Saturday 19 August 2017

जनधनमधील 10 हजार कोटी बेपत्ता!

नवीदिल्ली,19 (वृत्तसंस्था) नोटबंदीच्या निर्णयानंतर अचानक पंतप्रधान जनधन योजनेमधील बॅंक खात्यांना प्रचंड महत्व आले. नोटबंदीमुळे या खात्यांमध्ये  मोठ्या प्रमाणावर रकमा जमा झाल्याचे सरकारच्या लक्षात आले. मात्र, नोटबंदीनंतर केवळ सहा महिन्याच्या कालावधीतच या पैशाला पाय फुटल्याने 19 जुलै 2017 पर्यंत या खात्यातील रकमेच तब्बल 10 कोटींची घट आली.
7 डिसेंबर 2016 पर्यंत  25 कोटी 82 लाख जनधन खात्यामध्ये 74 हजार 610 कोटी रुपये जमा झाले. मात्र, त्यानंतर सहा महिन्याच्या कालावधीत या खात्यांमधील तब्बल 9 हजार 833 कोटी रुपयांची घट आली. ही घट 13 टक्के आहे. दुसरीकडे जानेवारी 17 ते जुलै 17 या काळात जनधनच्या खात्यात 3 कोटी 20 लाख खात्यांची भर पडली. नोटबंदीनंतरची परिस्थिती निवळल्यानंतर या खात्यांमधून काळ्या धनाची साठवणूक करणाऱ्यांनी हळूहळू काढून घेतल्याचे निदर्शनात आले आहे. या खात्यांची चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात येत असले तरी अद्यापही कारणे स्पष्ट होऊ शकली नाही.
सप्टेंबर 2014 मध्ये पंतप्रधान जनधन योजना सुरू झाल्यानंतर  5 कोटी 37 लाख खात्यात 4 हजार 273 कोटी रुपये जमा झाले होते. 9 ऑगस्ट 2017 पर्यंत या खात्यांची संख्या 29 कोटी 48 लाखांवर पोचली असून या खात्यांतील जमा 65 हजार कोटी 697 कोटींवर पोचली आहे. सदर खात्यांपैकी 80 टक्के खाती ही सार्वजनिक बॅंकेत, 18 खाती ही ग्रामीण बॅंकेत तर दोन टक्के खाती ही प्रायवेट बॅंकेत आहेत. या योजनेचा सर्वाधिक लाभ उत्तरप्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, मणीपूर,राजस्थान, छत्तीसगड, आसाम आणि ओडिसा राज्यांना झाला आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...