Sunday 20 August 2017

शेतकºयांचे प्रश्न सुटत नसतील तर खासदारपदाचा राजीनामा-खा.पटोले


19bhph34_2017086153


लाखांदूर,दि.20 : सत्तेत राहून शेतकºयांचे प्रश्न सुटत नसतील, शेतकरी आत्महत्या थांबत नसतील तर योग्य वेळ आल्यास आपण खासदारपदाचा राजीनामा देण्यासाठी मागेपुढे पाहणार नसल्याचे विचार खासदार नाना पटोले यांनी काढले.ते लाखांदूर तालुक्यातील चारभट्टी येथे आयोजित श्रावणमास समाप्ती कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी आमदार बाळा काशीवार, आ.रामचंद्र अवसरे, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी विनोद पटोले, लाखांदूरच्या नगराध्यक्ष नीलम हुमणे, अजुर्नीच्या नगराध्यक्ष पोर्णिमा शहारे, शेषराव गिºहेपुंजे, कमल पाउलझगडे,सविता ब्राह्मणकर,नरेश खरकाटे,गोंदिया शहर भाजप अध्यक्ष सुनिल केलनका,विनोद ठाकरे,प्रल्हाद देशमुख,हरीश बगमारे,उध्दव मेहेंदळे,विलास हुमणे,अशोक चांडक,देवेंद्र टेंभरे, रामचंद्र राऊत,पोलीस निरीक्षक मंडलवार,वडसाचे माजी नगराध्यक्ष जेसा मोटवाणी,बंटी सहजवाणी,सुभाष खिलवाणी,रज्जू पठाण,स्वामी दिनेशानंद,बालू शिंदे,मणिलाल मिश्रा,राजू पालीवाल,गुड्डू लिल्हारे उपस्थित होते.
यावेळी खा.पटोले म्हणाले, सध्या भंडारा व गोंदिया या जिल्ह्यात दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मागीलवर्षी शेतकºयांना दुष्काळाचा सामना करावा लागला. यावर्षी कर्जमाफी झाली मात्र आॅनलाईन पद्धती जाचक ठरत आहे. संकटातील शेतकºयांना सरसकट कर्जमाफी देण्याची गरज आहे. शेतकºयांना २४ तास वीज मिळाली पाहिजे, शेतकºयांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत. यासाठी राजकारण न करता सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी एकत्र येऊन शेतकºयांच्या मदतीला धावून येण्याची गरज आहे. सरकारच्यावतीने शेतकºयांना मदत करण्याची वेळ आहे. सत्तेत असून शेतकºयांच्या प्रश्नांविषयी बोललो तर भूमिपूत्र म्हणून हिणविणारे आता माझ्या राजीनाम्याची मागणी करीत आहेत.परंतु सत्तेत असताना आपण शेतकºयांसाठी काय केले? याचा हिशेब जनतेला द्यावा,असा पलटवार त्यांनी केला.
यावर्षी हवामान खात्याचा अंदाज चुकला, वनहक्काचे दावे प्रलंबित आहेत, शेतकºयांना २४ तास वीज मिळत नाही, हे प्रश्न निकाली निघत नसतील तर खासदारपदाचा राजीनामा देण्यासाठी मागेपुढे पाहणार नसल्याचे स्पष्ट केले.या कार्यक्रमात उपस्थित साकोलीचे आ.राजेश काशीवार शेतकºयांचे प्रश्न मार्गी लागले पाहिजेत, शेतकºयांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत, शेतकºयांना मदत मिळाली पाहिजे, असे म्हणाले.संचालन नगरसेवक रामचंद्र राऊत यांनी तर आभारप्रदर्शन नूतन कांबळे यांनी केले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...