Saturday 19 August 2017

जात वैधता प्रमाणपत्र बाबतच्या अडचणी दूर करणार - राजकुमार बडोले


जात वैधता प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम


गोंदिया,दि.19 : सर्वसामान्य जनतेला जात वैधता प्रमाणपत्र तयार करण्यासाठी अनेक अडचणी येतात. या
अडचणी दूर करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे
पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
19 ऑगस्ट रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृह गोंदिया येथे जात वैधता
प्रमाणपत्राचे वाटप सामाजिक न्याय मंत्री बडोले यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. जिल्हा
जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य तथा उपायुक्त देवसुदन धारगावे, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी
समितीचे सदस्य सचिव तथा संधोधन अधिकारी गौतम वाकोडे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त मंगेश
वानखेडे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मिलिंद रामटेके यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री.बडोले यावेळी म्हणाले, पुर्वी गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र तयार
करण्यासाठी नागपूरला जावे लागत असे. परंतू आता प्रत्येक जिल्ह्यात जात वैधता प्रमाणपत्र समिती कार्यान्वीत
झाल्यामुळे हा त्रास कमी झाला आहे. राज्यातील वैद्यकीय व इंजिनियरींग अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे जात
वैधता प्रमाणपत्र प्रलंबीत राहणार नाही याची दक्षता घेण्यात येत असून येत्या आठ दिवसात हे काम पूर्ण होणार
असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी सामाजिक न्याय मंत्री बडोले यांच्या हस्ते रोशनी भुरे व कल्याणी चिखलोंढे या विद्यार्थीनींना जात वैधता प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती अंतर्गत 12 वी विज्ञान-768, व्यावसायीक अभ्यासक्रम-5 व निवडणूक विषयक-4, असे एकूण 777 जात वैधता प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य तथा उपायुक्त देवसुदन धारगावे यांनी केले. संचालन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य सचिव तथा संधोधन अधिकारी गौतम वाकोडे यांनी केले, उपस्थितांचे आभार जिल्हा समाज कल्याण अधिकारी मिलिंद रामटेके यांनी मानले.कार्यक्रमास विद्यार्थी व पालक बहुसंख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...