत हो चुकी है।

बाबा को दोषी करार दिए जाने के बाद अंतर्राष्ट्रीय शोधार्थी और जाने माने समाज विज्ञानी संजय श्रमन जोठे ने बाबागिरी को धन उगाहने वाला व्यवसाय करार दिया है।
उन्होंने लिखा-
धर्म,अध्यात्म, आत्मा परमात्मा, पुनर्जन्म और मोक्ष की बकवास को शिखर पर पहुंचाकर उसके आधार पर धन बटोरने का पहला मॉडल आचार्य रजनीश उर्फ ओशो ने दिया था। उनके बाद सभी बाबाओ और पोंगा पंडितों ने उस मॉडल को फॉलो किया।
धर्म और मोक्ष जैसी इंसान विरोधी धारणा को सुनहरे शब्द जाल में लपेटकर सजाने की शुरुआत ओशो से ही हुई है। आजकल के बाबाओ की जो लीला हम देख रहे हैं वो उसी खेल का विस्तार है।
ऑरेगोन अमेरिका में इन रजिस्टर्ड भगवान के आश्रम में भी उसी खतरे की आशंका उठ खड़ी हुई थी जो अभी पंचकूला में चल रहा है तत्कालीन अमेरिकन मीडिया और जांच एजेंसियों की रिपोर्ट बताती है कि किस तरह वहां हथियार, ड्रग्स आदि का जमावड़ा हो रहा था।
लेकिन मजे की बात ये कि लोगों की भक्ति का बुखार उतरता ही नहीं। सालों साल मूर्खता जारी रहती है। अभी जो लोग पंजाब हरियाणा दिल्ली को जला रहे हैं, भारत को मिटाने की धमकी दे रहे हैं वे भी “धार्मिक” लोग हैं।
गुरु पूर्णिमा, कावड़ यात्रा, जन्माष्टमि के अलावा अन्य सभी व्रत त्योहार मनाते हैं। उन सबका ये परिणाम हो रहा है आंख खोलकर देख लीजिए।
पुरानी कर्मकांडी बुद्धि में रहस्यवाद और ह्यूमन पोटेंशियल मूवमेंट की खुराक मिलाकर ओशो ने जो जहरीला कॉकटेल बनाया है वो धूर्त बाबाओं की सफलता की गारंटी बन गया है। जब तक उस मॉडल का पोस्टमार्टम नहीं किया जाएगा तब तक ये बाबागिरी की फफूंद पैदा होती रहेगी।
(साभार-नेशनल जनमत ब्यूरो)

Saturday 26 August 2017

उत्तर प्रदेशात रुग्णावर बलात्कार

गोंडा /उत्तर प्रदेश(वृत्तसंस्था)-.येथील जिल्हा रुग्णालयात एका महिला रुग्णावर पुरुष परिचारकाने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आल्याची माहिती पोलिसांनी दिली. जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या या महिलेवर पुष्कर कुमार नावाच्या पुरुष परिचारकाने काल रात्री बलात्कार केला. समाजवादी पक्षाचे उमेशकुमार सिंह म्हणाले की, या प्रकरणातील आरोपी फरारी झाला आहे.
आज सकाळी महिला परिचारक कामावर आल्यानंतर पीडित महिलेने तिला याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली, असे पोलिस अधीक्षकांनी सांगितले. पीडित महिलेचा जबाब नोंदविल्यानंतर वैद्यकीय तपासणीसाठी तिला पाठविण्यात आले आहे, असे ते म्हणाले. वैद्यकीय अहवालाच्या आधारे तक्रार दाखल करण्यात येईल आणि पुढील तपास केला जाईल, असे ते म्हणाले.

गणपती दर्शनासाठी मूख्यमंत्री फडणवीस नारायण राणेंच्या घरी

मुंबई, दि. 26 -  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी रात्री उशिरा काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या घरच्या गणपतीचे दर्शन घेतले. नारायण राणे यांचे सुपूत्र नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांसोबतचा फोटो टि्वट करुन ही माहिती दिली तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गणेशोत्सवाच्या शुभेच्छांसंदर्भातले एक टि्वटही रिटि्वट केले आहे. राज्याच्या राजकारणात नारायण राणे काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन लवकरच भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यापार्श्वभूमीवर घडत असलेल्या या घडामोडी महत्वपूर्ण आहेत. 
नारायणे राणे यांचा 27 ऑगस्टपूर्वी भाजपा प्रवेश होईल अशी शक्यता होती. पण राणेंच्या मार्गात काही अडथळे आल्याने प्रवेश लांबल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले होते. आता गणपती दर्शनाच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी राणे यांच्या निवासस्थानी भेट दिली. राणेंचा भाजपा प्रवेशाचा मार्ग सुकर झाल्याचे हे संकेत आहेत असे राजकीय विश्लेषकांनी सांगितले. 

भाजपाची जिल्हा बैठक २८ रोजी

गोंदिया,दि.२५-भारतीय जनता पार्टीची जिल्हा बैठक गोरेगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पटांगणावर  २८ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता आयोजित करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांच्या अध्यक्षतेखाली होणाèया बैठकीत प्रामुख्याने विदर्भ संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, पालकमंत्री ना. राजकुमार बडोले, खा. नाना पटोले, खासदार अशोक नेते, आ. डॉ.परिणय फुके, आ. विजय रहांगडाले, आ. संजय पुराम, सर्व माजी खासदार, आमदार, सर्व जिप, नप पदाधिकारी, पंस पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, जिल्हा कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी, सर्व मंडळ कार्यकारिणीचे पदाधिकारी, सर्व आघाडीचे पदाधिकारी आदी उपस्थित राहणार आहेत. बैठकीला सर्व पदाधिकाèयांनी वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा महामंत्री संघटन विरेंद्र अंजनकर, जिल्हा महामंत्री भाऊराव उके, रविकांत बोपचे, लायकराम भेंडारकर यांनी केले आहे.

