Friday 18 August 2017

केशोरी पोलिस ठाण्यातील फौजदारासह हवालदार एसीबीच्या जाळ्यात



गोंदिया,१८- दारूविक्रीचा धंदा सुरू ठेवण्याचा मोबदला म्हणून लाच मागणाऱ्या केशोरी पोलिस ठाण्यातील एका फौजदारासह हवालदाराला लाचलुचपत विभागाच्या पथकाने आज शुक्रवारी (ता१८) गजाआड केले आहे.
सविस्तर असे की, तक्रारदाराचा केशोरी पोलिस स्टेशनच्या हद्दीत दारू विक्रीचा धंदा आहे. तक्रारदारावर कायदेशीर कारवाई न करण्यासाठी केशोरी पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप कुंदोजवार आणि नायक पोलिस शिपाई महेंद्र मेश्राम यांनी साडेचार हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने भंडारा येथील लाचलुचपत विभागाकडे यासंबंधी तक्रार केली. या तक्रारीवरून लाचलुचपत विभागाच्या पथकाने आज शुक्रवारी (ता१८) रोजी सापळा रचला. यामध्ये कुंदोजकर आणि मेश्राम यांनी तडजोडीनंतर प्रत्येकी दोन हजार प्रमाणे चार हजाराची लाच तक्रारदाराकडून स्वीकारली. सदर लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले. दोन्ही आरोपींच्या विरोधात केशोरी पोलिस ठाण्यात लाचलुचपत कायद्याच्या कलम ७,१३(१) (ड) सहकलम १३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. सदरील कार्यवाही पोलिस अधीक्षक पी आर पाटील यांचे मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक दिनकर सावरकर, पोलिस निरीक्षक योगेश्वर पारधी, शिपाई गौतम राऊत, सचिन हलमारे, अश्विन गोस्वामी, श्रीकांत हत्तीमारे, शेखर देशकर, वाहनचालक राजेश यांनी पार पाडली.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...