Wednesday 23 August 2017

खऱ्या शेतकऱ्यांचीच कर्जमाफी होणार- आ.फुके



शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे बिरसी येथे अनावरण

गोंदिया,२३- छत्रपती शिवाजी महाराजांनी देशात सर्वप्रथम कर्जमाफी केली होती. त्यानंतर महाराष्ट्र शासनाने ३५ हजार कोटींची सर्वांत मोठी कर्जमाफी केली आहे. यापूर्वीच्या सरकारांनी केवळ नेत्यांची व त्यांच्या ताब्यातील सहकारी क्षेत्रातील बँकांची कर्जमाफी केली होती. असा आरोप आमदार डॉ. परिणय फुके यांनी बिरसी येथे (ता.२३) आज केला.
गोंदिया तालुक्यातील बिरसी येथे कुणबी समाजाच्या वतीने शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. त्यावेळी ते  बोलत होते. मंचावर माजी जिल्हा परिषद सदस्य रजनी नागपुरे, नगरपालिका उपाध्यक्ष शिव शर्मा, बिरसीचे सरपंच रवींद्र तावाडे आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ. फुके म्हणाले की, या कर्जमाफीतून ग्रामपंचायत सदस्य, जि.प. व  पं.स. सदस्य, आमदार व खासदार यांना वगळण्यात आले आहे. यामुळे कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या पोटात दुखत असल्याची बोचरी टीका फुके यांनी केली. या कर्जमाफीच्या माध्यमातून सरकार सर्व शेतकèयांना पूर्णपणे कर्जमुक्त करणार आहे. बिरसी येथील ग्रामस्थांना विमानतळ पुनर्वसनाचा लाभ हा ८ वर्षानंतर वाढीव दराने मिळावा, यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी उपस्थितांनी दिली.
यावेळी महेंद्र देशमुख, भाऊराव उके, सुनील येवले, मुन्ना मेश्राम, नत्थू शेंडे, आत्माराम डोये, गणेश कोरे, सुरेंद्र तावाडे बहादूर यादव, आत्माराम दसरे, राजेश चतुर, छत्रपाल तुरकर, सुभाष मुंदडा आदी मान्यवर उपस्थित होते

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...