राजकीय फायद्यासाठी हरियाणाला जळू दिले, हायकोर्टाने फटकारले


40_1503672542_150372_1503
चंदीगड(वृत्तसंस्था)दि.26 – डेरा सच्चा प्रमुख गुरमीत रामरहिम याला लैंगिक शोषणाच्या आरोपात दोषी ठरवल्यानंतर भडकलेल्या हिंसाचारावरुन हायकोर्टाने हरियाणा सरकारला फटकारले आहे. या प्रकरणाच्या सुरक्षेवरुन पंजाब आणि हरियाणा हायकोर्टात दाखल याचिकेवर सुनावणी सुरु आहे. शुक्रवारी रामरहिम याला दोषी ठरवल्यानंतर जनहित याचिका दाखल झाली होती. तेव्हा हायकोर्ट म्हणाले होते डेरा प्रमुखाचा स्टेटस आता बदलला आहे, राज्यानेही आपल्या भूमिकेत बदल केला पाहिजे. हायकोर्ट तीन दिवसांपासून या प्रकरणावर सुनावणी सुरु होती.
लैंगिक शोषणाचा आरोपात रामरहिम यांना सीबीआय कोर्टाने दोषी ठरविल्यानंतर हरियाणात हिंसाचार भडकण्याच्या शक्यतेवर काय उपाययोजना केल्या, यासंबंधी हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. शुक्रवारी दुपारी सीबीआय कोर्टाने डेरा प्रमुखाला दोषी ठरविले. त्यानंतर पंजाब-हरियाणासह पाच राज्यांमध्ये हिंसाचार उसळळा. यात 32 लोक ठार झाले. 250 पेक्षा जास्त जखमी आहेत. सोमवारी (28 ऑगस्ट) रामरहिम यांना शिक्षा सुनावली जाणार आहे. पंजाब-हरियाणासह पाच राज्यात उसळलेल्या हिंसाचारात जाळपोळ, दगडफेक आणि सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्याप्रमाणात नुकसान करण्यात आले. यावर हायकोर्टाने डेरा सच्चा सौदाची संपत्ती जप्त करुन नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहे.
 हायकोर्टात सुनावणी दरम्यान वकीलांनी म्हटले की पॅरा मिलिटरी फोर्स आल्यानंतर घटनास्थळावरुन पोलिसांनी पळ काढला होता. यावर हायकोर्टाने हरियाणा सरकारचे अॅडव्होकेट जनरल बलदेव राज महाजन यांना, या बेजबाबदारपणासाठी कोण जिम्मेदार आहे, असा सवाल केला. यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सुचना हायकोर्टाने केली.  हायकोर्टाने अॅडव्होकेट जनरल यांना सांगितले की शनिवारी सुनावणी दरम्यान आपली बाजू मांडा आणि घटनास्थळावरुन कोणते पोलिस अधिकारी पळून गेले त्यांचे नाव कोर्टासमोर आणा.

किरनापूर कोब्रा बटालियनची गोंदियात दादागिरी?


Untitled-1


गोंदिया,दि.26(बेरार टाईम्स)-शेजारील मध्यप्रदेश राज्यातील बालाघाट जिल्हा हा नक्षलग्रस्त जिल्हा असल्याने या जिल्ह्यातील किरनापूर परिसरात नक्षलबिमोडासाठी कोब्रा बटालियन तैनात करण्यात आले आहे.या बटालीयनचे प्रमुख असलेले वरिष्ठ अधिकारी हे शुक्रवारला सप्तनीक गोंदिया येथे खरेदी करण्यासाठी आले असता त्यांच्या वाहन हटविण्यावरुन झालेल्या वादावादीने पोलिसांची प्रतिमा पुन्हा जनतेसमोर मलीन करण्याचा प्रयत्न या अधिकार्यामुळे झाली आहे.तर दुसरीकडे गोंदिया पोलिसांनी घेतलेल्या सामज्यंशाच्या भूमिकेमूळे कोब्राबटालियनच्या पोलिसांनी केलेल्या गैरकृत्यवार पांघरुन घालण्याचाही प्रकार घडला.बाजार परिसरातील कोठारी ज्वेलर्स समोर किरनापूर येथील कोब्राबटालियनचे पोलिस अधिकार्याच्या वाहनचालकाने पार्किंग केलेले वाहन हटविण्यावरुन रात्री 9 वाजेच्या सुमारास वाद सुरु झाला.अवैध पार्किंगमुळे सदर वाहन पार्किंगच्या ठिकाणी लावण्याची विंनती कोठारी ज्वेलर्सचे संचालक व इतर व्यवसायिकांनी केली असता सदर वाहनचालकाने व पोलिस अधिकार्याने मी कोण आहे तुला माहित नाही का अशा रुबाब झाळत मुजोरी केली.वाद वाढत असल्याचे बघत किरनापूर येथील कोब्राबटालियनच्या जवानाना बोलावले ते जवान तिन ते चार गाड्यामध्ये 20 ते 30 च्या संख्येत गोंदियाच्या पोलिस ठाण्यासमोर पोचले.तोपर्यंत हा वाद गोंदिया शहर पोलिस ठाण्यापर्यंत पोचलेला होता.उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश बरकते,गोंदिया शहर पोलिस निरिक्षक दाभाडे,ग्रामीण पोलिस निरिक्षक शुक्ला,शिवसेना जिल्हाप्रमुख राजकुमार कुथे यांनी परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी चर्चा सुरु केली.त्या दरम्यान किरनापूर येथून  आलेल्या पोलिस अधिकायाने राजकुमार कुथे यांच्यावरच हल्ला चढविण्याचा प्रयत्न केला तेव्हा उपविभागीय पोलिस अधिकारी बरकते यांनी चांगलीच समज समोरच्या पोलिस अधिकायाला दिली.याप्रकरणामुळे व्यापारी व इतर नागरिक पोलिस ठाण्यासमोर जमले असता त्या जमावातील नागरिकावर कोब्रा बटालियनच्या जवानानी लाठीमार केल्याने चार पाच व्यक्ती जखमी झाले.त्यापैकी सिव्हील लाईन निवासी 65 वर्षीय माहुले नामक व्यक्तीला चांगला मार लागला असून समाजसेवक राजेश कनोजिया यांनी त्यांना केटीएस रुग्णालयात उपचारासाठी नेले.तसेच त्या परिसरातीलच जैन नामक एका व्यापार्याला सुध्दा मारहाण करण्यात आली.कोब्रा बटालियनच्या या दादागिरीचा सर्वत्र निषेध नोंदविण्यात येत आहे.वास्तविक मध्यप्रदेशातील पोलिसांनी गोंदियात येऊन अशा प्रकारचा धिंगाणा घालून येथील पोलिसांच्या कार्यक्षेत्रातच ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केला आहे.या सर्व प्रकरणात अद्यापही कुणाकडूनही तक्रार दाखल झालेली नाही.जेव्हा की मारहाण झाल्याचे चिन्ह रात्रीलाच काहींनी पोलिसांना दाखविल्यानंतरही तक्रार दाखल करण्यास पुढे का आले नाही हा चर्चेचा विषय झालेला आहे.
बेरार टाईम्सने यांसबधी उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश बरकते यांना विचारणा केली असता त्यांनी सदर प्रकार घडल्याची माहिती देत कुणाकडूनही तक्रार आलेली नसल्याचे सांगितले.परंतु किरनापूर येथील कोब्रा बटालियनच्या वरिष्ठ पोलिस अधिकायाने किमान स्थानिक पोलिसांना विश्वासात घ्यायला हवे होते असे सांगत रात्रीला झालेल्या सर्व प्रकरणाची माहिती महाराष्ट्र व मध्यप्रदेशच्या पोलिस विभागाच्या वरिष्ठांना कळविण्यात आल्याचे सांगितले. यासंबधी बालाघाटचे पोलिस अधिक्षक अमित सांघी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

