Tuesday 15 August 2017

गुजरातमध्ये जमावाकडून दलितांना मारहाण

गुजरात,15- गुजरातमधील आणंद जिल्ह्यातील सोजित्रा तालुक्यातील कासोर गावात उच्चवर्णीयांकडून दलितांना मारहाण झाल्याची घटाना समोर आली आहे. गावातील मणिबेन आणि तिचा मुलगा शैलेश रोहीत यांना शिवीगाळ करत जमावाने काठीने मारहाण केली आहे.
जनावरांचं कातडं काढण्याचं काम करणाऱ्या या दोघांना मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
या आधी देखील गुजरातमध्ये मृत गाईचे कातडे काढणार्‍या दलितांना मारहाण केल्याची घटना घडली असून त्याचे संसदेत पडसाद उमटले होते.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...