Tuesday 15 August 2017

आता सातबारा सुद्धा आधारशी जोडा-मुख्यमंत्री


मुंबई,15-दुष्काळग्रस्तांना मदतीचे वाटप व्यवस्थित होण्यासाठी संबं‌धित शेतकऱ्यांचा आधार कार्ड क्रमांक त्यांच्या सात बाराच्या उताराला जोडण्यात यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी मुंबईत संबंधित अ‌धिकाऱ्यांना दिले आहेत. दुष्काळ जाहीर करण्याच्या निकषांमध्ये लवचिकता असण्याची गरजही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.
दुष्काळ व्यवस्थापन संहिता, २०१६च्या अनुषंगाने मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले आहेत. राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीसाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती आधार कार्डच्या क्रमांकाशी जोडली जाणार आहे. या शेतकऱ्यांच्या आधार क्रमांकाची जोडणी सातबारा उताऱ्याशी करावी. जेणेकरून शेतकऱ्यांना थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) अंतर्गत दुष्काळी मदतीचे वितरण करता येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...