Friday 25 August 2017

देवरीचा राजा दर्शनासाठी सज्ज

देवरी चा राजा (छायाचित्र सुजित टेटे)
देवरी: २५(सुजित टेटे)
लोकमान्य गणपती स्पर्धेमध्ये विभागातून प्रथम क्रमांक प्राप्त झालेला देवरीचा राजा दर्शनासाठी सज्ज आहे.  येथील नवयुवक किसान गणेश मंडळ नानाविविध उपक्रमासाठी नेहमी चर्चेत असतो. या वर्षी सुद्धा विविध उपक्रम राबविले जाणार याची माहिती मंडळाचे जवाहरलाल शाहू, दिनेश भेलावे आणि लेखराम निर्वाण यांनी दिली.

मोठ्या उत्सुकतेने भाविक दर्शनासाठी आल्याचे दिसून येते.

तुमसर नगर परिषदेवर जप्तीची नामुष्की

भंडारा,दि.25- जिल्ह्यातील तुमसर नगरपरिषदेने शाळा व इमारतीसाठी अमरावती येथील व्यापाऱ्याकडून खरेदी केलेल्या फर्निचरची रक्कम देण्यास टाळाटाळ केल्याप्रकरण नगरपरिषदेवर जप्तीची कारवाई करावी, असा आदेश न्यायालयाने दिला आहे. जप्तीची कारवाई टाळण्यासाठी सुमारे एक कोटी रुपये भरावे लागणार असल्याने नगर परिषदेवर जप्तीची नामुष्की ओढवण्याची दाट शक्यता आहे.
सन १९९२मध्ये नगर परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष संतोष छितरका यांनी पालिकेच्या शाळा व कार्यालयाक‌रिता अमरावती येथील छाबरा ट्रेडर्स येथून २ लाख ९२ हजार व १६ लाख रुपयांचे फर्निचर खरेदी केले होते. परंतु, तेव्हा त्याची रक्कम अदा केली नव्हती. दरम्यान, पालिकेत सत्तापरिवर्तन झाल्यानंतर छाबरा यांचे बील रोखण्यात आले. तेव्हा छाबरा यांनी याबाबत न्यायालयात धाव घेतली. वर्ष १९९७-९८मध्ये सत्र न्यायालयाने छाबरा यांच्या बाजुने निकाल देत त्यांची थकीत संपूर्ण रक्कम व्याजासह परत करण्याचे आदेश नगर परिषदेला दिले होते. परंतु, तत्कालीन नगराध्यक्ष जगदिश कारेमोरे यांनी रिवाइज पिटीशन दाखल करून जप्तीची कारवाई टाळली. वर्ष २०१३ मध्येही न्यायालयाने छाबरा यांच्याच बाजुने निर्णय दिला. त्यानंतरचे नगराध्यक्ष विजय डेकाटे यांनी पुन्हा याचिका दाखल करून कारवाई टाळली.

जिल्ह्यात ग्रामपंचायतच्या ३६२ जागा बसपा लढविणार


24bhph50_2017087500


भंडारा,दि.25: सध्या सर्वत्र दुष्काळसदृश स्थिती असताना सरकारकडून नागरिकांची दिशाभूल केली जात आहे. कर्जमाफीची फसवी घोषणा करून नागावले जात आहे. ग्रामीण विकासाच्या नावावर आश्वासनेच दिली जात आहेत. याविरोधात जनमाणसात संताप आहे. ग्रामीण भागाच्या विकासासाठी बहुजन समाज पक्ष हा बहुजन समाज पॅनलखाली ग्रामपंचायतीच्या ३६२ जागा लढविणार आहे, अशी माहिती बसपाचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश नंदूरकर यांनी पत्रपरिषदेत दिली.
ग्रामीण भागातील जनतेत सरकारप्रती असंतोष आहे. अनेक ठिकाणी पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित आहे. त्यांना मोबदला मिळाला नाही. व्याघ्र प्रकल्पाच्या समस्या कायम आहेत. याशिवाय ग्रामस्वच्छता, आरोग्य, शिक्षण आदी बाबतीत राज्य सरकार अपयशी ठरली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सरकारने बियर बारसाठी आखलेली ५०० मिटरची मर्यादा ही तरुणांसाठी धोकादायक आहे. या मर्यादेमुळे सर्वाधिक दारू दुकाने ही ग्रामीण भागात उघडले जाऊन तिथे अनेक समस्या निर्माण होणार आहेत. या सर्व प्रकाराला विरोध करण्यासाठी तसेच जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी बसपा प्रयत्न करणार आहे. शहरी भागातील नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी नगर परिषदांकडे पाठपुरावा केला जाणार असल्याचे डॉ. नंदूरकर म्हणाले. पत्रपरिषदेला बसपाचे जिल्हा महासचिव शशिकांत भोयर, जि.प. सदस्य रेखा भुसारी, शहर अध्यक्ष निरंजन दलाल, पवनी शहर अध्यक्ष राजाराम गणविर, संजय सावरकर, शबाना शेख, प्रिया शहारे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

