Wednesday 23 August 2017

आज निवडणूक झाल्यास काँग्रेसची सरसी , भाजपाची चिंता वाढवणारा सर्व्हे



बंगळुरु, दि. 23 - काँग्रेसमुक्त भारतसाठी कंबर कसलेल्या भाजपसाठी चिंता वाढवणारी एक बातमी आहे. कर्नाटक विधानसभा निवडणूक 2018 साठी काँग्रेसने जोरदार तयारी केली असून आजच्या घडीला निवडणूक घ्यायची ठरल्यास भाजपाचा पराभव करत काँग्रसेचा विजय होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सी फोरने हा सर्व्हे केला आहे. 19 जुलै ते 10 ऑगस्टरदरम्यान हा सर्व्हे करण्यात आला. सर्व्हेनुसार, निवडणूक झाल्यास काँग्रेसला 120 ते 132 जागा मिळू शकतात. भाजपाच्या जागांमध्ये वाढ होईल, पण त्यांना 60 ते 72 जागाच मिळतील. तर जेडी(एस) 24 ते 30 जागांवर विजय मिळवेल. सर्व्हेनुसार, काँग्रेसला एकूण 43 टक्के तर भाजपाला 32 आणि जेडी(एस)ला 17 टक्के मतं मिळतील.
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, सी फोरने एकूण 165 विधानसभा मतदारसंघातील 24 हजार 676 मतदारांची मुलाखत घेतली आहे. मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी सुरु केलेली अन्न भाग्य स्कीम मतदारांना प्रचंड आवडली असल्याचं सर्व्हेमध्ये प्रामुख्याने समोर आलं आहे. मात्र यासोबतच पिण्याच्या पाण्याची कमतरता, खराब रस्ते, बेकारी तसंच कचरा नष्ट करण्यासाठी नसलेली योजना या समस्या मतदारांना मोठ्या प्रमाणात भेडसावत आहेत. 
पीटीआयने गेल्या महिन्यात दिलेल्या वृत्तानुसार, काँग्रेसने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली असून उमेदवार निवडण्यासाठी माहिती जमा करत आहेत. काँग्रेस विभागनिहाय सर्व्हे करत असून एकदा सर्व्हे पुर्ण झाल्यानंतर सर्व जिल्ह्यांमध्ये जाऊन सरकारने केलेल्या कामांची माहिती देणार आहेत. 
भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी मात्र भाजपाचा विजय होईल असा विश्वास व्यक्त केला होता. काही दिवसांपुर्वीच अमित शहा तीन दिवसांच्या दौ-यावर आले होते. यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं होतं की, 'भाजपाला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी मी येथे आलो आहे. लोकांची भेट घेतली असता त्यांना भाजपाला मतदान करायचं असल्याचं दिसत आहे'. 

225 जागांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपा 150 जागा जिंकेल असं अमित शहा बोलले आहेत. 150 जागा जिंकत भाजपा सरकार स्थापन करेल असंही ते बोलले आहेत. 2018 च्या सुरुवातीलाच कर्नाटक विधानसभा निवडणूक पार पडण्याची शक्यता आहे


No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...