Thursday, 10 August 2017

देवरी येथे जागतीक आदिवासी दिन मोठ्या थाटात साजरा

देवरी,(प्रती)ता:10: आदीवासी विद्यार्थी संघ, आँल इंडीया एम.फेडरेशन, आँल इंडीया पिपल्स फेडरेशन,आदीवासी हलबा/हलबी समाज संघटना,कवर समाज संघटना, ध्रुवगोंड समाज संघटना गोंड समाज संघटना देवरी तालुक्याच्या वतीने 9 आँगष्ट "जागतीक आदीवासी दिवस"मोठ्या थाटात व उत्साहात येथील आँफताब मंगल कार्यालयात साजरे करण्यात आले.              सर्वप्रथम देवरी येथील गोंड विरांगणा महाराणी दुर्गावती यांच्या पुतड्याला मार्लापण करूण आदिवासी समाज बांधवाची रैनी देवरीच्या प्रमुख मार्गे भ्रमणकरीत जयघोष च्या नादात आफताब मंगल कार्यालयात पोहचली येथे रैनी चे रुपांतर मेड्याव्यात झाले .                    या मेङयाव्याचे उदघाटन आदीवासी समाजाचे मार्गदर्शक तथा गोंदिया जिल्हा कांग्रेस चे महासचिव सहषराम कोरोटे यांच्या हस्ते आणी माजी आमदार रामरतन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले याप्रसंगी प्रमुख अतिधीच्या रुपात या क्षेत्राचे आमदार संजय पुराम, राष्ट्रवादी कांग्रेसचे नेते तथा क्रुषी उत्तपन्न बाजार समीती चे सभापती रमेश ताराम, आदीवासी महामंडङ चे संचालक भरतसिंग दुधनांग,आदीवासी सेवक टि.एन.सलामे, बिरसा ब्रिगेड चे संघटक हिरालाल भोई,माजी सभापती वसंत पुराम यांच्या सह समाजातील महिला,पुरूष व युवक वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.                             या जनजागरण मेङ्याव्यात सहषराम कोरोटे, संजय पुराम,रमेश ताराम, रामतन राऊत,हिरालाल भोई यांच्या सह उपस्थित प्रमुख पाहुण्यानी बहुमुल्य मार्गदर्शन केले।                        या कार्यक्रमाचे प्रास्तावीक  आँल इंडिया एम. फेडरेशन चे अध्यक्ष लोकनाथ तितराम यांनी तर मंच संचालन हिवराज कोल्हारे व रमेश ऊईके यांनी आणी उपस्थितांचे आभार  नवनीत आचले यांनी मानले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...