उच्च न्यायालयाच्या न्यायाधीसांवर सरकारचा भरोसा नायः खंडपीठ बदलून घेतले

मुंबई,25- ध्वनिप्रदूषणाच्या नियमांबाबत उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याला पर्याय उरले नसल्याने राज्य शासनाने महाधिवक्त्यांना विश्वासात न  घेता न्या. अभय ओक यांच्यावर पक्षपातीपणाचा आरोप केला. मुख्य न्यायाधीशांनी राज्य सरकारच्या आरोपानंतर या प्रकरणाच्या सुनावणी दुसऱ्या खंडपीठाकडे वर्ग केले.
 याचिकांवर गुरुवारी सुनावणी झाली. त्यादरम्यान पूर्वीच्या निकालावर फेरविचारासाठी राज्य सरकार औपचारिक अर्ज करेल, असे महाअधिवक्ते आशुतोष कुंभकोणी यांनी सांगितले.दरम्यानं एका अन्य सरकारी वकिलामार्फत सरकारने न्या. ओक पक्षपाती असल्याचा आरोप करून या सर्व याचिका अन्य न्यायाधीशांपुढे वर्ग करण्याची विनंती मुख्य न्यायाधीशांकडे केली.
 याविषयीची माहिती अ‍ॅड. कुंभकोणी यांनी दिल्यानंतर न्या़ ओक म्हणाले की, सरकारचा अर्ज वाचून आपणास धक्का बसला़ पक्षपातीपणाचा आरोप सरकारने केला आहे. त्यामुळे  सरकारने महाधिवक्त्यांचीही अडचण केली आहे. सरकार एका सामान्य पक्षकाराप्रमाणे वागत आहे. सरकार माझ्यावर आरोप करत आहे, म्हणून मी या याचिकांवर सुनावणी घेण्यापासून स्वत:ला वेगळे करणार नाही. यासंदर्भात मुख्य न्यायाधीशांकडून निर्देश आणण्याचे आदेश न्या. ओक व रियाझ छागला यांनी महाधिवक्त्यांना दिले.
याचिकाकर्त्यांचे वकील बिरेंद्र सराफ यांनीही सरकारच्या बदललेल्या भूमिकेला विरोध केला. सरकारला आदेशाचे पालन करण्यावाचून गत्यंतर नसल्याने त्यांनी न्यायाधीशांवर अविश्वास दाखविला आहे. आपल्या आमदारांना आणि कार्यकर्त्यांना गणेशोत्सवाच्या काळात धिंगाणा घालायला मिळावा, यासाठी अशा प्रकारचा आरोप सरकार न्या. ओक यांच्यावर करत असल्याचे अ‍ॅड. सराफ यांनी सांगितले.
ज्येष्ठ वकील अनिल अंतुरकर, एस.एम. गोरवाडकर यांनीही राज्य सरकारवर नाराजी व्यक्त केली. भविष्यात न्यायालय जेव्हा सरकारविरुद्ध कठोर भूमिका घेईल, तेव्हा राज्य सरकार न्यायाधीशांवर कशा प्रकारचा आरोप करेल? सरकारची ही वृत्ती वेळीच रोखली पाहिजे,’ असे मत या विधिज्ञद्वयींनी व्यक्त केले.
या याचिकांवरील सुनावणी दुपारी होण्यापूर्वीच मुख्य न्या. मंजुला चेल्लुर यांनी पुढील सुनावणीसाठी स्वतंत्र खंडपीठ नियुक्त करण्याचा आदेश दिला.

BERARTIMES_23-29_AUG_2017






Thursday 24 August 2017

कृषि उत्पन्न बाजार समित्यांसाठी पात्र शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार

अध्यादेश पुन:प्रख्यापित करण्याचा निर्णय

मुंबई,24-कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीत पात्र शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्यासाठी राज्य शासनाने 13 जून 2017  रोजी प्रख्यापित केलेला अध्यादेश पुन:प्रख्यापित करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये पात्र शेतकऱ्यांना मतदानाचा हक्क देण्यासाठी  महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम-1963 मधील कलम  2, 13  व  14 मध्ये सुधारणा करण्यासाठी 13 जून 2017 रोजी प्रख्यापित केलेला महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक 9  मधील तरतुदी पुढे सुरू ठेवण्यासाठी आणि या अद्यादेशान्वये करण्यात आलेल्या कार्यवाहीस संरक्षण देण्यासह हा अध्यादेश पुन:प्रख्यापित करण्याचा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठविण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

कर्मचारी सहकारी पंतसंस्थेच्या निवडणुकीत सहकार पॅनल विजयी


भंडाराः-भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी अधिकोष कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत सहकार पॅनल विजयी झाली. भंडारा व गोंदिया जिल्हयाच्या विभाजनापूर्वी एकच जिल्हा मध्यवर्ती बॅक कार्यरत होती. परंतू जिल्हयाच्या विभाजनानंतर सहकार निवडणूक प्राधिकरण नुसार तसेच दोन जिल्हयाच्या मागणीनुसार दोन्ही जिल्हयात स्वतंत्र दोन वेगवेगळया बँक कार्यान्वीत झाल्या. बॅका जरी वेगवेगळया झाल्या तरी दोन्ही बँकेच्या कर्मचाèयांची पतसंस्था एकच होती. ती यावेळी म्हणजे व्यवस्थापन समिती निवडणूक सन २०१७ ते २०२२ करीता स्वतंत्र पतसंस्थेचा निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला. त्याअनुसंगाने मतदान व त्यानंतर लगेच निकाल घोषीत करण्यात आला. यावेळी दोन्ही पॅनलने निवडणूक लढविली. सहकार पॅनल व हितqचतक पॅनल यात सहकार पॅनलचे १० उमेदवार विजयी झाले. तर हितqचतक पॅनलचा एक उमेदवार विजयी झाला. सहकार पॅनलचे विजयी उमेदवार दिपक डहारे, खुशाल आजबले, देवचंद कुलरकर, वामन मोटघरे, उमेश कढव, प्रशांत पालांदूरकर, राजेश गडकरी, परेश कोट्टेवार, अंजू पडोळे, वैशाली नागदेवे, तर हितqचतक पॅनलचे प्रङ्कुल्ल बोहटे यांचा विजयी उमेदवारांमध्ये समावेश आहे. सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन सर्व जेष्ठ नेते तसेच बॅकेचे सर्व कर्मचारी यांनी केले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अतूल वानखेडे यांनी काम पाहीले.

