Saturday 26 August 2017

किरनापूर कोब्रा बटालियनची गोंदियात दादागिरी?


Untitled-1


गोंदिया,दि.26(बेरार टाईम्स)-शेजारील मध्यप्रदेश राज्यातील बालाघाट जिल्हा हा नक्षलग्रस्त जिल्हा असल्याने या जिल्ह्यातील किरनापूर परिसरात नक्षलबिमोडासाठी कोब्रा बटालियन तैनात करण्यात आले आहे.या बटालीयनचे प्रमुख असलेले वरिष्ठ अधिकारी हे शुक्रवारला सप्तनीक गोंदिया येथे खरेदी करण्यासाठी आले असता त्यांच्या वाहन हटविण्यावरुन झालेल्या वादावादीने पोलिसांची प्रतिमा पुन्हा जनतेसमोर मलीन करण्याचा प्रयत्न या अधिकार्यामुळे झाली आहे.तर दुसरीकडे गोंदिया पोलिसांनी घेतलेल्या सामज्यंशाच्या भूमिकेमूळे कोब्राबटालियनच्या पोलिसांनी केलेल्या गैरकृत्यवार पांघरुन घालण्याचाही प्रकार घडला.बाजार परिसरातील कोठारी ज्वेलर्स समोर किरनापूर येथील कोब्राबटालियनचे पोलिस अधिकार्याच्या वाहनचालकाने पार्किंग केलेले वाहन हटविण्यावरुन रात्री 9 वाजेच्या सुमारास वाद सुरु झाला.अवैध पार्किंगमुळे सदर वाहन पार्किंगच्या ठिकाणी लावण्याची विंनती कोठारी ज्वेलर्सचे संचालक व इतर व्यवसायिकांनी केली असता सदर वाहनचालकाने व पोलिस अधिकार्याने मी कोण आहे तुला माहित नाही का अशा रुबाब झाळत मुजोरी केली.वाद वाढत असल्याचे बघत किरनापूर येथील कोब्राबटालियनच्या जवानाना बोलावले ते जवान तिन ते चार गाड्यामध्ये 20 ते 30 च्या संख्येत गोंदियाच्या पोलिस ठाण्यासमोर पोचले.तोपर्यंत हा वाद गोंदिया शहर पोलिस ठाण्यापर्यंत पोचलेला होता.उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश बरकते,गोंदिया शहर पोलिस निरिक्षक दाभाडे,ग्रामीण पोलिस निरिक्षक शुक्ला,शिवसेना जिल्हाप्रमुख राजकुमार कुथे यांनी परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी चर्चा सुरु केली.त्या दरम्यान किरनापूर येथून  आलेल्या पोलिस अधिकायाने राजकुमार कुथे यांच्यावरच हल्ला चढविण्याचा प्रयत्न केला तेव्हा उपविभागीय पोलिस अधिकारी बरकते यांनी चांगलीच समज समोरच्या पोलिस अधिकायाला दिली.याप्रकरणामुळे व्यापारी व इतर नागरिक पोलिस ठाण्यासमोर जमले असता त्या जमावातील नागरिकावर कोब्रा बटालियनच्या जवानानी लाठीमार केल्याने चार पाच व्यक्ती जखमी झाले.त्यापैकी सिव्हील लाईन निवासी 65 वर्षीय माहुले नामक व्यक्तीला चांगला मार लागला असून समाजसेवक राजेश कनोजिया यांनी त्यांना केटीएस रुग्णालयात उपचारासाठी नेले.तसेच त्या परिसरातीलच जैन नामक एका व्यापार्याला सुध्दा मारहाण करण्यात आली.कोब्रा बटालियनच्या या दादागिरीचा सर्वत्र निषेध नोंदविण्यात येत आहे.वास्तविक मध्यप्रदेशातील पोलिसांनी गोंदियात येऊन अशा प्रकारचा धिंगाणा घालून येथील पोलिसांच्या कार्यक्षेत्रातच ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केला आहे.या सर्व प्रकरणात अद्यापही कुणाकडूनही तक्रार दाखल झालेली नाही.जेव्हा की मारहाण झाल्याचे चिन्ह रात्रीलाच काहींनी पोलिसांना दाखविल्यानंतरही तक्रार दाखल करण्यास पुढे का आले नाही हा चर्चेचा विषय झालेला आहे.
बेरार टाईम्सने यांसबधी उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश बरकते यांना विचारणा केली असता त्यांनी सदर प्रकार घडल्याची माहिती देत कुणाकडूनही तक्रार आलेली नसल्याचे सांगितले.परंतु किरनापूर येथील कोब्रा बटालियनच्या वरिष्ठ पोलिस अधिकायाने किमान स्थानिक पोलिसांना विश्वासात घ्यायला हवे होते असे सांगत रात्रीला झालेल्या सर्व प्रकरणाची माहिती महाराष्ट्र व मध्यप्रदेशच्या पोलिस विभागाच्या वरिष्ठांना कळविण्यात आल्याचे सांगितले. यासंबधी बालाघाटचे पोलिस अधिक्षक अमित सांघी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...