Sunday 20 August 2017

देवरी येथे पोळ्यानिमीत्त विविध स्पर्धांचे आयोजन



देवरी,20(प्रतिनिधी)- स्थानिक मॉ धुकेश्वरी मंदीर समितीच्या वतीने उद्या सोमवारी (ता.21) व मंगळवारी (ता.22) पोळ्याच्या निमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये उद्या सोमवारी पोळ्यानिमित्त उत्कृष्ठ बैलजोडी आणि सजावट स्पर्धा दुपारी 3 वाजता आयोजित करण्यात आली. स्थानिक जिल्हा परिषद मैदानावर होणाऱ्या या स्पर्धेची नोंदणी धुकेश्वरी मंदिरात करून स्पर्धकांना आपली बैलजोडी पटांगणावर आणण्याच्या सूचना आयोजकांनी केल्या आहेत. या स्पर्धेत विजेत्या बैलजोड्यांना प्रथम पुरस्कार म्हणून 3001, द्वितीय पुरस्कार म्हणून 2001 आणि तृत्तीय पुरस्कार म्हणून 1001 रोखीने देण्यात येणार आहेत.
याशिवाय मंगळवारी तान्हापोळ्यानिमित्त सुद्धा बालकांसाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या मध्ये उत्कृष्ठ नंदीसाठी प्रथम पुरस्कार म्हणून 701, द्वितीय पुरस्कार म्हणून 501 तर तृतीय पुरस्कार म्हणून 301 रोखीने देण्यात येणार आहेत. या स्पर्धेत उत्कृष्ठ वेशभूषा धारण करणाऱ्या स्पर्धकाला अनुक्रमे 501,301 आणि 201 रुपये नकदी देण्यात येणार असल्याची माहीती आयोजकांनी दिली आहे. या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...