करडी येथे जातीय सलोखा समितीची सभा


करडी(पालोरा)-करडी येथील पोलीस स्टेशनच्या वतीने दि. २३ ऑगष्ट रोजी पोलीस स्टेशनच्या आवारात जातीय सलोखा समितीची सभा पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी जि.प. सदस्या नलिमा इलमे होत्या. प्रमुख पाहूणे म्हणून सरपंच सिमा साठवणे, गंगाबाई साठवणे, ठाणेदार तुकाराम कोयंडे, सौ. चौरागडे आदी प्रामुख्याने उपस्थित होत्या. यावेळी गणपती उत्सव व अन्य सण, उत्सव कसे शांततेत पार पाडायचे, कायदा व सुव्यवस्था कशी अवाधित ठेवता येईल, याची माहिती देण्यात आली. परस्पर बंधुभाव, सदभावना, एै्नय व इतरांच्या सणांचा, उत्सवांचा आदर कसा बाळगायचा, यासंबंधी मार्गदर्शन करण्यात आले. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वानी सहकार्य करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाला परिसरातील सरपंच, पोलीस पाटील, पोलीस मित्र, सामाजीक कार्यकर्ते, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी तसेच महीला उपस्थित होत्या. संचालन हवालदार विजय सलामे यांनी केले तर आभार गुप्त विभागाचे पोलीस साठवणे यांनी मानले.

दाभोलकर- पानसरेंचे मारेकरी याचे आर्थिक स्त्रोत तपासा-उच्च न्यायालय


मुंबई : डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांचे संशयित मारेकरी अद्यापही फरारी आहेत. यावरून हा खूप विचारपूर्वक रचलेला कट आहे. फरार आरोपींच्या पाठीशी संघटना भक्कमपणे उभी आहे. त्यामुळे या दोघांना पैसे मिळण्याचे स्त्रोताचा तपास करा, अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयाने दोन्ही तपास यंत्रणांना केली. 
दाभोलकर व पानसरे हत्येप्रकरणी सारंग अकोलकर व विनय पवार हे  दोघे संशयित आरोपी आहेत. गेल्या चार वर्षापासून तपास यंत्रणा त्यांना अटक करू शकली नाही. सीबीआय तसेच विशेष तपास पथकाने (एसआयटी) बुधवारच्या सुनावणीत न्या. एस. सी. धर्माधिकारी व न्या. विभा कंंकणवाडी यांच्या खंडपीठापुढे सादर केलेल्या अहवालावर प्रतिक्रिया व्यक्त करताना न्यायालयाने म्हटले की, हे काही एका किंवा दोघांचे काम नाही. संघटना त्यांना आर्थिक मदत करत आहे. अतिशय विचारपूर्वक हे कट रचण्यात आला असून दोन्ही हत्यांचे (पानसरे व दाभोलकर) संबंध आहेत, असे न्यायालयाने नमूद केले.
या दोघांना पकडणे अशक्य तर नाहीच; कारण या दोघांचीही पाळेमुळे समाजातच आहेत. एकमेकांना सहाय्य करा, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा. या दोघांना कोणी आर्थिक मदत करीत असेल, तर त्यांची बँक खाती असणार; त्यामुळे एटीएम, बँक याबाबत विचार करा. केवळ नातेवाईक आणि मित्र यांच्यावर लक्ष ठेवू नका, असे न्यायालयाने सांगितले. गुन्हा घडला त्या दिवशी घटनास्थळाहून सीमावर्ती राज्यांत जाणाºया किती ट्रेन होत्या? या ट्रेनमधून जाणाºयांची यादी बघितली का? तिकिटे तपासली का? या सर्व बाबी लक्षात घेऊन तपास करा. राज्याची सुरक्षा वेठीस धरली गेली आहे. लोकांचा तपास यंत्रणेवरील विश्वास कायम राहिला पाहिजे, असेही न्यायालयाने म्हटले.


Wednesday 23 August 2017

खऱ्या शेतकऱ्यांचीच कर्जमाफी होणार- आ.फुके



शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे बिरसी येथे अनावरण

गोंदिया,२३- छत्रपती शिवाजी महाराजांनी देशात सर्वप्रथम कर्जमाफी केली होती. त्यानंतर महाराष्ट्र शासनाने ३५ हजार कोटींची सर्वांत मोठी कर्जमाफी केली आहे. यापूर्वीच्या सरकारांनी केवळ नेत्यांची व त्यांच्या ताब्यातील सहकारी क्षेत्रातील बँकांची कर्जमाफी केली होती. असा आरोप आमदार डॉ. परिणय फुके यांनी बिरसी येथे (ता.२३) आज केला.
गोंदिया तालुक्यातील बिरसी येथे कुणबी समाजाच्या वतीने शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. त्यावेळी ते  बोलत होते. मंचावर माजी जिल्हा परिषद सदस्य रजनी नागपुरे, नगरपालिका उपाध्यक्ष शिव शर्मा, बिरसीचे सरपंच रवींद्र तावाडे आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ. फुके म्हणाले की, या कर्जमाफीतून ग्रामपंचायत सदस्य, जि.प. व  पं.स. सदस्य, आमदार व खासदार यांना वगळण्यात आले आहे. यामुळे कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या पोटात दुखत असल्याची बोचरी टीका फुके यांनी केली. या कर्जमाफीच्या माध्यमातून सरकार सर्व शेतकèयांना पूर्णपणे कर्जमुक्त करणार आहे. बिरसी येथील ग्रामस्थांना विमानतळ पुनर्वसनाचा लाभ हा ८ वर्षानंतर वाढीव दराने मिळावा, यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी उपस्थितांनी दिली.
यावेळी महेंद्र देशमुख, भाऊराव उके, सुनील येवले, मुन्ना मेश्राम, नत्थू शेंडे, आत्माराम डोये, गणेश कोरे, सुरेंद्र तावाडे बहादूर यादव, आत्माराम दसरे, राजेश चतुर, छत्रपाल तुरकर, सुभाष मुंदडा आदी मान्यवर उपस्थित होते

