Saturday 19 August 2017

ग्रंथालयासाठी अर्थसहाय्य योजना

                      
24 ऑगस्ट पर्यंत प्रस्ताव आमंत्रित
गोंदिया,दि.18- भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान,कोलकाता अंतर्गत शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांसाठी कार्यान्वीत असलेल्या अर्थसहाय्याच्या समान निधी व असमान निधी योजनांमधून ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, नगर भवन, मुंबई यांच्यामार्फत दरवर्षी अर्थसहाय्य देण्यात येते.
  समान निधी योजना- राज्य शासनाचे 50 टक्के व प्रतिष्ठानचे 50 टक्के अर्थसहाय्य. सार्वजनिक ग्रंथालयांना इमारत विस्तार/बांधणीसाठी कमाल मर्यादा 10 लक्ष अर्थसहाय्य.
 समान निधी योजना- ग्रंथालय सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ, साधन सामग्री, फर्निचर, इमारत बांधकाम व इमारत विस्तार यासाठी अर्थसहाय्य. यामध्ये प्रतिष्ठानचा 75 टक्के व इच्छुक ग्रंथालयाचा 25 टक्के हिस्सा राहील. सार्वजनिक ग्रंथालयातील बाल विभाग, महिला विभाग, ज्येष्ठ नागरिक विभाग, नवसाक्षर विभाग, स्वतंत्र स्पर्धा परीक्षा विभाग इत्यादीकरीता प्रतिष्ठानकडून 100 टक्के अर्थसहाय्य. बाल विभाग स्थापन करण्याकरीता सार्वजनिक ग्रंथालयांना प्रतिष्ठानकडून 100 टक्के अर्थसहाय्य. महोत्सवी वर्ष जसे- 50 वर्ष, 60 वर्ष, 75 वर्ष, 100 वर्ष, 125 वर्ष, 150 वर्ष साजरे करण्यासाठी प्रतिष्ठानकडून 100 टक्के अर्थसहाय्य. शारिरीकदृष्ट्या विकलांग व्यक्तींसाठी विभाग स्थापन करण्यासाठी ग्रंथालयांना प्रतिष्ठानकडून 100 टक्के अर्थसहाय्य.
 राजा राममोहन ग्रंथालय प्रतिष्ठानच्या सन 2016-17 करीता समान निधी योजना आणि सन 2016-17 व 2017-18 करीता असमान निधी योजनांबाबत इच्छुकांनी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी साधावा. या योजनेच्या अधिक माहितीसाठी प्रतिष्ठानचे www.rrrlf.nic.in हे संकेतस्थळ पहावे. ग्रंथालयांनी समान निधी व असमान निधी योजनेसाठी विहीत पध्दतीत आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह इंग्रजी/हिंदी भाषेतील प्रस्ताव चार प्रतीत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास 24 ऑगस्ट 2017 पर्यंत सादर करावेत. असे जिल्हा ग्रंथालय अधिकारी अ.पं.ढोणे यांनी कळविले आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...