Saturday, 12 August 2017

ब्लॉसम स्कुलच्या चिमुकल्यांनी साजरी केली कृष्णजन्माष्टमी


देवरी:१२ ऑगस्ट
स्थानिक ब्लॉसम स्कुल मध्ये जन्माष्टमीच्या पार्श्वभूमीवर कृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यात आली. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक सुजित टेटे , संस्थेचे सचिव निर्मल अग्रवाल, परीक्षक करुणा कुर्वे, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नियोजनानुसार पालकांनी आपल्या पाल्यांना राधाकृष्णाच्या रूपात तयार केले होते. चिमुकल्यांनी नृत्य करून पालकांना मोहून घेतला होता. राधाकृष्ण स्पर्धेत उत्कृष्ट चिमुकल्यानां पारितोषिके देण्यात येतील.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरिता थोटे यांनी केला. आभार प्रदर्शन मुख्याध्यापाकांनी केला. शाळेतील सर्व शिक्षकांनी सहकार्य केला.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...