Tuesday 15 August 2017

भाजपा खासदाराने फडकावला उलटा तिरंगा

सितापूर, दि. 15 - देशभरात मोठ्या उत्साहात स्वातंत्र्यदिन साजरा केला जात आहे. नेत्यांपासून ते अधिका-यांपर्यंत सर्वजण ध्वजवंदन करताना दिसत आहेत. तिरंग्याचा अपमान होऊ नये यासाठी योग्य ती काळजी घेतली जात असताना, भाजपा खासदाराने मात्र उलटा झेंडा फडकावला असल्याचं समोर आलं आहे. उत्तर प्रदेशमधील धौरहरा येथील भाजपा खासदार रेखा वर्मा यांनी ध्वजवंदन करताना उलटा झेंडा फडकावला आहे. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. या फोटोंमध्ये रेखा वर्मा उलटा तिरंगा फडकावत असून, फोटो काढून घेत असताना दिसत आहेत. 
हे फोटो सितापूरमधील महोली येथी पिसावा ब्लॉकमधील आहेत. रेखा वर्मा यांच्याशी यासंबंधी संपर्क साधण्याचा प्रसारमाध्यमांनी प्रयत्न केला असता त्यांच्याशी बोलणं होऊ शकलं नाही. 

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...