लढा ओबीसींचाः क्रिमीलेअरची मर्यादा ६ लाखांवरून ८ लाखावर




नागपूर,२३- ओबीसींच्या संवैधानिक हक्काच्या लढ्याची धग संपूर्ण देशात पसरत आहे. या लढ्याची दखल आता केंद्राला सुद्धा घ्यावी लागत आहे. गेल्या ७ ऑगस्ट रोजी दिल्लीच्या कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडियाच्या सभागृहात ओबीसींचे दुसरे राष्ट्रीय महाअधिवेशन झाले. या महाअधिवेशनामुळे सरकारने ओबीसींच्या आरक्षणावरील टांगलेली तलवार थोडीवर उचलली आहे. क्रिमीलेअरची मर्यादा सरकारने ६ लाखांवरून आज ८ लाख केल्याची जी घोषणा केली, ती ओबीसींंच्या महाअधिवेशनाची फलश्रुती आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे संयोजक प्रा. बबनराव तायवाडे यांनी व्यक्त केली आहे.
स्वातंत्र्य मिळाल्यापासून देशातील ५२ टक्के ओबीसी समाज सत्ताधाèयांकडून अपेक्षा बाळगून होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसींच्या संवैधानिक हक्कांचे संरक्षण करण्यासाठी घटनेत ३४० कलमाची तरतूद करून ठेवली. परंतु, ओबीसींच्या संयमाचा राज्यकत्र्यांनी वेगळाच अर्थ लावला. ओबीसींना या देशात पद्धतशीरपणे देशोधडीला लावण्याचे  काम झाले. यामुळे ओबीसी समाजाला आता रस्त्यावर यावे लागले. ५२ टक्के समाजाला केवळ २७ टक्के आरक्षण देऊन तोंडाला पाने पुसली. त्याउपरही असंवैधानिक अशी क्रिमीलेअरची मर्यादा घालून प्रत्यक्ष आरक्षणापासून वंचित ठेवले. हे आता आंदोलनाच्या माध्यमातून लोकांच्या लक्षात येऊ लागले. यामुळे सरकारला ओबीसींच्या आंदोलनाची दखल घेण्याला पर्याय उरला नाही,असे मत महासंघाचे राजकीय समन्वयक डॉ. खुशाल बोपचे यांनी व्यक्त केले.
क्रिमीलेअरच्या जाचक अटींमुळे प्रशासकीय अधिकारी बनू पाहणाèया युवकांच्या हातात आलेली नोकरी सरकारने हिरावून घेत त्यांना बेरोजगार करण्याचे पातक केले. ओबीसींच्या वाट्याच्या नोकèया उच्चवर्णीयांच्या घशात घातल्या गेल्या. महासंघाची क्रिमीलेअरची अटच रद्द करण्याची मागणी आहे. इतरांना अशी अट नसेल तर ती ओबीसीला का? या प्रश्नाचे उत्तर सुद्धा सरकारकडे नाही. सरकारपुढे काही अडचणी असतील तर  काही काळापुरती क्रिमीलेअरची मर्यादा ३० लाख रुपये करण्याची मागणी दिल्लीतील अधिवेशनाच्या माध्यमातून केली होती. याची दखल केंद्राला घ्यावी लागली. परिणामी, आज केंद्राने ही अट ६ लाखांवरून ८ लाखावर नेली. परंतु, या वाढीमुळे आम्ही समाधानी नाही. ओबीसी समाज एवढ्यावरच थांबणार नाही, तर आपले संपूर्ण हक्क मिळेपर्यंत लढत राहणार, असा इशारा सुद्धा महासंघाने सरकारला दिला आहे.

आज निवडणूक झाल्यास काँग्रेसची सरसी , भाजपाची चिंता वाढवणारा सर्व्हे



बंगळुरु, दि. 23 - काँग्रेसमुक्त भारतसाठी कंबर कसलेल्या भाजपसाठी चिंता वाढवणारी एक बातमी आहे. कर्नाटक विधानसभा निवडणूक 2018 साठी काँग्रेसने जोरदार तयारी केली असून आजच्या घडीला निवडणूक घ्यायची ठरल्यास भाजपाचा पराभव करत काँग्रसेचा विजय होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सी फोरने हा सर्व्हे केला आहे. 19 जुलै ते 10 ऑगस्टरदरम्यान हा सर्व्हे करण्यात आला. सर्व्हेनुसार, निवडणूक झाल्यास काँग्रेसला 120 ते 132 जागा मिळू शकतात. भाजपाच्या जागांमध्ये वाढ होईल, पण त्यांना 60 ते 72 जागाच मिळतील. तर जेडी(एस) 24 ते 30 जागांवर विजय मिळवेल. सर्व्हेनुसार, काँग्रेसला एकूण 43 टक्के तर भाजपाला 32 आणि जेडी(एस)ला 17 टक्के मतं मिळतील.
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, सी फोरने एकूण 165 विधानसभा मतदारसंघातील 24 हजार 676 मतदारांची मुलाखत घेतली आहे. मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी सुरु केलेली अन्न भाग्य स्कीम मतदारांना प्रचंड आवडली असल्याचं सर्व्हेमध्ये प्रामुख्याने समोर आलं आहे. मात्र यासोबतच पिण्याच्या पाण्याची कमतरता, खराब रस्ते, बेकारी तसंच कचरा नष्ट करण्यासाठी नसलेली योजना या समस्या मतदारांना मोठ्या प्रमाणात भेडसावत आहेत. 
पीटीआयने गेल्या महिन्यात दिलेल्या वृत्तानुसार, काँग्रेसने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली असून उमेदवार निवडण्यासाठी माहिती जमा करत आहेत. काँग्रेस विभागनिहाय सर्व्हे करत असून एकदा सर्व्हे पुर्ण झाल्यानंतर सर्व जिल्ह्यांमध्ये जाऊन सरकारने केलेल्या कामांची माहिती देणार आहेत. 
भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी मात्र भाजपाचा विजय होईल असा विश्वास व्यक्त केला होता. काही दिवसांपुर्वीच अमित शहा तीन दिवसांच्या दौ-यावर आले होते. यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं होतं की, 'भाजपाला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी मी येथे आलो आहे. लोकांची भेट घेतली असता त्यांना भाजपाला मतदान करायचं असल्याचं दिसत आहे'. 

