Thursday 17 August 2017

दोन वर्षात रस्त्यांची कामे पूर्ण करणार- पालकमंत्री बडोले


गोंदिया,दि.16 : ग्रामीण भागाच्या विकासात रस्त्यांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. रस्त्यांमुळे विकासाला चालना मिळते. येत्या दोन वर्षात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात येतील. असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
सडक/अर्जुनी तालुक्यातील सिंदीपार येथे 16 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेच्या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून तयार करण्यात येणाऱ्या वडेगाव ते सिंदीपार या साडेचार किलोमीटर रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन पालकमंत्री बडोले यांनी केले. यानिमित्ताने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अतिथी म्हणून जि.प.सदस्य रमेश चुऱ्हे, पं.स.सदस्य इंदू परशुरामकर, गायत्री इरसे, राजेश कठाणे, सिंदीपार सरपंच जसवंता टेकाम, खोडशिवनी सरपंच अर्चना भैसारे, कोदामेडी सरपंच अनिता बडोले, वडेगाव सरपंच प्रभा बडोले, कार्यकारी अभियंता श्री.नंदनवार, श्री.ताकसांडे, नायब तहसिलदार अखिल मेश्राम यांची उपस्थिती होती.
      श्री.बडोले पुढे म्हणाले, रोजगार हमी योजनेतून पांदन रस्त्यांची कामे पूर्ण करुन या रस्त्यांच्या खडीकरणाची कामे सुध्दा करण्यात येतील. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेतात ये-जा करण्यासाठी व शेतातील माल घरी व बाजारपेठेत आणण्यासाठी रस्त्याची सुविधा उपलब्ध होईल. 

     पालकमंत्र्यांनी खोडशिवनी येथे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून तयार करण्यात येणाऱ्या खोडशिवनी ते सौंदड या 6.32 कि.मी. रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन केले. यावेळी जि.प.सदस्य रमेश चुऱ्हे, पं.स.सदस्य इंदू परशूरामकर, राजेश कठाणे, गायत्री इरले, ग्रामपंचायत सरपंच अर्चना भैसारे, उपसरपंच मनोहर परशूरामकर, कार्यकारी अभियंता श्री.नंदनवार, श्री.ताकसांडे, उपअभियंता श्री.देशमुख यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी खोडशिवनी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...