Friday 18 August 2017

सिरपूर येथे किराणा दुकानदाराची हत्या;पत्नी जखमी

IMG_20170818_123003

देवरी,दि.18-देवरी पोलीस ठाणेंतर्गत येत असलेल्या सिरपूर (बाघनदी) येथे आज शुक्रवारला सकाळच्या सुमारास किराणा व्यवसायिकाची त्याच्याच दुकानात कुऱ्हाडीने हत्या करण्यात आल्याची घटना घडली. दरम्यान, पतीच्या बचावासाठी पुढे आलेली पत्नीही आरोपीने कुऱ्हाड चालविल्याने गंभीर जखमी झाली आहे.
सिरपूरयेथील किराणा व्यवसायिक गोपाल गोविंदा मेंढे (वय 52) हे आपल्या दुकानात असतानाच संशयीत आरोपी घनश्याम परदेशी बंजारा याने दुकानात येऊन मेंढे यांच्याशी बाचाबाची करुन त्यांच्यावर कुऱ्हाडीने वार केला. हा प्रकार बघून पत्नी धुरपता गोपाल मेंढे ही बचावासाठी धावली असता तिच्यावरही हल्ला केल्याने ती गंभीर जखमी झाली. तिला गोंदियाच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.  आरोपी घनश्याम परदेशीला पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवरही कुऱ्हाड  फिरवित घटनास्थळावरुन पसार झाला आहे. पोलिस निरिक्षक राजेश तटकरे हे ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले असून आरोपींचा कसून शोध घेत आहेत.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...