225 जागांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपा 150 जागा जिंकेल असं अमित शहा बोलले आहेत. 150 जागा जिंकत भाजपा सरकार स्थापन करेल असंही ते बोलले आहेत. 2018 च्या सुरुवातीलाच कर्नाटक विधानसभा निवडणूक पार पडण्याची शक्यता आहे


प्रभूंनी रेल्वे अपघाताची जबाबदारी स्वीकारली! पंतप्रधान मोदींकडे सादर केला राजीनामा


Suresh-Prabhu_2017071547


नवी दिल्ली,दि.23(वृत्तसंस्था) – आठवडयाभरात झालेल्या दोन रेल्वे अपघातांची नैतिक जबाबदारी स्वीकारुन केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे आपला राजीनामा सादर केला आहे. सुरेश प्रभूंनी नरेंद्र मोदींना भेटून राजीनामा सादर केला. पंतप्रधान मोदींनी त्यांचा राजीनामा तात्काळ स्वीकारलेला नसून त्यांना थांबण्यास सांगितले आहे. रेल्वे अपघातामुळे मला प्रचंड दु:ख, वेदना झाल्या असे प्रभूंनी टि्वटमध्ये म्हटले आहे.
प्रभूंच्या आधी भारताचे दिवंगत पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांनी रेल्वेमंत्री असताना तामिळनाडूतील रेल्वे अपघाताची जबाबदारी स्वीकारुन राजीनामा दिला होता. पण पंडित जवाहरलाल नेहरु यांनी त्यांचा राजीनामा फेटाळून लावला होता. तसेच आताचे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही देशाचे रेल्वेमंत्रीपद संभाळले आहे. त्यांनी सुद्धा अशाच प्रकारे रेल्वे अपघाताची जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. उत्तर प्रदेशातील आझमगडहून दिल्लीला रवाना झालेल्या कैफियत एक्स्प्रेसचा रात्री उशिरा अपघात झाला होता. एक्स्प्रेसचे दहा डबे रुळावरुन घसरले.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील कानपूर आणि इटावा दरम्यान औरैया जिल्ह्यात 12225 (अप) कैफियत एक्स्प्रेसचा अपघात झाला. येथील अछल्दा आणि पाता रेल्वे स्टेशनच्या दरम्यान मानवरहीत क्रॉसिंगजवळ रेल्वे फाटक आहे. या ठिकाणी फाटक क्रॉस करणा-या डंपरला कैफियत एक्स्प्रेसने धडक दिली. यावेळी कैफियत एक्स्प्रेसचे इंजिनसह दहा डबे रुळावरुन खाली घसरले. ही घटना रात्री अडीच वाजताच्या सुमारास घडली. दरम्यान, या अपघातात त्यात ७४ प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना औरैया येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याचबरोबर, गेल्या शनिवारी उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगर जिल्ह्यात खतौली येथे पुरी-हरिद्वार उत्कल एक्स्प्रेसचे 14 डबे रुळावरून घसरून अपघात झाल्याची घटना घडली होती. या अपघातात 23 प्रवाशांचा मृत्यू झाला तर, 40 हून अधिक जखमी झाले आहेत. दरम्यान, हा अपघात अभियांत्रिकी विभागाच्या चुकीमुळे झाल्याचा प्रथमदर्शनी निष्कर्ष उत्तर रेल्वे प्रशासनाने काढला असून, याप्रकरणी वरिष्ठ विभागीय अभियंत्यासह अभियांत्रिकी विभागातील चौघांना निलंबित करण्यात आले आहे. तर उत्तर रेल्वेच्या व्यवस्थापकांसह 8 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तीन जणांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे, तर एका अधिका-याची बदली करण्यात आली आहे.

कर्जमाफी ऑनलाईन नोंदणीसाठी 15 सप्टेंबर पर्यंत मुदत

मुंबई, दि. 23 : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु असून ऑनलाईन अर्ज भरण्यासाठीची मुदत दिनांक 15 सप्टेंबर 2017 पर्यंत राहील. आणि दिनांक 1 ऑक्टोबर 2017 पासून कर्ज माफीची रक्कम शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा होण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येईल. तसेच दि. 22 ऑगस्ट 2017 पर्यत 22 लाख 40 हजार 943 शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे.तर 18 लाख 85 हजार 457 शेतकऱ्यांचे ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. असा निर्णय आज मंत्रिमंडळ उपसमितीच्या झालेल्या पहिल्या बैठकीत घेण्यात आला अशी माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.
कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी गठीत मंत्रिमंडळ उपसमितीची पहिली बैठक त्यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाली. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर, परिवहन मंत्री दिवाकर रावते, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव डी. के. जैन, सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव एस.एस.संधू, कृषी विभागाचे प्रधान सचिव बिजय कुमार आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कर्जमाफी अंमलबजावणी संदर्भात येत असलेल्या अडीअडचणीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. ई-सुविधा केंद्रांवरील अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरीही काही केंद्रांवर शेतकऱ्यांकडून अर्ज भरण्यासाठी पैसे आकारण्याच्या तक्रारी येत आहेत. याबाबत संबधित ई-सेवा केंद्रांवर कारवाई करावी आणि बंद असलेली केंद्र तात्काळ सुरु करावेत, असे आदेश या बैठकीत देण्यात आले. राज्यातील सर्व संबधित शेतकऱ्यांनी दि. 15 सप्टेंबर 2017 पर्यंत जवळच्या ई -सुविधा केंदांवर जाऊन कर्जमाफीचे अर्ज भरावेत.असे आवाहन सहकार मंत्री श्री देशमुख यांनी यावेळी केले.
· बंद असलेली ई-सुविधा केंद्र तत्काळ सुरु करण्याच्या सूचना.
· कर्जमाफीसाठी वेळेत अर्ज भरण्याचे शेतकऱ्यांना आवाहन.
· आतापर्यंत 22 लाख 40 हजार 934 शेतकऱ्यांची नोंदणी
· तर 18 लाख 85 हजार 457 शेतकऱ्यांचे ऑनलाईन अर्ज प्राप्त

