Saturday, 12 August 2017

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी थकवलं अडीच लाखांचं वीजबिल

danve

मुंबई, दि. 12 – भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आता नवीन वादात अडकले आहेत. दानवेंनी महावितरणचे तब्बल अडीच लाख रुपयांचे वीजबिल थकवले आहे. एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, दानवेंचे भोकरदनमधील घराचे गेल्या 83 महिन्यांपासूनचे वीजबिल थकलेले आहे. विशेष म्हणजे महावितरणनंही अद्यापपर्यंत दानवेंवर कोणतीही कारवाई केलेली नाही.

83 महिन्यांपासून दानवेंची लाखोंची थकबाकी असूनही कोणतीही कारवाई न केल्यामुळे महावितरणच्या कारभारावर शंका उपस्थित केली जात आहे. तर दुसरीकडे सर्वसामान्यांनी जर वीजबिल भरले नाही तर महावितरण तातडीनं त्यांची वीजजोडणी कापते. 
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जालना जिल्ह्यातील भोकरदनमध्ये घर आहे. गेल्या 83 महिन्यांपासून महावितरणचे तब्बल 2 लाख 59 हजार 176 रुपयांचे वीजबिल दानवेंनी थकवले आहे. फक्त जुलै महिन्यातच दानवेंकडे 29 हजार 595 हजारांची थकबाकी आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...