Wednesday 30 August 2017

युपीतील मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

लखनौ,दि.30- उत्तर प्रदेशातील  मदरशांवर आता योगी सरकार  वॉच ठेवणार आहे. यासाठी जीपीएस यंत्रणेचा आधार घेतला जाणार आहे. या माध्यमातून उत्तर प्रदेशातील एकूण एक मदरशा आता सरकारच्या रडारवर असणार आहे. त्यासाठी मदरशांमधील शिक्षक, कर्मचारी आणि शाळा इमारतींच्या खात्यांची तसेच त्यांच्या आधार कार्डची माहिती घेतली जात आहे.
योगी आदित्यनाथ सरकारने मदरसा शिक्षा परिषदेच्या रजिस्ट्रारला सर्व १६ हजार मदरशांची जिओ-टॅगिंग करण्याचे आदेश दिले आहेत. जीपीएस प्रणाली लावल्यानंतर मदरशांना एक कोड दिला जाणार आहे. राज्यातील सर्व मदरशांनी १५ ऑक्टोबरपर्यंत madarsaboard.upsdc.gov.in वर नोंदणी करून घ्यावी, असे आदेशच प्रधान सचिव मोनिका गर्ग यांनी दिले आहेत. विकास, स्पर्धा, सुसुत्रीकरण आणि शिक्षणातील सुधारणा करण्याच्या हेतूने या पोर्टलची सुरूवात करण्यात आल्याचं आदेशात म्हटलं आहे. नकली विद्यार्थी आणि शिक्षकांची माहिती मिळावी म्हणून मदरशांमध्ये जीपीएस प्रणाली लावण्यात येणार आहे. मदरशातील कर्मचारी आणि शिक्षकांचे बँक खातेही तपासले जाणार आहेत. हे खाते तपासल्यानंतरच त्यांना पगार दिला जाणार आहे. जिल्हा अल्पसंख्यांक अधिकारी या मदरशांची तपासणी करणार आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...