Monday 21 August 2017

ब्लॉसम पब्लिक स्कूल मध्ये शेतकरी दिवस साजरा

 देवरी:२१ऑगस्ट
स्थानिक ब्लॉसम पब्लिक स्कूल येथे पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी दिवसाचे आयोजन मुख्याध्यापक सुजित टेटे यांनी केला. दिवस रात्र राबणारा देशातील भूमिपुत्र शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा आहे. शेतकऱ्याची भूमिका विध्यार्थ्यांना शालेय स्तरावर समजावी हा सदर कार्यक्रम आयोजित करण्यामागचा उद्देश.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सुजित टेटे मुख्य अतिथी सचिव निर्मल अग्रवाल आणि आधार फौंडेशनचे अध्यक्षा वैशाली टेटे उपास्थित होते. सदर कार्यक्रमामध्ये ब्लॉसम नर्सरी चे विध्यार्थी शेतकऱ्याच्या पोशाखात सहभागी झाले होते. ब्लॉसम प्राथमिक चे विध्यार्थी नंदी बैल स्पर्धे मध्ये सहभागी झाले होते. उत्कृष्ट नंदी सजावटचा प्रथम पारितोषिक ईशांत नंदनवार आणि द्वितीय पारितोषिक मैथिली निनावे यांना देण्यात आला. शेतकऱ्याच्या देशाच्या प्रगतीसाठी मोठा वाटा आहे त्यामुळे वेगवेगळे नृत्य सदर करून शेतकरी दिवस थाटात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशासाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी सहकार्य केला.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...