Tuesday, 22 August 2017

क्षेत्रसहाय्यक आग्रेविरुध्द लाचप्रकरणी गुन्हा दाखल

गोंदिया,दि.२१-गोरेगाव वनविभागातंर्गत येत असलेल्या घुमर्रा येथील वन क्षेत्र सहाय्यक ओमप्रकाश आग्रे यांना ५ हजार रुपयाच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.तक्रारदाराने आपल्या शेतशिवारातील झाडे कापून ती पलखेडा येथे नेत असताना वन विभागाचे क्षेत्र सहाय्यक ओमप्रकाश वसंतराव आग्रे यांनी ट्रक्टर पकडून कारवाई न करण्याकरिता ७ हजाराची मागणी केली.तक्रारदाराला लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने नोदविलेल्या तक्रारीच्या आधारे ५ आगस्ट रोजी तपासणी केली असता आग्रे यांनी लाच मागणी केल्याची निष्पण झाल्याने त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...