Sunday 20 August 2017

शहानी भविष्य सांगण्याचा धंदा केव्हापासून सुरू केला-शरद पवार

कोल्हापूर, दि. 20 - केवळ दोन वा तीन सत्र नव्हे तर येत्या  2050 पर्यंत केंद्रात भाजपची सत्ता अबाधित राहील, या भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या काल केलेल्या विधानाचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज  खरपूस समाचार घेतला आहे. अमित शाह कधीपासून पंचांगकर्ते झाले?, त्यांनी हा नवा व्यवसाय’ कधीपासून सुरू केला? असा प्रश्न उपस्थित करत पवारांनी भाजपवर घणाघाती टीका केली आहे.
अमित शहा यांचे गुजरातमधील उद्योग धंदे मला माहित आहेत, मात्र, पंचांग पाहून भविष्य सांगण्याचा अमित शहा यांचा नवा उद्योग मला माहीत नव्हता, अशी उपरोधिक टीका शरद पवारांनी केली आहे. कोणत्याही सरकारमध्ये मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या समावेशासंबंधी निर्णय मुख्यमंत्री घेत असतात. मात्र, आता या घोषणा कोल्हापुरातून होत असल्याचा टोला शरद पवारांनी चंद्रकांत पाटलांना लगावला. श्री पवार हे कोल्हापुरातील पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी राणेंच्या भाजप प्रवेशाला आपल्या शुभेच्छा असल्याचे सांगितले. राजू शेट्टी यांच्या सोबत मी संसदेत काम केलं आहे, पण इतर कोणी मला माहिती नसल्याचं सांगत सदाभाऊ खोत यांचा शरद पवारांनी नामोल्लेख टाळला आहे. राजू शेट्टींचे लोकसभेतील काम दिसते. मात्र ,दुसरे (सदाभाऊ खोत) कोण माहीत नाहीत, त्यांचे योगदान काय? असे म्हणत पवारांनी सदाभाऊ खोत यांच्यावरही निशाणा साधला आहे. 

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...