Wednesday 30 August 2017

इयत्ता पाचवी, आठवीच्या नियमबाह्य तुकड्या बंद करा


29gndph01_2017088585


गोंदिया,दि.30- शिक्षणाधिकाºयांनी नियमांना बगल देत इयत्ता पाचवी व आठवीच्या तुकड्यांचे वाटप केले. यामुळे मात्र जिल्ह्यातील माध्यमिक शाळांचे शेकडो खाजगी शिक्षक सत्र २०१७-१८ मध्ये अतिरिक्त ठरणार आहे. यामुळे वर्ग ५ व ८ वीच्या तुडक्या त्वरित बंद करण्याची मागणी माजी आमदार दिलीप बंसोड यांनी केली आहे. यासाठी गोंदिया जिल्हा शाळा संचालक संघटनेच्यावतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रफुल कच्छवे यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनानुसार, प्राथमिक शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनी बालकांचा मोफत शिक्षणाचा अधिकार अधिनियमाला अनुसरून जिल्ह्यात वर्ग ५ व ८ वीच्या वर्गतुकड्यांचे वाटप केले. परंतु सदर तुकड्या मंजूर करीत असताना त्याच नियमात अंतर्भूत असलेले अंतर व पटसंख्येचे निकष न पाळता तसेच यासंदर्भात वरिष्ठांचे कोणतेही लेखी आदेश नसताना वर्ग ५ व ८ वीच्या तुकड्या मंजूर केल्या.
यामुळे सत्र २०१७-१८ मध्ये शेकडो खाजगी शाळांतील शिक्षक अतिरीक्त ठरणार आहेत. त्यामुळे या तुकड्या त्वरीत बंद करण्याची मागणी माजी आमदार बंसोड यांनी केली. तसेच योग्य तो निर्णय घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा देत निवेदन दिले.
निवेदन देताना, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष राधेलाल पटले, माधोराव भोयर, रूपचंद ठकरेले, अ‍ॅड.कटरे, यादनलाल बनोटे, विष्णू दोनोडे, लोकेश भोयर, राजेश चव्हाण, दिनेश टेंभरे, काथवटे, रामसागर धावडे, दिलीप टेंभरे, बी.एम.कोसरकर, भरणे व अन्य उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...