Tuesday 22 August 2017

आग्रा येथे गायी आणि बैलांवर अॅसिड हल्ला

आग्रा,22- आग्रा जिल्ह्यातील सुदूर गावात गायी आणि बैलांवर अॅसिड हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तिंविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.
बजरंग दलाने सोमवारी हा आरोप केला. एका अज्ञात व्यक्तिने गावातील डझनभर गायी-बैलांवर अॅसिड हल्ला केला. सध्या या जखमी गायी आणि बैलांवर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी भादंविच्या कलम ४२९ अन्वये गुन्हा दाखल केला असून आरोपींचा कसून शोध सुरू असल्याचं पोलीस ठाण्याचे प्रभारी राजा सिंह यांनी सांगितलं. गेल्या काही महिन्यापासून ताजगंजमधील करभाना गावातही गायी आणि बैलांवर अॅसिड हल्ले होत आहेत. हरयाणाच्या फरिदाबाद येथेही गायींवर अॅसिड हल्ला होण्याच्या घटना घडल्या आहेत. बैलांना पळवून लावण्यासाठीच हे अॅसिड हल्ले होत असल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे.

मुस्लिम पर्सनल बोर्डाचा संसदेवर अविश्वास


 नवी दिल्ली,22- मुस्लिमांच्या नागरिक आणि इस्लामच्या हितासाठी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड काम करत आहे. आमच्या कायद्यांमध्ये कोणीही हस्तक्षेप करू नये. सध्या संसदेत चांगले लोक नसल्याने ते मुस्लिमांचे भले करू शकत नाही. तिहेरी तलाकची प्रथा योग्य असून  ती कुणालाही बदलू देणार नाही, अशी प्रतिक्रिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य मौलाना मेहफूज यांनी दिली आहे.
मुस्लिम समाजातील महिलांसाठी अन्यायकारक असलेल्या 'ट्रिपल तलाक' प्रथेबाबत सहा महिन्यांत कायदा करण्याचे आदेश देत, तोपर्यंत या प्रथेवर बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण निकाल आज सर्वोच्च न्यायालयाने सुनावला आहे. मुस्लिम महिला आणि सामाजिक कार्यकर्ते कोर्टाच्या या निर्णयाचं स्वागत करत आहेत.  
सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात थेट हस्तक्षेप करण्यास नकार देत चेंडू संसदेकडे ढकलला आहे. याबाबत त्यांनी सरकारला कायदा करायला सांगितलंय. याचाच अर्थ तिहेरी तलाक घटनाबाह्य असल्याचं त्यांनाही मान्य नाही, असा युक्तिवाद मौलाना मेहफूज यांनी केला. ९९ टक्के तलाक हे कुराणातील मार्गदर्शक तत्वांनुसारच होतात आणि त्यात काहीच गैर नाही, असंही त्यांनी नमूद केलं. तसंच, ही संसद गुन्हेगारांची संसद आहे, तिथे अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, ते माइक तोडतात - चपला फेकतात. त्यामुळे तिथे मुस्लिमांच्या भल्याचा निर्णय होईल, असं आम्हाला अजिबात वाटत नाही, अशी टिप्पणी करत त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. मुस्लिम समाजाचं हित करण्यासाठी पर्सनल लॉ बोर्ड सक्षम असल्याचंही त्यांनी सांगितलं.

पतंजलीला टक्कर देण्यासाठी श्री श्री झाली सज्ज


 मुंबई,22- अल्पावधीतच विस्तार पावलेल्या योगगुरू रामदेव बाबा यांच्या पतंजली कंपनीला बाजारात टक्कर देण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांची 'श्री श्री आयुर्वेद' (एसएसए) कंपनी सज्ज झाली आहे. उत्पादनांच्या विक्रीसाठी 'श्री श्री आयुर्वेद' कंपनीने एक हजारहून अधिक दुकाने उघडण्याची तयारी केली असून सुरुवातीला टूथपेस्ट, डिटर्जंट, तूप आणि बिस्कीट्स ही उत्पादनं विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत.

'नागरिकांच्या दैनंदिन जीवनात आयुर्वेदिक उत्पादनांचा वापर वाढला आहे. आमचा ब्रॅण्ड हा अन्य कंपन्यांपेक्षा वेगळा असेल. 'श्री श्री आयुर्वेद' (एसएसए) 'श्री श्री तत्व' ही ब्रॅण्ड स्टोअर उघडणार आहे. २००३मध्ये या कंपनीने हेल्थ ड्रिंक्स, साबण आणि मसाले अशी उत्पादनं आणली होती. आता फक्त मॉडर्न रीटेल स्टोअर्स उघण्यात येतील. यासोबत ऑनलाइन विक्रीही कंपनी सुरू करणार आहे. तसंच कंपनी ३०० हून अधिक नवी उत्पादनं बाजारात आणणार आहे. आयुर्वेदिक मार्केट वाढवणं हेच आमच ध्येय आहे. आम्हाला कोणासोबत स्पर्धा करायची नाही आहे. 'श्री श्री तत्व'चे स्टोअर्स पतंजली स्टोअर्सच्या जवळपास असतील', असं 'श्री श्री आयुर्वेद' (एसएसए) ट्रस्ट चे मुख्य कार्यकारी अधिकारी तेज कटपिटिया यांनी सांगितलं.

'श्री श्री तत्व'चे पहिले स्टोअर हे पुढच्या महिन्यात उघडणार आहे. याचबरोबर नोव्हेंबरपर्यंत ५० स्टोअर्स उघडण्याचा आम्ही प्रयत्न करू, असं फ्रेंचाइज इंडिया होल्डिंग्सचे प्रमुख गौरव मार्या यांनी सांगितलं. पतंजली कंपनीने फार कमी वेळात भारतीय बाजारपेठेत स्वताःचं स्थान निर्माण केलं आहे. पतंजलीमुळे अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांना हर्बल सेक्टरकडे लक्ष देण्यास भाग पाडलं आहे.

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...